World Muslim Population : मुस्लिम देशांचा नेता बनण्याचा प्रयत्न करणाऱ्या तुर्कीमध्ये लोक का सोडत आहेत इस्लाम? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
leaving Islam Turkey : जगभरात इस्लाम धर्म मानणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे चित्र रंगवले जाते. परंतु, एक ताज्या सर्वेक्षणातून असे स्पष्ट झाले आहे की काही मुस्लिमबहुल देशांमध्ये इस्लाम सोडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे, मुस्लिम जगाचे नेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तुर्कीमध्येच सर्वाधिक लोक इस्लामपासून दुरावत आहेत. प्यू रिसर्च सेंटरने केलेल्या या विस्तृत सर्वेक्षणात ३६ देशांचा समावेश करण्यात आला. यातून १३ देशांमध्ये इस्लाम स्वीकारणारे आणि सोडणारे लोक दोन्ही प्रकारे आढळले. या यादीत तुर्कीसह भारत, अमेरिका, सिंगापूरसारखे देशही आहेत. मात्र तुर्कीचे चित्र सर्वाधिक लक्षवेधी ठरते, कारण येथे इस्लाम सोडणाऱ्यांची संख्या तो स्वीकारणाऱ्यांपेक्षा जास्त आहे.
सर्वेक्षणानुसार, काही वर्षांपूर्वी तुर्कीमध्ये मुस्लिमांची टक्केवारी ९८ टक्क्यांवर होती. पण २०२३-२४ मध्ये ही संख्या घसरून ९५ टक्क्यांवर आली आहे. म्हणजेच तब्बल ३ टक्के लोकांनी इस्लाम सोडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या काळात कोणीही इस्लाम स्वीकारलेला नाही. तुर्की स्वतःला मुस्लिम जगाचा नेता म्हणून मांडण्याचा प्रयत्न करत असताना, देशातील तरुण पिढी धर्मापासून दूर जात असल्याचे या सर्वेक्षणावरून दिसते. धर्मनिरपेक्षता, पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव, तंत्रज्ञानामुळे वाढलेले प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य आणि बदलते जीवनमान ही काही महत्त्वाची कारणे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Blood Moon eclipse : सप्टेंबरमध्ये पौर्णिमेला आकाशात दिसणार जादुई नजारा; 8 नोव्हेंबर 2022 नंतरचे सर्वात मोठे पूर्ण चंद्रग्रहण
जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश इंडोनेशिया आहे. येथे तब्बल ९३ टक्के लोक इस्लाम धर्माचे अनुयायी आहेत. अहवालानुसार, येथे कोणीही धर्म सोडलेला नाही किंवा स्वीकारलेला नाही. त्यामुळे मुस्लिमांची संख्या अबाधित राहिली आहे. बांगलादेशातही मुस्लिमांची टक्केवारी ९१ टक्के इतकी आहे आणि तीही स्थिर आहे. याचा अर्थ, या देशांमध्ये इस्लाम सोडणाऱ्या किंवा स्वीकारणाऱ्यांची संख्या नगण्य आहे.
मलेशियामध्ये मुस्लिमांची टक्केवारी ७४ वरून ७५ टक्क्यांवर पोहोचली आहे. म्हणजेच एक टक्का लोकांनी इस्लाम स्वीकारला आहे. तसंच नायजेरियामध्ये एक टक्का लोकांनी इस्लाम सोडला, तर एक टक्का लोकांनी इस्लाम स्वीकारला. परिणामी, मुस्लिमांची टक्केवारी ३८ टक्क्यांवरच स्थिर राहिली आहे.
मुस्लिम अल्पसंख्याक असलेल्या भारत आणि अमेरिकेत मुस्लिमांची संख्या स्थिर असल्याचे अहवाल सांगतो. म्हणजेच येथे इस्लाम सोडणाऱ्यांची संख्या आणि तो स्वीकारणाऱ्यांची संख्या जवळपास समान आहे. भारतामध्ये मुस्लिमांची संख्या एकूण लोकसंख्येत १४ टक्क्यांच्या आसपास आहे, तर अमेरिकेत ती १ टक्क्यांच्या आसपास आहे. या दोन्ही देशांत धर्मांतराचे प्रमाण तुलनेने खूपच कमी असल्याने फारसा फरक पडलेला नाही.
ट्युनिशियामध्ये मुस्लिमांची संख्या तब्बल १०० टक्के आहे, म्हणजे येथे इतर धर्मांचे अस्तित्व जवळजवळ नाही. तर इस्रायलमध्ये मुस्लिमांची संख्या १८ टक्क्यांवरून १९ टक्क्यांवर वाढली आहे. म्हणजेच येथे मुस्लिम लोकसंख्येत एक टक्क्यांची भर पडली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Tariff : भारतीय राजदूतांचा अमेरिकन कायदेकर्त्यांसोबत महत्त्वपूर्ण संवाद; काही मोठे घडणार याची चाहूल?
या सर्वेक्षणावरून हे स्पष्ट होते की, मुस्लिमबहुल देशांमध्येही धार्मिक बदल घडत आहेत. विशेषतः तुर्कीमध्ये लोकांचा धर्मापासून वाढता दुरावा हे जगभरातील संशोधकांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. तर इंडोनेशिया, बांगलादेश, ट्युनिशिया यांसारख्या देशांत इस्लाम अबाधित आहे. तज्ज्ञांच्या मते, तुर्कीतील बदल ही केवळ सुरुवात असू शकते. समाज जितका आधुनिकतेकडे झुकतो, तितका धार्मिकतेत बदल होतो. त्यामुळे पुढील काळात मुस्लिम लोकसंख्येच्या वाढ-घटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे.