Google Green Card: H-1B व्हिसा कर्मचाऱ्यांना दिलासा, गुगल २०२६ पासून ग्रीन कार्ड प्रक्रिया पुन्हा होणार सुरू
पीईआरएम, किंवा प्रोग्राम इलेक्ट्रॉनिक रिव्ह्यू मॅनेजमेंट, यूएस रोजगार-आधारित ग्रीन कार्ड प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. कंपन्या सिद्ध करतात की, परदेशी कर्मचारी नियुक्त केल्याने अमेरिकन कामगारांवर नकारात्मक परिणाम होणार नाही आणि या भूमिकेसाठी कोणतेही पात्र अमेरिकन उमेदवार उपलब्ध नाहीत. टेक कंपन्या सामान्यतः कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या व्हिसावरून कायमस्वरूपी निवासस्थानात स्थानांतरित करण्यासाठी हा मार्ग वापरतात. अंतर्गत मेमोमध्ये असे म्हटले आहे, पीईआरएम साठी पात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांशी २०२६ च्या पहिल्या तिमाहीत गुगलच्या बाह्य इमिग्रेशन कायदा फर्म्स संपर्क साधतील.
जरी गुगलने ही योजना सार्वजनिकरित्या जाहीर केलेली नसली तरी, अंतर्गत माध्यमाच्या प्रत समोर आल्यानंतर ही बातमी चर्चेत आली आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने अधिकृतपणे टिप्पणी करण्यास नकार दिला. या संबधित अधिकृत माहिती येण्याची वाट पाहत आहेत. अधिकृत माहिती समोर येताच अमेरिकेमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या अतिरिक्त टॅरीफ आणि H-1B व्हिजाचे बदललेले आणि कठीण केलेले नियम यामुळे परदेशी नागरिकांना अनेक आव्हानाला सामोरे जावे लागत आहे.
अलीकडेच, अमेरिकेत H-1B व्हिसासाठी प्रयत्न करणाऱ्या भारतीयांना मोठा झटका लागला आहे. अचानक व्हिसा नूतनीकरणाच्या दूतावासाने सर्व अपॉइंटमेंट रद्द केल्याने हजारोंच्या नोकऱ्या धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






