Stargazing: शहरी गोंगाटापासून दूर तारे पाहणे का बनले भारतातील नवे पर्यटन आकर्षण? जाणून घ्या तज्ञांकडून ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
भारतात तारे पाहणे (Stargazing) हा पर्यटनाचा नवा आणि लोकप्रिय ट्रेंड बनत आहे.
तारे पाहणे मानसिक शांती, तणाव कमी करणे आणि मुलांच्या कुतूहलाला चालना देणे यासाठी उपयुक्त ठरते.
उत्तराखंड, कूर्ग, जैसलमेर, गोवा यांसारखी ठिकाणे तारे पाहण्यासाठी सर्वाधिक पसंतीस पडत आहेत.
stargazing spots India : दरवर्षी २७ सप्टेंबर रोजी साजरा होणारा जागतिक पर्यटन दिन( World Tourism Day)आपल्याला प्रवासाचे महत्त्व आणि जीवन बदलणाऱ्या अनुभवांची आठवण करून देतो. या वर्षीची थीम आहे “पर्यटन आणि शाश्वत वाहतूक”. या पार्श्वभूमीवर, भारतात हळूहळू उदयास येणारा एक मनोरंजक ट्रेंड म्हणजे तारे पाहणे (Stargazing). गेल्या काही वर्षांत शहरातील गर्दी, गोंगाट आणि प्रदूषणापासून दूर जाण्यासाठी लोक शांत, नैसर्गिक ठिकाणांची निवड करू लागले आहेत. अशा ठिकाणी रात्रीच्या वेळी आकाशातील चमचमती तारे, नक्षत्रे आणि आकाशगंगेचे अप्रतिम दृश्य अनुभवता येते. आज तारे पाहणे हे केवळ छंद नाही तर मानसिक आरोग्य सुधारण्याचे साधन मानले जाऊ लागले आहे.
तज्ञांच्या मते, तारे पाहण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ‘निरभ्र अनुभव’.
हे अनुभव आपल्याला दैनंदिन तणावापासून दूर नेतात.
निसर्गाशी असलेले आपले नाते अधिक घट्ट करतात.
आपण वर्तमान क्षणात जगायला शिकतो.
२०२३ मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, तारे पाहणे तणाव कमी करते, मूड सुधारते आणि चिंता कमी करण्यास मदत करते. याशिवाय, हे अनुभव आपल्याला आकाशाच्या अथांगतेबद्दल कुतूहल निर्माण करून देतात. आज अनेक प्रवासी रात्रीच्या पर्यटनाला (Night Tourism) प्राधान्य देत आहेत. शहरातील कृत्रिम प्रकाशामुळे आकाश न दिसणाऱ्या लोकांना, दुर्गम भागात जाऊन तारे पाहणे ही अनोखी मेजवानी ठरते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PoK protests : इस्लामाबाद हादरले! पाकव्याप्त काश्मीरमध्ये निदर्शने नियंत्रणाबाहेर; 38 कलमी मागण्यांसह हजारो लोक उतरले रस्त्यावर
भारतातील अनेक ठिकाणी पर्यटक तारे पाहण्यासाठी गर्दी करू लागले आहेत.
उत्तराखंड – बेंटल, जागेश्वर, कौसानी आणि भीमताल
कर्नाटक – कूर्ग
तामिळनाडू – कोडाईकनाल
राजस्थान – जैसलमेर (वाळवंटातील रात्रीचे आकाश अनुभवण्यासाठी प्रसिद्ध)
गोवा – काही शांत समुद्रकिनारे आणि डोंगराळ भाग
ही ठिकाणे आता Stargazing Hotspots म्हणून ओळखली जात आहेत.
तज्ञ सांगतात की मुलांसाठी तारे पाहणे विशेष फायदेशीर ठरते.
त्यांना मोबाइल किंवा टीव्ही स्क्रीनपासून दूर ठेवते.
विश्वाच्या विशालतेबद्दल जिज्ञासा वाढवते.
नैसर्गिक जगाबद्दल कुतूहल निर्माण करते.
आजच्या डिजिटल युगात मुलांना अशी “निसर्गातून शिकण्याची” संधी अत्यंत मोलाची आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Indian Rupee : भारतीय रुपया तुम्हाला बनवेल 20 हून अधिक देशांमध्ये श्रीमंत; जाणून घ्या कुठे अन् किती होणार फायदा?
तारे पाहणे हा अनुभव शाश्वत पर्यटनाशी थेट जोडला गेलेला आहे.
प्रवासी शहरांबाहेर जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवतात.
स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळतात.
निसर्ग संवर्धनाबद्दलची जाणीव वाढते.
आजच्या धावपळीच्या जीवनात तारे पाहणे म्हणजे मानसिक विश्रांती, निसर्गाशी नाते आणि प्रवासाचा नवा अनुभव. भारतातील अनेक भागांमध्ये हा ट्रेंड झपाट्याने वाढतोय. त्यामुळे येत्या काही वर्षांत Stargazing Tourism हे भारताच्या पर्यटन उद्योगातील एक मोठे आकर्षण ठरणार आहे.