कझाकस्तान सीमेजवळ धरण फुटलं, अनेक घरे उद्ध्वस्त, 4500 हून अधिक लोकांची सुटका!

रशियातील कझाकिस्तान सीमेजवळील धरण फुटल्याने उरल नदीला पूर आल्याने हजारो घरे पाण्याखाली गेली आहेत. टीम मदत आणि बचाव कार्य करत आहे. आता जवळपास 4500 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

  रशियामधून एक मोठी बातमी समोर येत आहे. रशियामध्ये कझाकस्तान सीमेजवळील धरण फुटल्याने (Russia Dam Burst ) आलेल्या पुराने मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. रशियातील अनेक गावांमध्ये धरणाचे पाणी पसरल्याने घरे उद्ध्वस्त झाली आहेत. पुरामुळे दक्षिण उरल्सच्या ओरेनबर्ग भागातील संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला आहे.  आता बचाव पथकाने या परिसरातून 4500 लोकांना बाहेर काढले आहे. बचावकार्य अजूनही सुरू आहे

  6 हजार घरे उद्ध्वस्त

  रिपोर्टनुसार, कझाकस्तानच्या सीमेजवळील ओर्स्क शहरात हे धरण कोसळलं. स्थानिय प्रशासनाकडून सध्या बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत पूरग्रस्त भागातून 1100 मुलांसह एकूण 4500 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. पुरामुळे परिसरातील सुमारे 6000 घरे उद्ध्वस्त झाली आहेत. लोकांचे धान्य, संसारोपयोगी साहित्य आदी सर्वच नासाडी झाले आहेत.

  राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पुराबाबत आदेश दिले

  राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंत्री अलेक्झांडर कुरेन्कोव्ह यांना धरण फुटल्यामुळे आलेल्या पुराला सर्वतोपरी मदत करण्यासाठी या भागाला भेट देण्याचे आदेश दिले आहेत. पूरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची व्यवस्था करण्यात यावी. त्यांच्या उपचार आणि निवासाची संपूर्ण व्यवस्था करण्यात यावी. असं ते म्हणाले आहेत.

  धोक्याच्या चिन्हाजवळ उरल नदी

  धरणाचा फुटल्यामुळे ओरेनबर्गमधील उरल नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. नदी धोक्याच्या जवळ आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. पाणी वाढल्यास लोकांना पूरग्रस्त भागातून जबरदस्तीने बाहेर काढावे लागले.