फोटो सौजन्य: सोशल मीडिया
मॉस्को: सध्या रशिया-युक्रेन युद्ध अधिक आक्रमक होत चालले आहे. हे युद्ध थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. काही दिवसांपूर्वीच, रशियाने सलग दोन दिवस युक्रेनवर हल्ले केले होते. दरम्यान, रशियन सैन्याने युक्रेनवर मोठी कारवाई केली आहे. पाश्चिमात्य देशांकडून मिळणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या मदतीवर असलेल्या युक्रेनला आव्हान देत रशियाने आपल्या मोहिमा अधिक तीव्र केल्या आहेत. रशियाने युक्रेनच्या दोन प्रमुख शहरांवर ताबा मिळवला आहे.
युक्रेनची दोन गावे ताब्यात
मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या पूर्व डोनेस्त्क भागात रशियाने महत्त्वपूर्ण यश मिळवला आहे. रशियाने युक्रेनच्या लष्करी सीमेवरील महत्त्वाच्या शहरांजवळ हल्ले करून सेरेब्र्यांका आणि मायकोलायव्का ताब्यात घेतली आहेत. याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली असून, हा यशस्वी टप्पा त्यांच्या लष्करासाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे. डोनेस्त्क प्रदेशातील हा भाग युक्रेनसाठीही अत्यंत महत्त्वाचा असल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
युद्धाला नवे वळण
रशियाच्या म्हणण्यानुसार, या भागावर ताबा मिळवणे रशियाला पुढील रणनीतीसाठी फायदेशीर ठरेल. तसेच रशियाचे सैन्य सध्या युक्रेनमधील इतर सीमेवरील महत्त्वाच्या शहरांजवळ पोहोचले आहे, त्यामुळे युक्रेनला नवीन आव्हानांचा सामना करावा लागत आहे. युद्धाच्या या टप्प्यावर रशिया-युक्रेन संघर्षाला नवे वळण मिळाले आहे.
Russian forces have captured the villages of Serebrianka and Mykolaivka in Ukraine’s eastern Donetsk region, Russia’s Defense Ministry said, as military blogs reported Russian advances near key frontline towns https://t.co/z1MvGs3mfL
— Reuters (@Reuters) October 24, 2024
उत्तर कोरिया रशियाला सैन्य पाठवत आहे – अमेरिकेचे संरक्षण मंत्र्यांच्या दावा
अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी दावा केला आहे की उत्तर कोरियाने रशियाला सैनिक पाठवले आहेत. त्यांच्या मते, उत्तर कोरियाचे हजारो सैनिक सध्या रशियात असून त्यांना युक्रेनच्या युद्धात तैनात करण्यापूर्वी विशेष प्रशिक्षण दिलं जात आहे. हे पुरावे युद्धातील आंतरराष्ट्रीय भूमिका अधिक गुंतागुंतीची बनवतात. अमेरिका मात्र युक्रेनच्या मदतीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अलीकडेच कीवसाठी $425 दशलक्ष शस्त्रास्त्र पॅकेजची घोषणा केली आहे.
अमेरिकेने युक्रेनला हवाई संरक्षण यंत्रणा, चिलखती वाहने आणि इतर महत्त्वाची शस्त्रास्त्रे पाठवली आहेत. जो बायडेन युक्रेनच्या सहयोगी देशांसोबत नोव्हेंबरमध्ये आभासी बैठक घेणार असल्याचेही जाहीर केले आहे. या बैठकीतून युद्धातील पुढील रणनीती ठरवली जाईल. रशिया-युक्रेन युद्धाचा हा नवा टप्पा जागतिक राजकारणात नवीन समीकरणं तयार करत आहे.