Tejas पायलट नमांश स्याल यांच्या स्मृतींना उजाळा; रशियाच्या 'नाइट्स' टीमकडून भावपूर्ण निरोप (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
दुबई एअर शोमध्ये रशियन ‘नाइट्स’ एरोबॅटिक टीमने भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर नमंश स्याल यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. दुबई एअरशोमध्ये रशियाच्या नाईट्स एरोबॅटिक्स टीमने भारताच्या हवाई दलाचे विंग कमांडर नमांश स्याल यांना भावपूर्ण श्रद्धांजली अपर्ण केली. IAF तेजस विमानाच्या एअरिअल डिसप्ले दरम्यान शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) हा अपघात झाला होता. हवेत कसरती दाखवताना विमान अचानक कोसळले आणि मोठा स्फोट होऊन आग लागली.
याच पार्श्वभूमीवर रशियाच्या फॉर्मेशन टीमने आपले प्रदर्शन शहीद पायलट नमांश स्याय यांना समर्पित केले. टीमने नमांश स्याल यांना “Brother in the Skies” असे म्हणत त्यांच्या शौर्याला आणि कर्तव्यनिष्ठेला सलमा केला. नाइट्स टीमने म्हटले की, अपघातानंतरचे क्षण शब्दा मांडणे कठीण आहे, पण आमची एक परंपरा आहे, पायलट परंपरा. जो अंतिम उड्डाणातून परत येत नाही, त्यांच्या सन्मानार्थ उड्डाण सुरु ठेवायचे. यामुळे रशियाच्या नाइट्स एरोबॅटिक्सने दु:खाने आणि गोंधळलेल्या वातावरणात नमांश स्याल यांना भावपूर्ण निरोप दिला.
⚡ Russian Aerobatic Team Pays Tribute to Wg Cdr Namansh Syal at Dubai Airshow 2025: The Russian Knights aerobatic team has honoured Wing Commander Namansh Syal, the Indian Air Force pilot who tragically lost his life after the Tejas crashed during its display at the Dubai… pic.twitter.com/62INZRohXD — OSINT Updates (@OsintUpdates) November 23, 2025
अमेरिकेच्या F-16 व्हायपर डेमोन्स्ट्रेशन टीमने २१ नोव्हेंबर रोजी होणारे हवाई प्रदर्शन तातडीने रद्द केले. F-16 व्हायपर डेमोन्स्ट्रेशन टीमचे कमांजर मेजर टेलर फामा हेस्टर यांनी म्हटले की, एखाद्या पायलटचे जीवन संपल्यावर काही क्षणातच रॉक अँड रोल म्युझिक आणि आनंदी घोषणा हे धक्कादायक आहे. त्यांनी म्हटले की, आयोजकांनी शो न थांबवण्याचा निर्णय घेतला आहे, पण काही क्षण असे असतात की आपण थांबलेच पाहिजे.
Tejas पायलट नमांश स्याल यांना अखेरचा निरोप; भारतीय हवाई दलाने वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
Ans: दुबई एअर शोमध्ये रशियन ‘नाइट्स’ एरोबॅटिक टीमने भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर नमंश स्याल यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. टीमने म्हटले की, अपघातानंतरचे क्षण शब्दा मांडणे कठीण आहे, पण आमची एक परंपरा आहे, पायलट परंपरा. जो अंतिम उड्डाणातून परत येत नाही, त्यांच्या सन्मानार्थ उड्डाण सुरु ठेवायचे.
Ans: अमेरिकेच्या F-16 व्हायपर डेमोन्स्ट्रेशन टीमने २१ नोव्हेंबर रोजी होणारे हवाई प्रदर्शन तातडीने रद्द केले. टीमने म्हटले की, एखाद्या पायटचा मृत्यू झाल्यावर रॉक अँड रोल म्युझिक आणि आनंदी घोषणा सुरु ठेवणे कठीण असते. अशा क्षणी आपण थांबणे योग्य असते.






