सौदी अरेबिया : आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानला (Pakistan) सौदी अरेबियाने (Saudi Arebia) पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे. सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (Mohammed bin Salman) यांनी पाकिस्तानमधील त्यांची गुंतवणूक 10 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. अधिकृत सौदी वृत्तसंस्थेनुसार, क्राउन प्रिन्सने सौदी डेव्हलपमेंट फंडला पाकिस्तानच्या सेंट्रल बँकेतील सौदी ठेवींची रक्कम पाच अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचा अभ्यास करण्यास सांगितले आहे.
[read_also content=”थंडी वाढलीये! मग ट्राय करा ‘हा’ खास हर्बल चहा, आणि ‘हे’ उपयुक्त पदार्थ देखील खा! https://www.navarashtra.com/food/food/winter-food-special-for-health-like-herbal-tea-ghee-bajra-ragi-sesame-seeds-ginger-tulsi-jyeshthmadh-nrps-360674.html”]
यापुर्वी ऑगस्ट २०२२ मध्ये पाकिस्तानमध्येही गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली होती. यानंतर डिसेंबरमध्येही सौदी अरेबियाने सेंट्रल बँकेत ठेवलेल्या रोख रकमेत वाढ करण्यात आली. पाकिस्तान पुन्हा एकदा दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. तेथे परकीय चलनाचा साठा ५ अब्ज डॉलरच्या खाली पोहोचला आहे, त्यामुळे तेथील अर्थव्यवस्थेला आणि पाकिस्तानच्या लोकांना मदत करण्यासाठी सौदी सरकारने हे पाऊल उचलले आहे.
सौदी अरेबियाची ही पहिलीच वेळ नाही, तर यापूर्वीही अनेकदा असे केले आहे. मदतीच्या आशेने पाकिस्तानचे पंतप्रधान सौदीला गेले होते पाकिस्तान अनेक दिवसांपासून सौदीकडून मदतीची वाट पाहत होता. पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी नुकतेच सांगितले होते की, सौदी अरेबियातून लवकरच पैसा येणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी वर्षभरात दोनदा सौदी अरेबियाला भेट दिली आहे. अलीकडेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनीही सौदी अरेबियाला भेट दिली आहे. सौदी अरेबियाकडून आर्थिक मदत मिळावी हा या भेटींचा उद्देश होता. सौदी प्रेस एजन्सीने मंगळवारी सांगितले की, प्रिन्स मोहम्मद यांनी पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणि तेथील लोकांना मदत करण्यासाठी हे निर्देश दिले आहेत.
पाकिस्तानचा परकीय चलनाचा साठा गेल्या आठवड्यात पाच अब्ज डॉलर्सच्या जवळपास पोहोचला होता, ज्यामुळे त्याचे एक महिन्याचे आयात बिल फारच कठीण होते. याशिवाय पाकिस्तानवर परकीय कर्जाचे दायित्वही आहे आणि ते वेळेवर फेडले नाही तर दिवाळखोर होण्याची शक्यता आहे. परकीय चलनाच्या साठ्याच्या प्रचंड तुटवड्यामुळे पाकिस्तानला सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली असून तेथील लोकांना मूलभूत सुविधाही मिळत नाहीत. पाकिस्तानच्या चलन साठ्यात ६.७ अब्ज डॉलरची घट झाली आहे. चीनमधूनही गुंतवणूक कमी झाल्यामुळे अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. पाकिस्तानातील कर्मचाऱ्यांना पगारही वेळेवर मिळत नाही. तेथील सरकारकडे कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पुरेसा पैसा नाही. सरकारही परदेशातील मालमत्ता विकून पैसा उभा करत आहे