काय आहे UAE चा गोल्डन व्हिसा? कोण आणि कसे करु शकतात अर्ज? जाणून घ्या सर्वकाही (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अबू धाबी : संयुक्त अरब अमिरातीने (UAE) ने गोल्डन व्हिसाच्या योजनेमध्ये काही बदल केले आहेत. तसेच त्यांनी गोल्डन व्हिसा केवळ भारतीयांसाठी किंवा निवडक देशांसाठी असलेल्या अफवांचे देखील खंडन केले आहे. युएईच्या नागरिकता, सीमाशुल्क आणि बंदर सुरक्षा प्राधिकरणाने (IPC)ने या वृत्तांचे खंडने केले आहे. पण यूईची ही गोल्डन व्हिसा सिस्टिम काय आहे. यासाठी कोण कुठे आणि कसा अर्ज करु शकतो याबद्द आज आपण जाणून घेणार आहोत.
मिळालेल्या माहितीनुसार, यूएईने गोल्डन व्हिसा योजनेत काही बदल केले आहेत. यासाठी तुम्हाला १ लाख यूएई म्हणजे सुमारे २३.३ लाख रुपये भरावे लागतील. यानंतर तुम्हाला यूएईमध्ये राहण्याची परवानगी मिळेल. यासाठी तुम्हाला यूएई सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागले.
यूएईच्या नियमांनुसार, तुम्ही पात्र आहाता का नाही हे सर्वप्रथम तापासले जाईल. तुमची पार्श्वभूमी, गुन्हेगारी रेकॉर्ड्स, तुमचा व्यवसाय आणि इतर अनेक कागदपत्रांची चौकशी सुरुवात केली जाईल. या सर्व निकषांमध्ये तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला हा व्हिसा मिळेल.
तुम्हाला यूएईमध्ये राहण्यासाठी एक खास प्रकरची रेसिडेन्सी परवाना मिळेल. हा परवाना मिळाल्यावर परदेशी नागरिक यूएईमध्ये स्थायिक होऊ शकतात. व्यवसाय करु शकतात तसेच शिक्षणही घेऊ शकता.
या व्हिसासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला वरील गोष्टींमध्ये कोणत्या वर्गात बसता हे तापासावे लागले. त्यानुसार सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील. यूएई सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करता येईल. तसेच ICP आणि GDRFAD Dubai यावर तुम्हाला आणखी माहिती देखील उपल्बध होईल.