हिंदूंचा आवाज, खलिस्तानविरोधी...; कोण आहेत चंद्र आर्य? उतरले कॅनडाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ओटावा: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी 7 जानेवारी 2025 ला आपल्या पंतप्रधान पदाचा आणि पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर कॅनडाच्या राजकारणात आणि लिबरल पार्टीमध्ये खळबळ सुरु आहे. लिबरल पार्टीच्या पक्षाकडे मजबूत नेतृत्त्व नसल्याने त्यांच्या समोर मोठी आव्हाने आहेत. दरम्यान ट्रुडोंच्या राजीनाम्यानंतर कॅनडातील अनेक राजकीय नेत्यांची नावे पुढे आली. यामध्ये इनोव्हेशन मंत्री फ्रँकोइस फिलिप, ट्रान्सपोर्ट मंत्री अनीता आनंद, विदेश मंत्री मेलानी जॉली, तसेच माजी अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलंड यांची नावे चर्चेत आहेत.
चंद्र सुर्य यांची घोषणा
दरम्यान आणखी एक भारतीय वंशाच्या व्यक्तीचे नाव समोर आले आहे. त्यांनी स्वत:च पंतप्रधान पदासाठी दावा केला आहे ते म्हणजे चंद्र आर्य. त्यांनी यासाठी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचा अर्ज देखील सादर केला आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी कॅनडाचे पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जस्टिन ट्रुडोंच्या राजीनाम्यानंतर काही काळातच त्यांनी ही घोषणा केल्याने सध्या कॅनडामध्ये पंतप्रधान पदासाठी राजकीय वर्तुळात मोठी हालचाल झाली आहे.
I am running to be the next Prime Minister of Canada to lead a small, more efficient government to rebuild our nation and secure prosperity for future generations.
We are facing significant structural problems that haven’t been seen for generations and solving them will require… pic.twitter.com/GJjJ1Y2oI5— Chandra Arya (@AryaCanada) January 9, 2025
जस्टिन ट्रुडो यांच्याशी कधी घनिष्ठ संबंध
चंद्र आर्य यांची राजकीय कारकीर्दची सुरुवात जस्टिन ट्रुडो यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली होती. परंतु, त्यानंतर हळूहळू जस्टिन ट्रुडो यांचे भारतविरोधी धोरण स्पष्ट होत गेले, तसे चंद्र आर्य यांनी त्यांच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.
हिंदू समुदायासाठी आवाज
भारतीय वंशाचे खासदार चंद्र आर्य यांनी कॅनडामध्ये हिंदू समुदायासाठी अनेकदा आवाज उठवाला आहे. ब्रॅम्पटन शहरातील हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी उघडपणे या प्रकरणावर आपली भूमिका मांडली. तसेच, खालिस्तानी चळवळींविरोधातही त्यांनी आपले मत मांडले आहे. हिंदूंच्या हक्कांसाठी लढणारे नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
कर्नाटकात जन्म, कॅनडात राजकीय यश
चंद्र आर्य यांचा जन्म कर्नाटकातील तुमकुरु येथे झाला. त्यांनी कौसाली इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून MBA पूर्ण केले. भारतात शिक्षण घेतल्यानंतर 2006 साली ते कनाडामध्ये स्थलांतरित झाले. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी इंडो-कॅनडा ओटावा बिझनेस चेंबरचे अध्यक्षपद संभाळले होते. 2015 साली त्यांनी पहिली फेडरल निवडणूक जिंकून कॅनडाच्या संसदेत प्रवेश केला. त्यानंतर 2019 सालीही त्यांनी विजय मिळवून खासदार म्हणून आपले स्थान मजबूत केले.
देशाच्या पुनर्बांधणीसाठी दृढनिश्चय
चंद्र आर्य यांनी आपल्या व्हिडिओ पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मी कॅनडाचा पुढचा पंतप्रधान होण्यासाठी प्रयत्न करत आहे. मला एक अशी कार्यक्षम सरकार तयार करायची आहे जी देशाची पुनर्बांधणी करेल आणि भविष्यातील पिढ्यांसाठी समृद्धी सुनिश्चित करेल.” ते म्हणाले की, “कॅनडाला सध्या अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो आहे, यावर तोडगा काढण्यासाठी ठोस आणि मोठे निर्णय घेण्याची गरज आहे.” चंद्र आर्य यांचे पंतप्रधानपदासाठी पुढे येणे हे भारतीय समुदायासाठी अभिमानाची बाब असून, त्यांच्या निर्णयाने कॅनडातील राजकारणात नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे.