सीरियात नवीन सरकारची नवी आश्वासने; स्थापना झाल्यानंतर देशवासियांना प्रगती अन् समृद्धीची वचने (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
दमास्कस: सीरियात बंडखोर गट हयात-तहरीर अल शाम चे प्रमुख अस-जुलानी यांनी नव्या सरकारच्या स्थापनेची घोषणा केली आहे. याचा उद्देश सीरियातील भष्ट्राचार मिटवणे आणि राष्ट्रीय एकता वाढवणे असल्याचे अल-जुलानी यांनी म्हटले आहे. अल-डुलानी यांनी सीरियाच्या उज्जवल भविष्यासाठी नवीन सरकार एकजूट होऊन कार्य करेल असे म्हटले आहे. राष्ट्रीय समस्यांना सामोरे जाण्यासाठी सरकारमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारीला प्राध्यन्य दिले जाईल अस अल-जुलानी यांनी म्हटले आहे.
अल-जुलानी यांनी हेही स्पष्ट केली की, नवीन सरकारचे प्रमुख लक्ष्य मानव संसाधनांचे संरक्षण करणे आणि त्याच्या विकास करणे असे. विशेष करुन युद्धाच्या काळात पलायान केलेल्या सीरियन नागरिकांना पुन्हा मायदेशी परत आणण्याचा प्रयत्न राहिल. नागरिकांना सरकारी भागीदारीत स्थान मिळेल, यामुळे प्रशासन आणि जनतेमध्ये पारदर्शक आणि उत्तरदायी व्यवस्था निर्माण होईल.
सीरियातील युवा पिढीला अधिक संध उपलब्ध व्हावी यासाठी अल-जुलानी यांनी एक विशेष युवा आणि क्रीडा मंत्रालय स्थापन करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय, शेतकऱ्यांना पाठिंबा देत त्यांच्यासाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे, देशातील उर्जा क्षेत्रात सुधारणा करुन अखंडित वीजपुरवठी लोकांना मिळवून देणे यासाठी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी म्हटले आहे.
शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही मोठी दल करण्यात येणार असल्याचे अल-जुलानी यांनी म्हटले आहे. अल-जुलानी यांनी सीरियाला दहशतवादी मुक्त बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी भष्ट्राचाराविरोधातही कठोर पावले उचलण्याचे आश्वासन नागरिकांना दिले आहे. तसेच, नैसर्गिक आणि मानवी संकटांना सामोरे देण्यासाठी आपत्कालीन व आपत्ती व्यवस्थापन मंत्रायलाची देखील स्थापना केली जाईल असे त्यांनी म्हटले आहे.
अल-जुलानी यांनी, सीरियामध्ये तंत्रज्ञानाच्या विकासाठी, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल परिवर्तनावरही भर देण्यात येईल असे म्हटले आहे. यासाठी सरकार संशोधने केंद्र उभारणार आहे. तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी नवे उपक्रमही राबवले जातील असे अल-जुलानी यांनी म्हटले आहे.
सीरियात असदच्या सत्तापालटानंतर विद्रोही गटाचे सरकार स्थापन होत आहे. यामुळे अनेकांना देशात दहशतवाद आणखी वाढण्याची भिती आहे. मात्र, अल-जुलानी यांच्या नवीन आश्वासनांमुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यामुळे सीरियाच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवीन सरकार निर्णयाक भूमिका बजावेल का हे पाहणे महत्तवाचे ठरणार आहे.