नवी दिल्ली – पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी कबूल केले आहे की आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) 1.2 अब्ज डॉलरच्या तिसऱ्या टप्प्याचे कर्ज देण्यासाठी अत्यंत कठोर अटी घातल्या आहेत. शरीफ म्हणाले- IMF ने ठेवलेल्या अटी आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त कठोर आणि धोकादायक आहेत, पण काय करावे? आमच्याकडे दुसरा पर्यायही नाही.
डॉलरच्या तुलनेत रुपया (पाकिस्तानी चलन) 274 झाले
फॉरेक्स रिझर्व्ह (परकीय चलनसाठा) फक्त 3.1 अब्ज डॉलर शिल्लक आहे. यापैकी 3 अब्ज डॉलर सौदी अरेबिया आणि यूएईचे आहेत. हे गॅरंटी डिपॉझिट आहेत, याचा अर्थ ते खर्च केले जाऊ शकत नाहीत. गुरुवारी महागाई दर 27.8% वर पोहोचला. सप्टेंबर 2022 मध्ये विदेशी कर्ज 130.2 अब्ज डॉलर होते. त्यानंतर ही आकडेवारी जाहीर झाली नाही. डॉलरच्या तुलनेत रुपया (पाकिस्तानी चलन) 274 झाले आहे.
काय म्हणाले शाहबाज ?
शाहबाज शरीफ एका टीव्ही चॅनलवर म्हणाले- मी तपशील तर सांगू शकत नाही, परंतु मी नक्कीच म्हणेन की आपल्या अर्थव्यवस्थेची स्थिती तुमच्या कल्पनेच्या पलीकडे आहे. IMFने कर्जासाठी अतिशय कठोर अटी घातल्या आहेत, पण त्या स्वीकारण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. शरीफ यांच्या विधानाची वेळ महत्त्वाची आहे. IMF टीम 31 जानेवारीला इस्लामाबादला पोहोचली आणि 9 फेब्रुवारीपर्यंत तिथे राहील. कर्जाचा हप्ता सोडण्यापूर्वी IMFला अनेक अटी पूर्ण करून घ्यायच्या आहेत.