• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Titanic Letter Sold For 341 Crore After 113 Years

टायटॅनिक बुडण्यापूर्वी लिहिलेले पत्र 3.41 कोटी रुपयांना विकले; 113 वर्षांनंतरही हृदयस्पर्शी आठवण

Titanic letter : जगाच्या इतिहासातील सर्वांत दुर्दैवी समुद्र अपघातांपैकी एक असलेल्या टायटॅनिक जहाजाच्या संदर्भात एक ऐतिहासिक घटना समोर आली आहे. २,२०० प्रवाशांपैकी ग्रेसी हे काही मोजक्या वाचलेल्यांपैकी एक होते.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 27, 2025 | 03:14 PM
Titanic letter sold for ₹3.41 crore after 113 years

टायटॅनिक बुडण्यापूर्वी एका प्रवाशाने एक पत्र लिहिले होते, ११३ वर्षांनंतर ते ३.४१ कोटी रुपयांना विकले गेले, त्यात इतके खास काय आहे? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Titanic letter auction : जगाच्या इतिहासातील सर्वांत दुर्दैवी समुद्र अपघातांपैकी एक असलेल्या टायटॅनिक जहाजाच्या संदर्भात एक ऐतिहासिक घटना समोर आली आहे. टायटॅनिक बुडण्यापूर्वी लिहिलेले एक पत्र युकेमध्ये झालेल्या लिलावात तब्बल ३.४१ कोटी रुपयांना (सुमारे £३००,०००) विकले गेले आहे. हे पत्र लिहिणारे प्रवासी होते कर्नल आर्चीबाल्ड ग्रेसी, जे त्या भीषण दुर्घटनेतून थोडक्याच अंतराने वाचले होते. १५ एप्रिल १९१२ रोजी टायटॅनिक उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले होते. या घटनेत सुमारे १५०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. २,२०० प्रवाशांपैकी ग्रेसी हे काही मोजक्या वाचलेल्यांपैकी एक होते.

भविष्यसूचक पत्राची महत्त्वपूर्ण कथा

हे पत्र १० एप्रिल १९१२ रोजी लिहिले गेले होते, ज्या दिवशी कर्नल ग्रेसी साउथहॅम्प्टन बंदरातून टायटॅनिकवर चढले होते. या पत्रात त्यांनी एका परिचिताला लिहिताना म्हटले होते की, “चांगल्या जहाजाबद्दल निर्णय देण्याआधी मी प्रवासाच्या शेवटपर्यंत वाट पाहीन.” विशेष म्हणजे, हे भविष्यसूचक वाक्य त्यांच्या पत्राचे सर्वांत खास वैशिष्ट्य ठरले आहे.

या पत्राने लिलावात अपेक्षेपेक्षा पाचपट अधिक किंमत मिळवली. विल्टशायरमधील हेन्री अल्ड्रिज अँड सन लिलाव गृहात एका अज्ञात खरेदीदाराने या ऐतिहासिक दस्तावेजाची खरेदी केली. हे पत्र केबिन C51 मधून लिहिले गेले होते आणि जहाज ११ एप्रिल रोजी आयर्लंडच्या क्वीन्सटाऊन बंदरावर थांबले असताना पोस्ट करण्यात आले होते. त्यावर १२ एप्रिलची लंडन पोस्टमार्किंगही आहे. लिलाव अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, टायटॅनिकवरील लिहिलेल्या कोणत्याही पत्रासाठी मिळालेली ही आजवरची सर्वाधिक किंमत आहे, जी या पत्राच्या ऐतिहासिक आणि भावनिक मूल्याचे प्रतीक आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भूकंपामुळे नाही, तर ‘या’ रहस्यमयी कारणांमुळे थरथरतेय धरती…’ संशोधनातून धक्कादायक गुढ उघड

टायटॅनिक अपघातातून कर्नल ग्रेसी कसे वाचले?

अपघाताच्या रात्री, टायटॅनिक हिमखंडाला धडकल्यानंतर जहाज जलद गतीने पाण्यात बुडू लागले. कर्नल ग्रेसी यांनी या भीषण प्रसंगात उलटलेल्या लाईफबोटमध्ये चढून आपला जीव वाचवला. परंतु बर्फाळ पाण्यात अनेक प्रवासी प्रचंड थंडी आणि थकव्यामुळे मृत्युमुखी पडले. ग्रेसीही या भीषण प्रसंगातून वाचले, परंतु हायपोथर्मिया आणि दुखापतींमुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला.

टायटॅनिकच्या दुर्घटनेनंतर काही महिन्यांतच, कर्नल ग्रेसी यांनी आपल्या अनुभवावर आधारित “द ट्रुथ अबाउट द टायटॅनिक” हे पुस्तक लिहिले, ज्यात त्यांनी जहाजाच्या बुडण्याचा थरारक अनुभव तपशीलवार मांडला. मात्र त्यांच्या प्रकृतीत आलेल्या घसरामुळे ते डिसेंबर १९१२ मध्ये कोमात गेले आणि २ डिसेंबर १९१२ रोजी मधुमेहाच्या गुंतागुंतीमुळे निधन पावले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानमध्ये कलम 144 लागू; नक्की का आणि काय आहे यामागचे खरे कारण?

टायटॅनिकची आठवण आणि मानवी भावना

आजही टायटॅनिकच्या अपघाताच्या आठवणी लोकांच्या मनात ताज्या आहेत. कर्नल ग्रेसी यांचे पत्र म्हणजे त्या काळातील भयावहतेची आणि मानवी जिद्दीची जिवंत साक्ष आहे. ११३ वर्षांनंतरही, टायटॅनिकच्या कथांनी आणि त्या काळच्या जिवंत पुराव्यांनी जगाला भावनिक करून सोडले आहे.  या ऐतिहासिक पत्राच्या यशस्वी विक्रीने पुन्हा एकदा सिद्ध केले की, मानवी भावना, इतिहासाची साक्ष आणि शौर्यकथा या अनमोल ठेव्याला कोणतीही किंमत मोजता येत नाही.

Web Title: Titanic letter sold for 341 crore after 113 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2025 | 03:14 PM

Topics:  

  • day history
  • special story
  • Titanic Ship

संबंधित बातम्या

Ayyappan: भगवान शिव आणि विष्णुच्या पुत्राची जन्मकथा, काय आहे रहस्य?
1

Ayyappan: भगवान शिव आणि विष्णुच्या पुत्राची जन्मकथा, काय आहे रहस्य?

जेव्हा मृत्यूचा देवता ‘यमराज’ स्वतः मरण पावला… काय झालं पुढे? जाणून घ्या मृत्यूशी जोडलेली कथा
2

जेव्हा मृत्यूचा देवता ‘यमराज’ स्वतः मरण पावला… काय झालं पुढे? जाणून घ्या मृत्यूशी जोडलेली कथा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वाढता सायबर फ्रॉड थांबवण्यासाठी टेलिकॉम विभाग लागू करणार नवे नियम! या कंपन्यांना करावे लागणार मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन

वाढता सायबर फ्रॉड थांबवण्यासाठी टेलिकॉम विभाग लागू करणार नवे नियम! या कंपन्यांना करावे लागणार मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन

Oct 25, 2025 | 11:36 AM
मुंबई विमानतळावरून वन्यप्राण्यांची तस्करी; एक-दोन नव्हेतर तब्बल 154 प्राणी जप्त

मुंबई विमानतळावरून वन्यप्राण्यांची तस्करी; एक-दोन नव्हेतर तब्बल 154 प्राणी जप्त

Oct 25, 2025 | 11:32 AM
भाजपवाले विरोधकांच्या बाथरुममध्येही कॅमेरे लावतील, कारण ते…; काँग्रेसच्या बड्या नेत्याची टीका

भाजपवाले विरोधकांच्या बाथरुममध्येही कॅमेरे लावतील, कारण ते…; काँग्रेसच्या बड्या नेत्याची टीका

Oct 25, 2025 | 11:32 AM
Golden Buddha Statue: तब्बल २०० वर्षे मातीत गाडली गेली होती ५५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती; पाहा कुठे आहे ही मूर्ती?

Golden Buddha Statue: तब्बल २०० वर्षे मातीत गाडली गेली होती ५५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती; पाहा कुठे आहे ही मूर्ती?

Oct 25, 2025 | 11:31 AM
Vitamin B-12 च्या कमतरतेमुळे थकवा वाढला आहे? मग आहारात करा ‘या’ हिरव्या पानांचे सेवन, कायमच राहाल फिट आणि हेल्दी

Vitamin B-12 च्या कमतरतेमुळे थकवा वाढला आहे? मग आहारात करा ‘या’ हिरव्या पानांचे सेवन, कायमच राहाल फिट आणि हेल्दी

Oct 25, 2025 | 11:27 AM
Mumbai Local Mega Block : लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य आणि पश्चिम मार्गावरील लोकल सेवांवर होणार परिणाम

Mumbai Local Mega Block : लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य आणि पश्चिम मार्गावरील लोकल सेवांवर होणार परिणाम

Oct 25, 2025 | 11:26 AM
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपकडून तयारी सुरु; महायुतीच्या कार्यकर्त्यांना दिल्या ‘या’ सूचना

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपकडून तयारी सुरु; महायुतीच्या कार्यकर्त्यांना दिल्या ‘या’ सूचना

Oct 25, 2025 | 11:18 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Mumbai : दिवाळीत परंपरेचा सोहळा, शाश्वत कॉम्प्लेक्समध्ये मातीच्या किल्ल्याने वेधले सर्वांचे लक्ष

Mumbai : दिवाळीत परंपरेचा सोहळा, शाश्वत कॉम्प्लेक्समध्ये मातीच्या किल्ल्याने वेधले सर्वांचे लक्ष

Oct 24, 2025 | 08:22 PM
Sawantwadi :  दीपक केसरकरांच्या उपस्थितीत अजय गोंदावले सेनेत दाखल

Sawantwadi : दीपक केसरकरांच्या उपस्थितीत अजय गोंदावले सेनेत दाखल

Oct 24, 2025 | 08:16 PM
Bhiwandi : आदिवासी आश्रम शाळेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांचे ‘राजभवन’कडे पायी बिऱ्हाड आंदोलन

Bhiwandi : आदिवासी आश्रम शाळेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांचे ‘राजभवन’कडे पायी बिऱ्हाड आंदोलन

Oct 24, 2025 | 07:50 PM
Ahilyanagar : सोनई मारहाण प्रकरणाला नवे वळण, गुन्हेगार संजय वैरागरवर SIT चौकशीची मागणी

Ahilyanagar : सोनई मारहाण प्रकरणाला नवे वळण, गुन्हेगार संजय वैरागरवर SIT चौकशीची मागणी

Oct 24, 2025 | 07:23 PM
Bhayandar : समाजसेविकेच्या सतर्कतेमुळे समोर आले अमली पदार्थांचे रॅकेट

Bhayandar : समाजसेविकेच्या सतर्कतेमुळे समोर आले अमली पदार्थांचे रॅकेट

Oct 24, 2025 | 07:16 PM
Navi Mumbai : पैसे घेऊन मतदार यादीत नाव नोंदवणारे अधिकारी कोण? मनसेने घेतली पोलीस आयुक्तांची भेट

Navi Mumbai : पैसे घेऊन मतदार यादीत नाव नोंदवणारे अधिकारी कोण? मनसेने घेतली पोलीस आयुक्तांची भेट

Oct 24, 2025 | 07:02 PM
Sindhudurg : दिवाळीनिमित्त मळगावात साकारली किल्ले रायगडची हुबेहूब प्रतिकृती

Sindhudurg : दिवाळीनिमित्त मळगावात साकारली किल्ले रायगडची हुबेहूब प्रतिकृती

Oct 23, 2025 | 07:47 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.