कॅनडात गँगवॉरचा थरार! भारतीय वंशाच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या; प्रकरणाची चौकशी सुरु (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
हे देखील वाचा : कॅनडात भारतीय तरुणीवर प्राणघातक हल्ला ; चाकूने तीव्र वार अन्…
बर्नाबीच्या पोलिसांनी दिलेल्या वृत्तानुसार, दिलराज सिंग गिल (वय २८) अशी या तरुणाची ओळख पटवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २२ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास ही घटना घडली. कॅनडा वेच्या ३७०० ब्लॉकजवळ एक तरुण जखमी अवस्थेत असल्याची तक्रार पोलिसांनी मिळाली होती. यानंतर माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
पोलिसांनी या प्रकरणाचा संबंध गँगवॉरशी असल्याचा दावा केला आहे. कारण पोलिसांनी दिलराज ज्या ठिकाणी सापडला तिथे एक जळलेली कारही आढळली आहे. पोलिसांच्या मते, या जळलेल्या कारचा आणि दिलराजच्या हत्येचा संबंधआहे. सध्या इंटिग्रेटेड होमिसाईड इन्व्हेस्टिगेशन टीम (IHIT) या हत्येचा तपास करत आहे. सध्या फॉरेन्सिक टीम आणि तपास अधिकारी पुरावे गोळा करत आहेत.
प्राथमिक तपासानुसार, टोळीशी भांडण झाल्याच्या वादातून दिलराजची हत्या झाली आहे. दिलराजच्या सिंग गिलची हत्या इंडो-कॅनेडियन व्यक्ती नवप्रीत धालीवालच्या हत्येशी जोडली जात आहे. जानेवारी २०२६ च्या सुरुवातील नवप्रीतची ॲबॉट्सफोर्डमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हा हल्ला देखील गॅंगवॉरशी संबंधित असल्याचे पोलिसांनी म्हटले होते. यामुळे दिलराजच्या प्रकरणाचा देखील गँगवॉरशी संबंध अल्याचे म्हटले जात आहे.
गेल्या काही वर्षात कॅनडात भारतीयांविरोधात हिंसक घटनां प्रचंड वाढल्या आहेत. यामुळे कॅनडाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच कॅनडातील भारतीय नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
हे देखील वाचा : कॅनडात प्रशिक्षणादरम्यान दोन विमानांची जोरदार टक्कर; भारतीय वंशाच्या विद्यार्थी पायलटचा अपघातात मृत्यू
Ans: कॅनडाच्या बर्नाबी येथे भारतीय वंशाच्या तरुणाची २२ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी ५.३० सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
Ans: बर्नाबीच्या पोलिसांनी दिलेल्या वृत्तानुसार, दिलराज सिंग गिल (वय २८) अशी या तरुणाची ओळख पटवण्यात आली आहे.
Ans: दिलराज सिंग गिल हत्येचा संबंध गँगवॉरशी जोडला जात आहे.






