Trump On US SC: 'अब्जावधी डॉलर्स परत करावे लागतील!' टॅरिफच्या निर्णयापूर्वी ट्रम्प यांचे टेन्शन वाढले (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Trump Supreme Court tariff ruling 2026 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या दुसऱ्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी आपल्या यशाचा पाढा वाचला खरा, पण एका महत्त्वाच्या मुद्द्यावर त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे चिंता दिसून आली. ती चिंता म्हणजे ‘अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा टॅरिफवरील निकाल’. ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत कबुली दिली की, जर सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या टॅरिफ धोरणाविरुद्ध निकाल दिला, तर अमेरिकेला गेल्या वर्षभरात कमावलेले अब्जावधी डॉलर्स व्याजासह परत करावे लागतील, ज्यामुळे देशाच्या तिजोरीवर मोठा ताण येऊ शकतो.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारताच ‘लिबरेशन डे’ (२ एप्रिल २०२५) अंतर्गत जगातील अनेक देशांतील वस्तूंवर १०% ते ५०% पर्यंत आयात शुल्क (Tariffs) लादले होते. यामध्ये भारत, चीन, ब्राझील आणि युरोपीय देशांचा समावेश होता. ट्रम्प यांनी यासाठी १९७७ च्या ‘आंतरराष्ट्रीय आणीबाणी आर्थिक अधिकार कायद्याचा’ (IEEPA) आधार घेतला होता. मात्र, अमेरिकेतील १२ राज्यांनी आणि अनेक लघु व्यावसायिकांनी याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांचा दावा आहे की, टॅरिफ लावण्याचा अधिकार काँग्रेसचा (संसद) आहे, राष्ट्राध्यक्षांचा नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘Mr President, F*** Off…’ युरोपियन संसदेत हाय व्होल्टेज ड्रामा! डॅनिश खासदाराने Trumpची काढली खरडपट्टी; पहा VIDEO
मंगळवारी ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “मला माहित नाही की सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेईल. पण जर हा खटला आमच्या विरोधात गेला, तर आम्हाला टॅरिफमधून जमा केलेले १२० ते १३० अब्ज डॉलर्स परत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील. हे काम अत्यंत कठीण आणि गोंधळाचे असेल.” कायदेतज्ज्ञांच्या मते, जर न्यायालयाने ट्रम्प यांचे निर्णय असंवैधानिक ठरवले, तर हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक परतावा (Refund) ठरेल.
JUST IN: 🇺🇸 Supreme Court may force President Trump to refund over $133 billion in tariff revenue. pic.twitter.com/Glx8iZmjB3 — Watcher.Guru (@WatcherGuru) January 6, 2026
credit – social media and Twitter
याच पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी आपला मोर्चा मिनेसोटा राज्याकडे वळवला. कोणताही ठोस पुरावा न देता त्यांनी दावा केला की, मिनेसोटामध्ये १९ अब्ज डॉलर्सचा मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे आणि हा पैसा ‘सोमालियन’ लोकांनी लुटला आहे. ट्रम्प यांनी सोमालियावर टीका करताना म्हटले, “सोमालिया हा खरं तर देशही नाही; जर तो देश असेल तर तो जगातील सर्वात वाईट देश आहे.” त्यांच्या या विधानामुळे अमेरिकेतील सोमालियन समुदायात आणि मानवाधिकार संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Trade: भारतावर 500% टॅरिफ लागणार नाही! Trumpच्या मंत्र्यांचा मोठा खुलासा; रशियन तेलाच्या मुद्द्यावर ‘या’ देशाला शिकवणार धडा
परराष्ट्र धोरणावर बोलताना ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो यांना पकडण्याच्या मोहिमेचे समर्थन केले. “व्हेनेझुएला आता आमच्या नियंत्रणात आहे आणि आम्ही तिथल्या तेल उद्योगाचा विकास करून अमेरिकन कंपन्यांना फायदा मिळवून देऊ,” असे ते म्हणाले. त्यांनी जुन्या ‘मनरो डॉक्ट्रिन’ला बदलून स्वतःच्या नावावर ‘डॉनरो डॉक्ट्रिन’ असे नाव दिले असून, पश्चिम गोलार्धात अमेरिकेचे वर्चस्व कोणीही आव्हावू शकणार नाही, अशी गर्जना केली.
Ans: ट्रम्प यांनी संसदेच्या मंजुरीशिवाय आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करून आयात शुल्क लावले आहे, ज्याला १२ राज्यांनी असंवैधानिक ठरवत कोर्टात आव्हान दिले आहे.
Ans: सरकारला आतापर्यंत वसूल केलेले सुमारे १३० अब्ज डॉलर्स संबंधित कंपन्या आणि देशांना परत करावे लागतील, ज्यामुळे अर्थव्यवस्थेत गोंधळ उडू शकतो.
Ans: ट्रम्प यांनी सोमालियाला "जगातील सर्वात वाईट देश" म्हटले असून, मिनेसोटातील १९ अब्ज डॉलर्सच्या घोटाळ्यासाठी सोमालियन स्थलांतरितांना जबाबदार धरले आहे.






