ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात दरार? इराण अणु चर्चेवरुन दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरुन चर्चेत असतात.अलीकडच्या काळात सत्तेत आस्यानंतर त्यांच्या अनेक आक्रमक निर्णयांमुळे ट्रम्प चर्चेचा विषय ठरले आहेत. तसेच ट्रम्प यांनी आपल्या अनेक विधानांमुळे आणि निर्णयांमुळे इतर देशांशी शत्रूत्व घेतले आहे.
ट्रम्प यांच्या ओव्हल ऑफिसमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांच्याशी झालेल्या वादानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंशी जोरदार वादविवाद झाला आहे. यामुळे जागतिक स्तरावर अनेकांना आश्चर्य वाटले आहे.
खरतर इस्रायलचे पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळचे मानले जातात. ट्रम्प यांनी गाझातील हमासविरोधीच्या कारवायांमध्ये नेहमीच इस्रायलला साथ दिली आहे. तसेच हुथी बंडखोरांवरी हल्ल्यांमध्येही. पण यावेळी ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू यांच्यात इराणसोबतच सुरु असलेल्या अणु चर्चेवरुन वाद झाला असल्याचे म्हटले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, केहरानला अण्वस्त्रे मिळवण्यापासून रोखण्याच्या प्रयत्नांवर दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद झाले आहेत.
नुकतेच डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू यांच्यात इराण अणु प्रकल्पावर फोनवर दीर्घ संवाद झाला. या दरम्यान ट्रम्प यांनी म्हटले की, इराणी लोकांसोबत राजनैतिक मार्गानो तोडगा काढला पाहिजे, मला विश्वास आहे की एक चांगला करार होईल.” परंतु यानंतर बेंजामिन नेतन्याहू यांनी याला नकार दिला. ट्रम्प यांनी असेही सांगितले की, दोन्ही पक्षांच्या हितासाठी डोनाल्ड ट्रम्प उपयुक्त पर्याय शोधत आहे. परंतु बेंजामिन नेतन्याहूंना अमेरिकेचे इराणशी चांगले संबंध प्रस्थापित व्हावे असे वाटत नाही. सध्या गेल्या काही काळापासून ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू यांच्यामध्ये दूरावा निर्माण झाला आहे. मध्य पूर्व देशांच्या दौऱ्यादरम्यान ट्रम्प यांनी इस्रायलला भेट दिली नव्हती.
गेल्या काही काळापासून ट्रम्प यांनी अनेक जागतिक नेत्यांशी शत्रूत्व घेतले आहे. यामध्ये झेलेन्स्की, रामाफोसा आणि ट्रुडो यांच्यासोबतही ट्रम्प यांचे वाद झाले आहेत. तसेच अमेरिका आणि भारतामध्येही पाकिस्तानसोबतच्या युद्धबंदीवरुन वाद झाला आहे. ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय स्वत:ला दिले होते. परंतु भारताने याला नकार दिला. यामुळे ट्रम्प भारतविरोधी भूमिका घेत आहेत.
तसेच गोल्डन डोम या योजनेमुळे चीन, रशिया आणि उत्तर कोरिया देखील नाराज आहे.उत्तर कोरियाचे किम जोंग उन यांनी ट्रम्प यांनी योजना मागे घेण्यास सांगितली आहे. असे न केल्यास अणु युद्धाची धमकी दिली आहे. तर चीनने यामुळे जागतिक अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.