वॉशिंग्टनमधील इस्रायली दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; आरोपी संबंधी महत्त्वाची माहिती उघड (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसीमध्ये बुधवारी रात्री (२१ मे) इस्रायली दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली होती. यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी संताप व्यक्त केला होता. या घटनेने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली होती. दरम्यान या प्रकरणासंबंधी आणखी एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
संबंधित प्रकरणात वॉशिंग्टन डीसीच्या पोलिसांनी संशयिताल अटक केली आहे. या आरोपीचे नाव एलियास रॉड्रिग्ज आहे. या हल्ल्यावेळी एलियासने फ्री पॅलेस्टिनीच्या घोषणा दिल्या होती. बुधवारी २१ मे च्या रात्री वॉशिंग्टन डी. सी. येथील यहूदी संग्रहालयाजवळ ही घटना घडली. इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबारात यारोन लिस्चिंस्की आणि सारा लिन मिलग्रिम हे दोनइस्रायली दूतावासाचे कर्मचारी मारले गेले.
या घटनेनंतर आरोपीने मोठा खुलासा केला आहे. आरोपी रॉड्रिग्जने एका कथित मॅनिफेस्टोचा खुलासा केला आहे. या हल्ल्याचा संबंध गाझातील पॅलेस्टिनी लोकांच्या मृत्यूशी असल्याचे आरोपीने म्हटले आहे. या मॅनिफेस्टोनुसार, गाझातील हत्याकांडामुळे आरोपी दु:खी झाला होता. यामुळे इस्रायलकडून पॅलेस्टिनींनवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांविरोधात तो संतप्त झाला. त्याने म्हटले की, गेल्या काही महिन्यात इस्रायलच्या हल्ल्यात हजारो लोकांच्या मृत्यू झाला, याची गणना करणे देखील कठीण आहे. गाझा आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ५० हजारांहून अधिक लोक मारले गेले आणि अद्याप हजारो लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहे.
The suspect in the shooting of two Israeli embassy staffers has reportedly written a manifesto, (linked below) framing the act as political protest against “our brutal conduct in Palestine.” The suspect has been identified as Elias Rodriguez, a 30-year-old man from Chicago.
— WikiLeaks (@wikileaks) May 23, 2025
आरोपीने सोशल मीडियावरही अमेरिकेचा नाश व्हावा, इस्रायलचा अंत व्हावा अशी यहूदीविरोधी पोस्ट केल्याचा खुलासा करण्यात आला आहे. यावरुन हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले जात आहे. आरोपी रॉड्रिग्ज हा शिकागोमध्ये पार्टी फॉर सोशलिजम ॲंड लिबरेशन (PSL) या डाव्या विचारसणीच्या संघटनेशी जोडलेला आहे. परंतु या घटनेनंतर संघटनेने स्पष्ट केले की, २०१७ साली त्यांनी आरोपी रॉड्रिग्जशी संबंध तोडले होते. तसेच हा हल्ला हमास संबंधी असल्याचेही म्हटले जात आहे.
या घटनेनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी संताप व्यक्त केला होता. तसेच अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाकडे योग्य न्यायाची मागणी केली होती. दरम्यान हा हल्ला राजकीय उद्देशाने घातक असल्याचे मानले जात आहे.सध्या या घटनेची सखोल चौकशी सुरु आहे.