प्रेम केलं म्हणून मृत्यूदंड? बलुचिस्तानमध्ये जमातीच्या विरोधात गेल्याने जोडप्याची निर्घृण हत्या, VIDEO (फोटो सौजन्य: सोशल मीडिया )
इस्लामाबाद : पाकिस्तानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बलुचिस्तान प्रातांत एक ऑनर किलिंगचा प्रकार घडला आहे. एका महिला आणि पुरुषाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मे २०२५ मध्ये बलुचिस्तानच्या राजधानी क्वेटाजवळ ही घटना घडली. या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर देशभर संतापाचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान या प्रकरणामध्ये एक मोठी माहिती समोर आलेली आहे. हत्येमध्ये सहभागी आसलेल्या १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे यामध्ये आका आदिवासी नेत्याचाही समावेश आहे. ही हत्या , ही हत्या ऑनर किलिंगच्या नावाखाली करण्यात आली आहे. स्थानिक जिरगा आदिवासी परिषदेने या हत्येचा निर्णय दिला होता. पीडीत महिला बानो बीबीने तिच्या कुटुंबाच्या विरोधात आणि जमातीच्या विरोधात जाऊन एहसान एहसान उल्लाहसी प्रेमसंबंध ठेवल्याने ही हत्या करण्यात आली.
या हत्येला मानवाधिकार संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. सध्या या हत्येचा भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये पीडितांना अगदी जवळून गोळ्या झाडल्या गेल्याचे दृश्य दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा एक सुनियोजित हत्याकांड होता, जो परंपरेच्या नावाखाली करण्यात आला. सध्या या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली जात आहे. याअंतर्गत कारवाई देखील सुरु करण्यात आले आहे.
#HonorKilling
The victim’s last words: “Only shooting is allowed.” With such confidence and dignity, she stood fearless in the face of death. She neither begged for life nor pleaded for mercy.
By God, she became immortal through her death.#Balochistan pic.twitter.com/ZCqquHYTTV— Zulfiqar Ali Ghazi (@AgroXperts) July 20, 2025
दरम्यान आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे या हत्येतमध्ये पीडित महिला बानो बीबीचा भाऊ देखील सामील असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सध्या तो फरारा असून त्याचा शोध सुरु आहे. याशिवाय स्थानिक आदिवासी नेते सरदार शेरबाज खान यांनी हत्येचा आदेश दिला होता असे पोलिसांनी म्हटले आहे. यामध्ये १३ जणांना अटक करण्यात आली असून आणखी लोकांना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
याच वेळी पाकिस्तानच्या पीपील्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी संशयितांना प्राणी म्हटले आहे. तसेच सर्वांना शिक्षा होईल, कोणत्याही प्रकारची सूट दिली जाणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच बलुच कार्यकर्ते समी दीन बलोच यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे.पाकिस्तानमध्ये आतापर्यंत ५४७ ऑनर किलिंगची प्रकरणे घडली आहेत.