नवी दिल्ली – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलन मस्क गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत . त्यांच्या चर्चेचे कारण आहे, त्यांनी नुकतीच ट्विटरची केलेली डील. ट्विटरची सत्ता हाती घेताच मस्क यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा धडाका लावला. तसेच कंपनीचे बोर्ड देखील बरखास्त केले. अशातच चक्क एलन मस्क यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कारण, त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून चक्क भोजपुरी भाषेत पोस्ट केल्या जात आहे.
या सर्व प्रकाराने नेटकरी म्हणाले की, ट्विटरचे प्रमुख एलन मस्क यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले की काय? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. अर्थात असे विचारणे देखील साहजिकच आहे. कारण एलन मस्क यांच्या अकाऊंटवरून भोजपुरी भाषेतील ट्विट पोस्ट केल्या जात आहे. अर्थात असे तर मुळीच होणार नाही की, एलन मस्क रात्रीतूनच हिंदी आणि भोजपुरी भाषा शिकले असतील. बर भाषा शिकली असेल असेही मान्य केले तरी ते भोजपुरी भाषेतील गाणे कशाला पोस्ट करतील. दरम्यान, हा सगळा प्रकार एका ट्विटर अकाऊंटवरून केला जात असल्याचे समोर आले आहे.