संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी UNGA च्या उद्घाटनाच्या भाषणात मोठे विधान केले . त्यांनी म्हटले की, जग बहु-केंद्रित (Multiple World) देशाच्या दिशेने वाटचाल करत आहे. पण यामुळे जागतिक पातळीवर अस्थिरता वाढत आहे. जरी नव्या शक्तींचा उगम होत असला तर त्यांना नियंत्रित करण्यासाठी सक्षम आणि न्यायपूर्ण समावेशी संस्थेची आवश्यकता आहे.
त्यांनी पुढे म्हटले की, नव्या बहु-केंद्रित व्यवस्थेत जागतिक संस्था, UN, WTO, आंतरराष्ट्रीय न्यायालय सक्षम, निष्पक्ष आणि विश्वासार्ह असणे गरजेचे आहे. तसेच आंतरराष्ट्रीय कायदे, न्याय, विकास, पर्यावरणीय धोरणे, अन्न सुरक्षा,शिक्षण आणि आरोग्य या मुद्द्यांवरही सर्व देशांनी सहमती ठेवणे गरजेचे आहे.
या अधिवेशनात अनेक देशांनी आपली स्वतंत्र भूमिका मांडली आहे. उदाहरणार्थ फ्रान्सने पॅलेस्टिईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. तसेच ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पोर्तुगाल, देखील या दिशेने पाऊल उचलले आहे. परंतु अमेरिका, इस्रायल आणि इटली या देशांनी अद्याप मान्यता दिलेली नाही. पण यावरुन लक्षात येते की पाश्चात्या देशांमध्ये एकता राहिलेली नाही. प्रत्येक देश स्वतंत्र धोरणे स्वीकारत आहे.
शिवाय अमेरिकेचे वर्चस्व देखील संपुष्टात येताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधी परराष्ट्र धोरणांमुळे मेक द अमेरिका ग्रेट अगेनच्या स्थितीतला धक्का बसला आहे. अमेरिकाला साथ देणारे देशही त्याच्याविरोधात गेले आहेत. यामुळे अमेरिका अधोगतीच्या मार्गावर आहे. सध्या बहु-केंद्रित जगातमध्ये चीन, रशिया, भारत, युरोपियन यूनियन, ऑफ्रिका आणि लॅटिन अमेरिकन देशांचे सामर्थ वाढत आहे. मात्र यामध्ये अमेरिकेचे वर्चस्व गायब झाल्याचे दिसत आहे.
याशिवाय ग्लोबल साऊथच्या विकसनशील देशांनी देखील मानवी हक्क, युद्ध आणि सुरक्षा यांसारख्या प्रस्तावर पाश्चात्य देशाच्या दबावाला न जुमानता स्वतंत्र मतदान केले आहे.हे एक धोरणात्मक स्वांतत्र्याचे उदाहरण आहे. याचे एक उदाहरण म्हणजे अमेरिकेने भारतावर रशियाकडून तेल खरेदी बंद करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. पण भारत अमेरिकेच्या दबावाला बळी पडला नाही. भारताने राष्ट्रीय हितासाठी आणि जागतिक स्थरितेसाठी रशियाकडून तेल खरेदी करत असल्याची आपली भूमिका स्पष्ट केली. यावरुन पाश्चत्य देश अमेरिका आता मागे पडत असल्याचे लक्षात येते.
अमेरिकेचे वर्चस्व खरंच धोक्यात आहे का?
अनेक तज्ज्ञांच्या मते, अमेरिका अजनूही महाशक्ती देश आहे, पण ट्रम्प यांच्या विरोधी परराष्ट्र धोरणामुळे, तसेच नव्या देशांच्या स्वंतत्र भूमिकेमुळे अमेरिकेचे वर्चस्व कमी होताना दिसत आहे.
काय आहे Multipolar World?
Multipolar World चा अर्थ बहुकेंद्रित देश असा होतो. म्हणजेच सत्ता किंवा सामर्थ आता एका देशापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर अनेक जागतिक केंद्रामध्ये वाढत आहे.
UNGA मध्ये कोणते बदल दिसून आले?
यंदाच्या UNGA सत्रात अनेक पाश्चत्य देश स्वताची स्वतंत्र भूमिका मांडताना दिसले, युरोपीय देशांमध्ये मतभेद पाहायला मिळाले. तसेच अनेक देशांनी पाश्चत्य देशांच्या दबावाला बळी न पडता आपली भूमिका मांडली.
बॅंकॉकच्या रस्त्यावर अचानक पडला खड्डा; विजेच्या खांबासह तीन गाड्या झाल्या जमिनदोस्त, Video Viral






