युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि डोनाल्ड ट्रम्प ( फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉश्गिंटन: अलीकडे रशिया-युक्रेन संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे. तसेच दुसरीकडे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, रशियाचे हल्ले थांबवण्यासाठी युक्रेनने तडजोड करणे आवश्यक आहे. ट्रम्प यांनी इशारा दिला आहे की, ट्रम्प यांनी रशियाने युक्रनेचे काबीज केलेले प्रदेश कायदेशीर करण्यासाठी करार करण्यास सांगितले आहे.
फ्लोरिडातील मार-ए-लागो क्लबमध्ये झालेल्या एका परिषदेदरम्यान ट्रम्प यांनी म्हटले की युक्रेनचे अध्यक्ष वोल्डिमिर झेलेन्स्की यांनी युद्ध संपवण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणावर होणारे जीवितहानी थांबवण्यासाठी तडजोडीस तयार राहिले पाहिजे. तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युद्ध संपवण्यसाठी आपली तयारी दर्शवली आहे.
पुनर्बांधणीसाठी शतके लागतील
डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या शहरांचा उल्लेख करताना म्हटले की, या शहरांचे पुनर्निर्माण करणे हा एक शतकभराचा मोठा प्रकल्प असेल. त्यांनी असेही नमूद केले की, युक्रेनने कबीज केलेल्या प्रदेशांना पुन्हा मिळवण्याची शक्यता खूपच कमी आहे. “अधिकांश शहरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, आणि या शहरांना पुन्हा उभे करणे हे जवळपास अशक्यप्राय काम आहे,” असे ते म्हणाले.
बायडेन प्रशासनावर टिका
याशिवाय, ट्रम्प यांनी बायडेन प्रशासनाच्या धोरणांवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी बायडेन प्रशासनाने युक्रेनला आर्मी टॅक्टिकल मिसाइल सिस्टम्स (ATACMS) च्या वापराची परवानगी दिल्याचा निर्णयाला मूर्खपणा म्हटले आहे. ट्रम्प यांच्या मते, रशियाच्या आतल्या भागांवर असे हल्ले करणे चुकीचे आहे. त्यांनी सांगितले की, त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची सुत्रे हातात घेतल्यावर असे हल्ले होणार नाहीत आणि रशिया-युक्रेन युद्ध थांबेल.
ट्रम्प यांच्या विधानाची जागतिक स्तरांवर चर्चा सुरु
डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्याच्या परिस्थितीत युक्रेनला शांततेसाठी वाटाघाटी करण्याचे महत्त्व पटवून दिले आहे. त्यांच्या मते, युक्रेनने देश पुन्हा मिळवण्याचा हट्ट धरल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. “जेव्हा तुम्ही म्हणता की देश परत मिळवा, तेव्हा प्रत्यक्षात तुम्हाला काय परत मिळणार आहे? बहुतेक शहरे उद्ध्वस्त आहेत, एकही इमारत उभी नाही,” डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
याच युद्धाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या या विधानांना व्यापक राजकीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे म्हटले की, त्यांच्या नेतृत्वाखाली रशिया-युक्रेन युद्ध टाळता येईल. यामुळे युद्ध संपवण्यासाठी त्यांचा दृष्टिकोन काय असेल याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे.
इतर काही मुद्द्यांवर भाष्य
याव्यतिरिक्त ट्रम्प यांनी ट्रम्प यांनी गाझा युद्ध, आणि भारताविरुद्ध काही मुद्द्यांवर चर्चा केली आहे. त्यांनी भारताला इशारा दिला आहे की, त्यांनी भारताला परस्पर कर(रेसिप्रोकल टॅक्स) लादण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी भारतावर आरोप करत म्हटले आहे की, भारत अमेरिकनवस्तूंवर जास्त कर लदतो तसेच अमेरिका देखील भारतीय वस्तूंवर कर लादेल. तसेच, गाझातील बंधकांना 20 जानेवारीपर्यंत सोडवण्याची मागणी हमासकडे केली.