Torpedo Attack : 'अमेरिकेला सर्वांना ठार कारयाचे होते' ; IRIS Dena वरील हल्ल्यातून वाचलेल्या इराणी नाविकाने सांगितला थरारक अनुभव (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
०४ मार्च २०२६ रोजी इराणची विनाशकारी IRIS Dena युद्धनौका श्रीलंकेच्या सागरी हद्दीत बुडाली होती. यावेळी ही युद्धनौका भारताच्या विशाखापट्टण येथे नौदल सरावात झाल्यावर इराणच्या दिशेने परतत होती. परंतु अचानक श्रीलंका आणि भारताच्या सागरी सीमेजवळ एका अमेरिकन पाणबुडीने जहाजावर हल्ला केला. या हल्लात १०४ क्रू मेंबर्सपैकी ८४ जवानांना आपला जीव गमवावा लागला. कोणत्याही चिथावणीशिवाय झालेल्या या हल्ल्यामुळे इराणने तीव्र संताप व्यक्त केला होता.
दरम्यान मोमेनेह यांनी सांगितले की अमेरिकेने जहाजावर क्रू मेंबर्सची संख्या जास्त असलेल्या भागावर हल्ला केला होता. त्यांच्या मते, अमेरिकन सैन्याला केवळ जहाज उद्ध्वस्त करायचे नव्हते, तर सर्व इराणी सैनिकांचा नरसंहार करायचा होता. त्यांनी सांगितले की, पहाटे ३ ते ३.३० च्या सुमारास जवान कर्तव्यावर तैनात असताना हल्ला झाला होता. हल्ल्यापूर्वी कोणतीही पूर्वसुचना देण्यात आली होती. त्यांच्यावर थेट टॉरपीडोचा मार करण्यात आला होता. त्यांनी अमेरिकेच्या या हल्ल्याला आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लघंन संबोधत एकतर्फी आणि अन्याकारक म्हटले. या हल्ल्यानंतरही इराणच्या सैनिकांनी जहाजे सोडली नव्हती, त्यांनी शेवटपर्यंत लढा दिला हेही स्पष्ट केले.
A narrative of an unjust attack by the United States on the IRIS Dena warship in the Indian Ocean “Hamed Momeneh,” one of the sailors on the Dena warship: This vessel had been sent to the port of Visakhapatnam in India to take part in a naval exercise. While returning home, and… pic.twitter.com/yFmk8Hwf1N — Iran in India (@Iran_in_India) April 19, 2026
Ans: IRIS Dena वर ४ मार्च २०२६ रोजी हिंद महासागता भारत आणि श्रीलंकेच्या सागरी सीमेजवळ आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात हल्ला झाला होता.
Ans: या हल्ल्याची वेळ जहाजेवर एकूण १०४ कर्मचारी होते. यातील ८४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
Ans: IRIS Dena वरील हल्ल्यातून वाचलेल्या हमीद मोमेनेह याच्या मते, अमेरिकन हल्ल्याचा उद्देश केवळ जहाज उद्ध्वस्त करणे नव्हता, तर सर्व जवानांना ठार मारण्याचा प्रयत्न देखील होता.






