मोठी बातमी ! डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या टॅरिफला 90 दिवसांची स्थगिती; चीनवर मात्र... म (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
बिजिंग: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णायमुळे जागतिक स्तरावर व्यापर क्षेत्रात मोठे युद्ध सुरु झाले आहे. शेअर बाजारांत मोठी घसरण होत असून अनेक देशांना आर्थिक अस्थिरतेचा सामना करावा लागत आहे. दरम्यान जपान, व्हिएतनाम आणि बांगलादेश या तीन देशांनी शरणागती पत्कारली असून अमेरिकेसोबत टॅरिफबद्दल वाटाघाटी करण्यास सुरुवात केली आहे. पण दुसरीकडे चीनवर लादलेल्या 34% करानंतर ड्रॅगनेनही अमेरिकन उत्पादनांवर तितकाच कर लादला आहे.
चीनने अमेरिकन उत्पादनांवर 34% कर लादत व्यापर युद्ध लढण्यास तयारी दर्शवली आहे. चीनने म्हटले आहे की, अमेरिकेला व्यापार युद्ध हवे असेल तर चीन लढण्यास तयार आहे. हा संदेश चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिला आहे. अमेरिकेने अनुचित व्यापर पद्धत, बौद्धिक संपदा चोरी आणि व्यापारीतल असमतोलाचा हवाला देत चीनच्या उत्पादनांवर शेकडो अब्ज डॉलर्सचे कर लादले आहे. यामुळे चीननेही प्रत्युत्तर दाखल अमेरिकन उत्पादानांवर तितकाच कर लादला आहे. यामुळे गेल्या आठवड्यापासून चीन आणि अमेरिकेत व्यापर आणि राजनैतिक वाद सुरु आहे. ट्रम्प यांच्या परस्पर शुल्काने खळबळ माजवली आहे.
दरम्यान अमेरिकेन उत्पादनांवरी 34% टक्के कराच्या चीनच्या घोषणनेने मोटा गोंधळ उडाला. यामुळे सोमवारी (07 मार्च) रोजी अमेरिकेने चीनला वाटाघाटी करण्यासाठी आमंत्रण दिले होते. मात्र चीनने या करारावर आता कोणताही भ्रम राहिला नाही असे म्हणत वाटाघाटी करण्यास नकार दिला.
चीनच्या या उत्तरामुळे जगभरातील बाजारपेठा हादरल्या. गुंतवणूकदारांमध्ये, व्यावसायिंकामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.रविवारी ट्रम्प यांनी आक्रमक स्वरुपात टीका करत म्हटले होते की, जोपर्यंत त्या देशांसोबत अमेरिकेची व्यापरी तूट कमी होत नाही तोपर्यंत करामध्ये कपात करण्यात येणार नाही. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर चीनने देखील आपली रणनीती बदलत अमेरिकेला मोठा धक्का दिला.
चीनच्या शांघायमधील फुदान विद्यापीठाच्या सेंटर फॉर अमेरिकन स्टडीजचे संचालक व झिनबो यांनी चीनच्या टॅरिफ धोरणावर भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले की, वाटाघाटीची चर्चा होण्यापूर्वी लढणे आवश्यक आहे.
चीनच्या या भूमिकेमुळे अमेरिकेच्या चींतेतही वाढ झाली आहे. दरम्यान अमेरिकेत देखील मोठा गोंधळ सुरु असून ट्रम्प-मस्कविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहे. “Hand Off” करत लोकांनी ट्रम्प-मस्क गो बॅक अशा घोषणा दिल्या आहेत.