Missile Technology : चीनच्या हाती लागला 'विनाशकारी' खजिना; जमिनीखालून निघाले क्षेपणास्त्र बनवणारे १७ गूढ दुर्मिळ धातू ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
China Rare Earth Elements Discovery 2026 : जागतिक स्तरावर युद्धाचे ढग दाटून आलेले असताना आणि विविध देशांमध्ये लष्करी वर्चस्वाची स्पर्धा लागलेली असतानाच, चीनच्या (China) हाती एक अमोघ अस्त्र लागले आहे. चीनच्या अत्यंत थंड आणि दुर्गम भागात भूगर्भशास्त्रज्ञांना एका मोठ्या सर्वेक्षणादरम्यान अत्यंत मौल्यवान आणि लष्करी दृष्टीने संवेदनशील असलेल्या १७ दुर्मिळ मृदा खनिजांचा (Rare Earth Minerals) शोध लावण्यात मोठे यश आले आहे. ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या खळबळजनक अहवालानुसार, हा शोध अशा वेळी लागला आहे जेव्हा अमेरिका, रशिया आणि युरोपीय देश हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे आणि सहाव्या पिढीतील लढाऊ विमाने विकसित करण्यासाठी धडपडत आहेत. या शोधामुळे जागतिक संरक्षण बाजारपेठेतील चीनची मक्तेदारी आता अभेद्य होण्याची चिन्हे आहेत.
हा शोध अचानक लागलेला नाही, तर त्यामागे चिनी शास्त्रज्ञांचे मोठे सातत्य आहे. चीनच्या ईशान्येकडील ‘हेलोंगजिआंग’ आणि ‘जिलिन’ या तीव्र हिवाळा असलेल्या प्रांतांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. येथील खडक प्रामुख्याने ‘अल्कलाइन ग्रॅनाइट’ (Alkaline Granite) प्रकारातील आहेत. या भागात हिवाळ्यात अतिशय कडक थंडी आणि उन्हाळ्यात तीव्र उष्णता असते. निसर्गाच्या या गोठण्याच्या आणि वितळण्याच्या (Freeze and Thaw Cycle) वारंवार घडणाऱ्या चक्रांमुळे हे कठीण खडक हळूहळू कमकुवत होऊन तुटले. जेव्हा या भागातील बर्फाची मोठी चादर वितळली, तेव्हा शास्त्रज्ञांनी या विखुरलेल्या मातीचे आणि खडकांच्या तुकड्यांचे नमुने तपासले. त्यातूनच या १७ अद्भुत आणि अत्यंत दुर्मिळ घटकांचे रहस्य जगासमोर आले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China Earthquake : चीनमध्ये लोक गाढ झोपेत असतानाच भूकंपाचा महाभयंकर प्रहार; हाँगकाँगही हादरले, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
या शोधामध्ये सापडलेले धातू साधेसुधे नसून आधुनिक संरक्षण प्रणालीचा कणा आहेत. यामध्ये ‘निओडिमियम’ (Neodymium) हा असा धातू आहे, ज्याच्या वापरातून जगातील सर्वात शक्तिशाली चुंबक (Magnets) तयार केले जातात. लढाऊ विमाने, स्टेल्थ ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या अंतर्गत मोटर्सना अति-उच्च वेगाने काम करण्यासाठी या चुंबकीय शक्तीची गरज असते.
China builds 120 J-20 stealth fighters a year. Every one needs rhenium-bearing superalloy blades. Beijing is quietly removing the rhenium constraint that has historically capped every modern air force. In 2023, China overtook the US as Chile’s largest rhenium buyer. In 2024,… pic.twitter.com/2a3F1eTvF4 — Gaurab Chakrabarti (@Gaurab) May 18, 2026
credit – social media and Twitter
दुसरा धातू आहे ‘डायस्प्रोसियम’ (Dysprosium), जो या मोटर्सना प्रचंड उष्णतेमध्येही सुरक्षित ठेवतो. क्षेपणास्त्र जेव्हा हवेत प्रचंड वेगाने प्रवास करते, तेव्हा इंजिनमध्ये निर्माण होणाऱ्या तापमानामुळे यंत्रणा जळू नये, म्हणून डायस्प्रोसियम ढाल म्हणून काम करते. तिसरा धातू ‘सेरियम’ (Cerium) हा प्रामुख्याने अत्यंत स्फोटक दारूगोळा आणि तात्काळ आग पेटवणाऱ्या रासायनिक प्रणालींमध्ये वापरला जातो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Oil Crisis 2026 : बाप रे! पेट्रोल-डिझेलचे रेशनिंग सुरू होणार? इराण युद्धामुळे 76 देशांमध्ये आणीबाणी जाहीर
सध्याच्या घडीला संपूर्ण जगातील तब्बल ९० टक्के दुर्मिळ खनिजांच्या पुरवठ्यावर एकट्या चीनचे नियंत्रण आहे. स्मार्टफोन, इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटऱ्या, विंड टर्बाइन्सपासून ते अत्याधुनिक रडार सिस्टीमपर्यंत प्रत्येक गोष्टीत हे धातू लागतात. अमेरिकेची संरक्षण संस्था ‘पेंटागॉन’ देखील आपल्या एफ-३५ (F-35) लढाऊ विमानांसाठी लागणाऱ्या घटकांसाठी चीनवर अवलंबून आहे. आता चीनला स्वतःच्याच देशात हा नवा अथांग साठा सापडल्यामुळे, अमेरिका आणि पाश्चात्त्य देशांनी सुरू केलेले ‘डी-रिस्किंग’ किंवा चीनवरील अवलंबित्व कमी करण्याचे प्रयत्न पूर्णपणे अपयशी ठरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. चिनी भूगर्भशास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात आता युद्धपातळीवर उत्खनन सुरू करण्यात आले असून, हे धातू लवकरच कारखान्यांपर्यंत पोहोचवले जातील.






