US Plane Crash : अरे काय चाललंय तरी काय? अमेरिकेत पुन्हा अपघात; उत्तर कॅरोलिनच्या समुद्रात कोसळले विमान (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
US Plane Crash : वॉशिंग्टन : अमेरिकेत (America) पुन्हा एक विमान अपघात घडला आहे. (US Plane Crash) यामुळे संपर्ण देशात भीतीचे वातावरण पसरले आहे. अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिनमध्ये ओक बेटाजवळ ही घटना घडली आहे. एक छोटे विमान अचानक समुद्रात कोसळले. यावेळ अनेक लोक बेटाच्या किनाऱ्यावर होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु या अपघातानंतर समुद्रकिनाऱ्यावर लोकांमध्ये घबराट पसरली होती.
शनिवारी (०२ ऑगस्ट) संध्याकाळी स्थानिक वेळेनुसार ही घटना घडली. यामध्ये एक छोटे लहान सिंगल-इंजिन विमान अचानक समुद्रात कोसळले. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने बचाव कार्य सुरु करण्यात आले. यामुळे वैमानिकाचा जीव बचावला. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलटला किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्याच्यावर उपचार सुरु आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या समुद्रात पडलेले विमान पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी जहाजांची मदत घेण्यात आली आहे. विमानमध्ये फक्त एक पायलट होता आणि विमान किनाऱ्याजवळून लांब अंतरावर पडले, यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
Small plane has crashed into the ocean”
“” near Oak island NC . pic.twitter.com/AoqQh4RloQ
— 🔨Robert The Builder 🇺🇸 (@NobodymrRobert) August 3, 2025
सध्या या अपघाताचे कारण अस्पष्ट आहे. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) या घटनेचा तपास करत आहे. प्रत्यक्षदर्शनींनी दिलेल्या माहितीनुसार, विमान पाण्यामध्ये लॅंडिग झाल्यासारखे पडले. या अपघातानंतर समुद्रकिनाऱ्यावर लोकांची पळापळ झाले. तांत्रिक बिघाडामुळे विमान पाण्यात उतरावे लागली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र या बद्दल कोणतीही अधिकृत माहिती नाही.
गेल्या काही काळात अमेरिकेमध्ये विमान अपघातांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. जानेवारी २०२५ मध्ये अमेरिकन आर्मीचे ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर आणि अमेरिकन एअरलाइनसच्या प्रवासी विमानाची जोरदार टक्कर झाली होती. या अपघताता ६७ जणांना प्राण गमावले. या अपघाताने अमेरिकेत घबराटीचे वातावरण परसले होते.
त्यानंतर फिलाडेल्फियामध्ये देखील एका एअर ॲम्बुलन्स विमानाचा अपघात झाला होता. यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला होता. १० एप्रिल रोजी अमेरिकेच्या न्यू जर्सीमध्ये देखील एक हेलिकॉप्टर हडसन नदीत कोसळ्याने ५ जणांचा बळी गेला होता. तसेच २२ मे रोजी अमेरिकेच्या सॅन दिएगो येथे लष्करी विमान अपघात घडला होता. ३१ जुलै रोजी देखील अमेरिकेचे F-35 लढाऊ विमानाचा अपघात झाला होता.
Russia Ukraine War : युक्रेनचे रशियावर हल्ले सुरुच; मॉस्कोच्या तेल कारख्यांना ड्रोनने केले लक्ष्य