फोटो सौजन्य : सोशल मीडिया
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बुधवारी लास वेगासच्या भेटीदरम्यान जो बायडन यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळली. त्यांना कोरोनाची कोणतीही गंभीर लक्षणे नसुन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या आधीही त्यांना कोरोनाची लागण झाली होती.
व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी कॅरिन जीन-पियरे यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना कोरोनाची लागण झाल्याची घोषणा केली. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना कोरोनाची लागण झाली असल्याने आगामी चर्चांमध्ये नसतील अशीही माहिती त्यांनी दिली.
बायडेन आपले कर्तव्य पूर्णपणे पार पाडतील
व्हाईट हाऊस प्रेस सेक्रेटरी कॅरिन जीन-पियरे यांच्या माहितीनुसार जो बायडेन यांना काही दिवस वेगळे ठेवण्यात येईल. पण त्यांच्या कामात काहीही अडचण येणार नाही. त्या काळात जो बायडेन आपली सर्व कर्तव्ये पूर्णत: पार पाडतील. व्हाईट हाऊस अध्यक्षांच्या स्थितीबद्दल अपडेट देत राहिल. राष्ट्रपती कार्यालयाची संपूर्ण कर्तव्ये पार पाडत राहतील.
निवडणूक प्रचाराला फटका बसेल?
अमेरिकेच्या निवडणुकीत जो बायडेनच यांच्या विरोधात डोनाल्ड ट्रम्प आहेत. नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता, त्यानंतर त्यांना अमेरिकेत मोठा पाठिंबा मिळत आहे. त्याच वेळी, जो बायडेन डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेत खूप मागे पडले. तसेच त्यांना काही डेमोक्रॅट नेत्यांनी निवडणूक प्रचारातून माघार घेण्यास सांगितले होते. त्यामुळे निवडणुकांच्या प्रचावर परिणाम होईल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.