White House shooting : अफगाणिस्तान दहशतवाद्याच्या प्रकरणात चिरडले जाणार 'हे' १८ देश; त्यापैकी एक भारताचा शेजारी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
US to act against 19 nations deportations : व्हाईट हाऊसबाहेर (America) झालेल्या गोळीबारानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इमिग्रेशन धोरण पूर्णतः कडक केले असून, १९ चिंताजनक देशांतील नागरिकांना थेट हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. या यादीत अफगाणिस्तान, म्यानमारसह अनेक अस्थिर देशांचा समावेश असून, अमेरिकन प्रशासन या देशांतील नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याच्या तयारीत आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की “अमेरिकेसाठी फायदेशीर नसलेल्यांना इथे थारा दिला जाणार नाही.”
या सर्व कारवाईची सुरुवात झाली ती व्हाईट हाऊसबाहेर झालेल्या एका धक्कादायक घटनेपासून. अफगाण नागरिक रहमुल्लाहवर अमेरिकन प्रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सच्या बाहेर गोळीबार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात एक अमेरिकन सैनिक ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने अमेरिकन सुरक्षेसंबंधी प्रश्नचिन्ह निर्माण केले आणि प्रशासन तातडीच्या मोडमध्ये गेले. त्यानंतरच अमेरिकेत असलेल्या १९ चिंताजनक देशांतील नागरिकांची तपासणी व शक्य असल्यास हद्दपारीची मोठी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
ट्रम्प यांनी सत्तेत आल्यानंतर लगेचच काही देशांना “परिस्थितीजन्य धोक्याचे देश” म्हणून घोषित केले होते. त्या वेळी त्यांच्या व्हिसांवर काही मर्यादा आणल्या होत्या, मात्र अमेरिकेत राहत असलेल्या नागरिकांवर मोठा परिणाम झाला नव्हता. परंतु आता घडलेल्या गोळीबारानंतर या यादीतील नागरिकांना थेट लक्ष्य केले जाणार असून, त्यांना हद्दपारीचे धोरण लागू होण्याची शक्यता अत्यंत जास्त आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Most Powerful Nation’s: भारत जागतिक शक्ती यादीत टॉप-3 मध्ये; पाकिस्तानचा टॉप-15 मधून पत्ता कट
या १९ देशांमध्ये अफगाणिस्तानसह म्यानमार, चाड, काँगो प्रजासत्ताक, इराण, टोगो, सोमालिया, येमेन, लिबिया, बुरुंडी, विषुववृत्तीय गिनी, हैती, लाओस, सिएरा लिओन, टुर्कमेनिस्तान, व्हेनेझुएला यांसारखे अस्थिर व संघर्षग्रस्त देश आहेत. या यादीत भारताचा शेजारी म्यानमारही समाविष्ट असल्याने दक्षिण आशियाई परिस्थितीवरही याचा अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो.
TRUMP HALTS THIRD WORLD MIGRATION
Plus orders a Green Card audit of all citizens from 13 danger countries Deportation of any danger citizens to follow THIS is what strong leadership looks like Instead, we’re governed by human rights lawyers! https://t.co/zc554ilfEs — Martin Daubney 🇬🇧 (@MartinDaubney) November 28, 2025
credit : social media and Twitter
ही कारवाई किती मोठी आहे याचा अंदाज न्यूजवीक मासिकाच्या अहवालातून मिळतो. त्यानुसार, अमेरिकन प्रशासनाच्या नव्या आदेशांचा २,३३,००० लोकांवर थेट परिणाम होणार आहे. यापैकी मोठ्या संख्येने नागरिक हे अफगाणिस्तानातून २०२१ मध्ये ताबा बदलल्यानंतर अमेरिकेत आश्रयासाठी आले होते. जोसेफ एडलो, यूएस सिटीझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसचे प्रमुख, यांनी सांगितले की, “चिंताजनक देशांमधून येणाऱ्या प्रत्येक परदेशी नागरिकाची सखोल व कठोर ग्रीन कार्ड तपासणी करण्याचे आदेश मिळाले आहेत.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : FACT CHECK : अखेर समोर आले किंग खान आणि PM मोदींच्या VIRAL ‘जिहाद’ व्हिडिओमागचे तथ्य; वाचा नक्की काय आहे सत्य?
बायडेन प्रशासनाच्या काळात अमेरिकेत सुमारे ५ लाख निर्वासित होते, परंतु ट्रम्प यांच्या ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ मोहिमेनुसार निर्वासितांची संख्या कमी करण्यात आली आहे. आता नव्या घटनेनंतर ही कारवाई आणखी कठोर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेतील सुरक्षा, राजकीय तणाव आणि बदललेले इमिग्रेशन धोरण यामुळे या देशांतील नागरिकांवर भविष्यात काय परिणाम होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Ans: अफगाणिस्तान, म्यानमार, चाड, काँगो, इराण, सोमालिया, येमेन, लिबिया, व्हेनेझुएला आणि इतर संघर्षग्रस्त देश.
Ans: सुमारे २.३३ लाख लोकांवर थेट परिणाम अपेक्षित आहे.
Ans: व्हाईट हाऊसबाहेर अफगाण नागरिकाने केलेल्या गोळीबारानंतर सुरक्षा कारणास्तव तपासणी आणि हद्दपारी मोहीम तीव्र झाली.






