उपराष्ट्रपती कमला हॅरिस (फोटो -ट्विटर)
नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यात सामना होणार आहे. दरम्यान उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी आपल्या प्रचारादरम्यान, कार्पोरेट टॅक्स हा २१ टक्क्यांवरून २८ टक्क्यांवर करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. कमल हॅरिस यांच्या प्रचारात प्रवक्ते असणारे जेम्स सिंगर यांनी सांगितले की, “कामगार लोकांच्या खिशात पैसे परत आणण्याचा आणि अब्जाधीश आणि मोठ्या कॉर्पोरेशनने त्यांचा वाटा योग्य देण्याची खात्री करण्याच्या आर्थिकदृष्ट्या जबाबदार मार्गाचा भाग असेल.”
ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, त्यावेळेस त्यांनी कार्पोरेट टॅक्स हा ३५ टक्क्यांवरून २१ टक्क्यांपर्यंत कमी केला होता. तसेच पुढील वर्षी समाप्त होणाऱ्या टॅक्समध्ये अनेक प्रकारच्या सवलती त्यांनी दिल्या होत्या. दरम्यान पुन्हा आपली सत्ता आल्यास टॅक्समधील ही कपात कायम ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.
अमेरिकेत टॅक्स प्रणालीत काही बदल करायचे असल्यास काँग्रेसच्या मंजुरीची आवश्यकता असते. डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन यांच्यात सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह यांच्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी चुरशीची लढाई होणार आहे. ५ नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. गेल्या आठवड्यात आर्थिक धोरणाविषयी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी नागरिकांसाठी टॅक्स कमी करणे, स्वस्त दरात घरे उपलब्ध करून देणे यावर भाष्य केले .