30 हजार फूट उंचीवर विमानातील शौचालय बंद अन्...; व्हर्जिन ऑस्ट्रेलिया फ्लाइटमध्ये उडाला गोंधळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Toilet Breakdown at 30,000ft : एक विचित्र बातमी समोर आली आहे. बालीवरुन ब्रिस्बेन जाणाऱ्या व्हर्जिन ऑस्ट्रेलिया फ्लाइटमधील प्रवाशांना अत्यंत लाजिरवाणा असा अनुभव आला आहे, जो ते आयुष्यात कधी ही विसरणार नाहीत. ही घटना ऐकून तुम्हालाही उलटी आल्यासारखो होईल. मिळालेल्या माहितीनुसाप, गुरुवारी (२८ ऑगस्ट) ही घटना घडली आहे.
Vladimir Putin डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर; टॅरिफवॉरदरम्यान रशिया-भारत संबंधासाठी अधिक महत्वपूर्ण
व्हर्जिन ऑस्ट्रेलिया फ्लाइट ७३७ मॅक्स ८ ने दुपारी बालीहून ब्रिस्बेनला रवाना झाली होती. यावेळी विमानाच्या मागच्या बाजूला असलेल्या टॉयलेटने काम करणे बंद केले. यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधल उडाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, टॉयलेट उड्डाणापूर्वीच खराब झाले होते. बालीमध्ये कोणीही इंजिनियर नसल्याने, विमान कंपनीने उड्डाणाचा आणि लॅंड झाल्यावर दुरूस्तीचा निर्णय घेतला होता. पण ही मोठी चूक ठरली. विमान ३० हजार फूट उंचावर असताना प्रवाशांना लाजिरवाणी अनुभव आला. टॉयलेट अचानक बंद पडले.
यामुळे सहा तांसाच्या प्रवासादरम्यान प्रवाशांसाठी अगदी लाजिरवाणी परिस्थिती निर्माण झाली होती. धक्कादायक बाब म्हणजे केबिन क्रूने प्रवाशांना बाटल्यांमध्ये लघवी करण्यास सांगितले. यामुळे संपूर्ण विमानात गोंधळ उडाला होता.
सुरुवातील प्रवाशांना परिस्थिती ठीक होईल अशी आशा होती. पण प्रवासादरम्यान परिस्थिती अधिक बिकट झाली. विमानामध्ये तीन टॉयलेट्स होते. पण काही वेळाने इतर दोन टॉयलेट देखील खराब झाले. क्रू मेंबर्सनी प्रवाशांना बाटल्या दिल्या. त्यामध्ये लघवी करायला सांगितली. शिवाय अनेकांनी तुटलेल्या शौचालयात जावे लागले.
एका वृद्ध सीटवरच लघवी केली. हा प्रसंग तिच्यासाठी अत्यंत भयकंर असल्याचे तिने म्हटले. तसेच संपूर्ण विमानामध्ये बाटल्यांमधील लघवी आणि तुटलेल्या शौचालयाचा वापरामुळे सर्वत्र दुर्गंध पसरली होती. यामुळे अनेक प्रवाशांना श्वास घेणेही कठीण झाले होते. प्रवाशांनी हा अनुभव त्यांच्या आयुष्यातील अत्यंत अपमानजनक आणि वाईट अनुभव असल्याचे म्हटले. अनेक प्रवाशांनी व्हर्जिन ऑस्ट्रेलिया कंपनीवर नाराजी व्यक्त केली.
दरम्यान व्हर्जिन ऑस्ट्रेलिया कंपनीने या घटनेबद्दल माफी मागितली आहे. एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने म्हटले की, डेपसरहून ब्रिस्बेनला जाणाऱ्या विमानात शौचालयाची समस्या होती. आम्ही आमच्या प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल माफी मगतो. तसेच कठीण काळात क्रू मेंबर्सने परिस्थिती हातळ्याबद्दल त्यांचे कौतुक करतो. याशिवाय व्हर्जिन ऑस्ट्रेलिया विमान कंपनीने प्रवाशांना उड्डाण देण्याचे आश्वासन दिले आहे.
जपानी पंतप्रधानांना भेटताच पंतप्रधान मोदी म्हणाले Arigato Gozaimas; काय आहे याचा अर्थ?