Ella Wadia : मोहम्मद अली जिना यांची पणतू पाकिस्तानमध्ये अचानक का आली चर्चेत? जाणून घ्या VIRAL व्हायचे कारण ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Muhammad Ali Jinnah descendant Paris debut : पाकिस्तानचे (Pakistan) संस्थापक आणि दक्षिण आशियाच्या राजकीय इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचे नाव असलेल्या मुहम्मद अली जिना यांची पणतू एला वाडिया सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आली आहे. तिचे नाव अचानक चर्चेत येण्यामागे कोणताही राजकीय मुद्दा नसून, यामागे आहे जगातील सर्वाधिक प्रतिष्ठित आणि ग्लॅमरस समजल्या जाणाऱ्या ‘ले बाल डेस डेब्युटँटेस २०२५’ या पॅरिसमधील भव्य फॅशन इव्हेंटमध्ये केलेले तिचे पदार्पण. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी फ्रान्सच्या पॅरिसमधील प्रसिद्ध शांग्री-ला हॉटेलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात एलाची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.
‘ले बाल डेस डेब्युटँटेस’ हा कार्यक्रम केवळ एक फॅशन शो नसून, जगातील अत्यंत प्रतिष्ठित, राजघराण्याशी संबंधित, उद्योगजगत, कला आणि राजकारणातील नामांकित कुटुंबांमधील तरुणींच्या ‘डेब्युट’साठी आयोजित केला जातो. दरवर्षी जगभरातून केवळ २० ते २५ निवडक तरुणींनाच यात सहभागी होण्याची संधी दिली जाते. त्यामुळे एला वाडियाचे या कार्यक्रमात निवडले जाणे, हेच तिच्या व्यक्तिमत्त्वाचे, पार्श्वभूमीचे आणि आंतरराष्ट्रीय ओळखीचे द्योतक मानले जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Free Palestine : हमासवर इस्रायलची टांगती तलवार; हत्येच्या भीतीने थरथरले Hamas नेते, बैठकीच्या नियमांत मोठे बदल
एला वाडिया ही प्रसिद्ध उद्योगपती जहांगीर वाडिया आणि सेलिना वाडिया यांची मुलगी आहे. जहांगीर वाडिया हे बॉम्बे डाईंग, गो फर्स्ट आणि बॉम्बे रिअल्टी या मोठ्या कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक आहेत, तर सेलिना वाडिया एक प्रख्यात फॅशन डिझायनर आहे. तिचे कुटुंब फक्त उद्योग आणि फॅशन क्षेत्रातच नव्हे, तर इतिहासाशीही जोडलेले आहे. जिना यांच्या एकमेव मुलीचे नाव दिना जिना होते. दिनाने आपल्या आईच्या कुटुंबातील नेव्हिल वाडियाशी विवाह केला होता. या आंतरधर्मीय विवाहामुळे जिना नाराज झाल्याचे सांगितले जाते आणि त्यामुळे वडील-मुलीचे संबंध ताणले गेले होते. याच दाम्पत्याला नसली वाडिया नावाचा मुलगा झाला, जो पुढे एक यशस्वी उद्योगपती ठरला. त्याच नसली वाडियांचे पुत्र म्हणजे नेस वाडिया आणि जहांगीर वाडिया. अशा प्रकारे एला वाडिया जिना यांची पणत ठरते.
Pakistanis shocked to find Jinnah’s great-great-granddaughter Ella Wadia living a happy life-of-kuffr. While, they’re still choking on Islamic chooran sold by Baba-e-Quom, 77 years ago 🤣🤣🤣🤣 pic.twitter.com/puc0An2j3V — Beyond society 🇮🇳🇺🇸 (@bana_devsa7) December 2, 2025
credit : social media and Twitter
या कौटुंबिक पाश्वभूमीमुळे पाकिस्तानमध्ये तिच्याबद्दल विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर हजारो लोक तिच्या फोटोंवर प्रतिक्रिया देत असून “जिनांची पणतू”, “इतिहासाशी जोडलेली सौंदर्य” अशा शब्दांत तिचे वर्णन केले जात आहे. प्रसिद्ध ‘हॅलो!’ मासिकानुसार, एलाने या कार्यक्रमात लक्झरी फॅशन ब्रँड ‘एली साब’चा स्ट्रॅपलेस हॉट कॉचर गाऊन परिधान केला होता. तिचा हा मिनिमल दागिन्यांसह तयार केलेला सुसंस्कृत लूक सध्या फॅशन जगात एक नवा ट्रेंड ठरत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan CDF : शाहबाज शरीफ यांचा डाव पालटला; पाकिस्तानच्या राजकारणात आला नवा ट्विस्ट, ‘Asim Munir’च पाकिस्तानचे सर्वेसर्वा
या इव्हेंटमध्ये तिच्यासोबत अनेक प्रतिष्ठित व्यक्तींच्या मुलीही सहभागी झाल्या होत्या, त्यात ब्रिटिश राजघराण्याशी संबंधित लेडी अरामिंटा स्पेन्सर-चर्चिल, हॉलीवूड अभिनेत्री अँजेला बॅसेटची मुलगी ब्रॉनविन व्हान्स, कॅरोलिना हेरेराची नात कॅरोलिना लॅन्सिंग आणि इतर अनेक उच्चभ्रू घराण्यांतील तरुणींचा समावेश होता. मात्र, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि उपमहाद्वीपाशी असलेल्या नात्यामुळे एला वाडिया विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.
तिची ही लोकप्रियता केवळ फॅशन किंवा सोशल मीडियापुरती मर्यादित नसून, ती इतिहास, कौटुंबिक वारसा आणि आधुनिक युगातील राजकीय-सांस्कृतिक बदलांनाही जोडलेली असल्याने तिचे नाव लवकरच आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक मोठ्या ओळखीचे बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Ans: पॅरिसमधील ‘ले बाल डेस डेब्युटँटेस २०२५’ या जगप्रसिद्ध फॅशन इव्हेंटमध्ये पदार्पण केल्यामुळे एला वाडिया चर्चेत आली.
Ans: एला वाडिया ही जिना यांची मुलगी दिना जिना यांची नात आणि त्यामुळे जिना यांची पणतू आहे.
Ans: ती उद्योगपती जहांगीर वाडिया आणि फॅशन डिझायनर सेलिना वाडिया यांची मुलगी आहे.






