इस्रायलला हमासची इतकी भीती की, बैठकीदरम्यान फोन, एसी आणि टीव्हीवर घातली पूर्ण बंदी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
१) बैठकीदरम्यान सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर बंदी आणि किमान ७० मीटर अंतराची अट.
२) इस्रायली हल्ले वाढल्याने हमासची सुरक्षा व्यवस्था अनेक पटींनी कडक.
३) वरिष्ठ नेत्यांवर लक्ष ठेवण्याचे धोके वाढल्याने ठिकाणे आणि वेळा सतत बदलण्याचे आदेश.
Hamas meeting restrictions 2025 : इस्रायली (Israel) हल्ले आणि लक्ष्यित हत्येच्या वाढत्या प्रयत्नांमुळे हमास (Hamas) संघटनेने आतापर्यंतची सर्वात कठोर अंतर्गत सुरक्षा व्यवस्था लागू केली असून, आता कोणतीही बैठक इलेक्ट्रॉनिक उपकरणांशिवाय, अत्यंत गोपनीय आणि बदलत्या ठिकाणीच घेण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला आहे आणि या पार्श्वभूमीवर हमास संघटनेने सुरक्षा दृष्टीने मोठा निर्णय घेतला आहे. वरिष्ठ नेते आणि कमांडर यांच्या सुरक्षेला धोका वाढल्यामुळे आता कोणत्याही बैठकीदरम्यान मोबाईल फोन, लॅपटॉप, स्मार्टवॉच, टेलिव्हिजन, वाय-फाय राउटर, ब्लूटूथ उपकरणे तसेच अगदी एअर कंडिशनरही पूर्णपणे बंद ठेवणे किंवा किमान ७० मीटर दूर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही सर्व उपकरणे गुप्तपणे सर्व्हेलन्ससाठी वापरली जाऊ शकतात, अशी भीती हमास नेत्यांना आहे. त्यामुळेच संपूर्ण इलेक्ट्रॉनिक प्रणालीपासून दूर राहून बैठक घेण्याचा आदेश देण्यात आला आहे.
लंडनस्थित ‘अशरक अल-अवसत’ या वृत्तपत्राच्या माहितीनुसार, कतारमधील दोहा येथे नुकत्याच झालेल्या एका कथित अयशस्वी हत्येच्या प्रयत्नानंतर हमासच्या वरिष्ठ नेत्यांनी सुरक्षाव्यवस्थेत मोठे बदल केले आहेत. इस्रायल प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने हमास नेत्यांचे लोकेशन ट्रॅक करत असल्याचा संशय असून, त्यामुळे संघटनेला आपल्या अंतर्गत हालचालींमध्येही टोकाची खबरदारी घ्यावी लागत आहे. परिणामी एक विशेष सुरक्षा दस्तऐवज जारी करण्यात आला असून त्यात बैठकांचे ठिकाण सतत बदलणे, एकाच जागी वारंवार जमू नये आणि कोणतीही माहिती बाहेर जाणार नाही याची खात्री करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan CDF : शाहबाज शरीफ यांचा डाव पालटला; पाकिस्तानच्या राजकारणात आला नवा ट्विस्ट, ‘Asim Munir’च पाकिस्तानचे सर्वेसर्वा
या दस्तऐवजानुसार, कोणतीही बैठक घेण्यापूर्वी संबंधित ठिकाणी लपवलेले कॅमेरे, मायक्रोफोन किंवा ऐकण्याची उपकरणे आहेत का याची सखोल तपासणी केली जाणार आहे. सुरक्षा अधिक काटेकोर करण्यासाठी सदस्यांची मर्यादित संख्या, गोपनीय प्रवेशमार्ग आणि शेवटच्या क्षणीच ठिकाण जाहीर करण्यासारखी पद्धत स्वीकारण्यात आली आहे. हमासला वाटते की कोणतीही छोटी चूक त्यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या जीवावर बेतू शकते, म्हणूनच इतकी कठोर पावले उचलण्यात आली आहेत.
Israel announces they have taken control of every cell phone in Gaza, in order to broadcast Netanyahu’s UN speech live to each phone: “Lay down your arms, let my people go, free all of the hostages NOW. If you do, you will live. If you don’t, Israel will hunt you down….” pic.twitter.com/Vrj14Zig9P — The Persian Jewess (@persianjewess) September 26, 2025
credit : social media and Twitter
गेल्या काही काळात इस्रायलने हमास, हिजबुल्लाह आणि इतर इराण-समर्थित गटांच्या वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य करून अनेक हल्ले केल्याचे दावे केले आहेत. ७ ऑक्टोबरनंतर सुरू झालेल्या संघर्षात अनेक महत्वाच्या व्यक्तींचा मृत्यू झाला असून, यामध्ये हिजबुल्लाहचे तसेच हमासचे वरिष्ठ चेहरेही असल्याचे सांगण्यात येते. नुकतेच बेरूतच्या दक्षिणेकडील भागात झालेल्या एका हल्ल्यात हिजबुल्लाहच्या उपप्रमुखाचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलने केला असून, त्यामुळे संपूर्ण मध्य पूर्वेत तणावाचे वातावरण अधिक वाढले आहे.
याशिवाय, गाझा पट्टीतील रफाह भागातील बोगद्यांमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये ४० हून अधिक हमास सदस्य ठार झाल्याचाही दावा करण्यात आला आहे. या कारवाईत एका वरिष्ठ कमांडरचा मुलगा देखील मारला गेल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वीही गाझामधील महत्त्वाच्या नेत्यांच्या जखमी होण्याच्या किंवा त्यांच्या मृत्यूच्या बातम्या पसरल्या होत्या. या सगळ्या घटनांचा एकत्रित परिणाम म्हणून हमास अधिक भयभीत झाला असून, स्वतःच्या नेत्यांना वाचवण्यासाठी अभूतपूर्व पावले उचलत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Putin India Visit: ‘ना भारत झुकणार, ना रशिया तुटणार’, पुतिन यांच्या भारत भेटीचा चीनमध्ये गाजावाजा; वाचा नक्की काय म्हटले?
आज जगाच्या नजरा इस्रायल-हमास संघर्षाकडे लागल्या आहेत आणि जगातील प्रत्येक मोठ्या राष्ट्रावर त्याचा परिणाम होत आहे. या संघर्षात केवळ शस्त्रांचा वापरच नाही, तर अत्याधुनिक तंत्रज्ञान, सायबर सर्व्हेलन्स आणि गुप्तचर यंत्रणांचाही समावेश असून त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Ans: इस्रायल प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून नेत्यांवर लक्ष ठेवत असल्याची भीती असल्यामुळे गुप्तचर कारवाया टाळण्यासाठी हमासने सर्व उपकरणांवर बंदी घातली आहे.
Ans: माहिती गळती आणि संभाव्य हल्ल्यांचा धोका टाळण्यासाठी वेळ आणि ठिकाणे सतत बदलली जात आहेत, जेणेकरून कोणालाही अचूक स्थान कळू नये.
Ans: इस्रायल आणि हमासमधील तणाव वाढल्याने लेबनॉन, गाझा आणि संपूर्ण मध्य पूर्वेत अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे.






