BMW M 1000 RR Superbike Launched In India  (फोटो सौजन्य-AI एआय)
ऑटोमोबाइल

BMW M 1000 RR भारतात लाँच! किंमत फक्त 59.90 लाख रुपये; मिळणार 300 kmph पेक्षा क्रेझी स्पीड! लगेच पाहा आणि घेऊन टाका

BMW ने 2026 M 1000 RR सुपरबाइक भारतात 59.90 लाख रुपयांना लाँच केली आहे. 999cc इंजिनमधून 214.6 bhp पॉवर मिळते, तर वेग 300 kmph पेक्षा जास्त आहे. नवीन विंगलेट्स, स्लाइड कंट्रोल आणि ब्रेक स्लाइड असिस्ट यांसारखी रेसिंग टेक्नॉलॉजी यात देण्यात आली आहे.

Atharva Rajopadhye
  • 2026 बीएमडब्ल्यू M 1000 RR भारतात 59.90 लाख रुपयांना लाँच

  • 999cc इंजिन 214.6 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क निर्माण करते

  • नवीन स्लाइड कंट्रोल आणि ब्रेक स्लाइड असिस्टमुळे रेसिंग नियंत्रण सुधारणार

BMW मोटरराडने आपली नवीन 2026 BMW M 1000 RR सुपरबाइक भारतीय मार्केटमध्ये लाँच केली आहे. या बाइकची एक्स-शोरूम किंमत 59.90 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीच्या डीलर नेटवर्कमध्ये या बाइकसाठी बुकिंग सुरू झाले आहे. ही मोटारसायकल भारतात CBU म्हणजेच पूर्णपणे आयात केलेल्या स्वरूपात विकली जाणार आहे. जागतिक स्तरावर FIM सुपरबाइक वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये या मॉडेलने आपली रेसिंग कॅपेसिटी दाखवली आहे.

नवीन M 1000 RR मध्ये डिझाइनपासून ते रायडिंग टेक्नॉलॉजीपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. बाइकच्या पुढील भागात नव्या डिझाइनचे फेअरिंग आणि M Winglets 3.0 देण्यात आले आहेत. हे विंगलेट्स कार्बन फायबर रिइन्फोर्स्ड प्लास्टिकपासून तयार केले आहेत. वेगात बाइकला स्टेबलीटी मिळावी आणि एरोडायनॅमिक्स सुधारावे, हा यामागचा उद्देश आहे. फ्रेममध्येही बदल करण्यात आले असून डाव्या बाजूला नवीन इंजिन माउंट दिले आहे. स्टीयरिंग हेडच्या भागातील फ्लेक्स वैशिष्ट्यांमध्येही सुधारणा करण्यात आली आहे.

या सुपरबाइकचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे रायडरच्या कंट्रोलसाठी दिलेली नवीन इलेक्ट्रॉनिक सिस्टीम. डायनॅमिक ट्रॅक्शन कंट्रोलमध्ये (DTC) आता स्लाइड कंट्रोल फंक्शन समाविष्ट करण्यात आले आहे. स्टीयरिंग अँगल सेन्सरच्या मदतीने ही प्रणाली बाइकच्या स्लिप आणि स्लाइडवर कंट्रोल ठेवण्यास मदत करते. BMW Race ABS Pro मध्ये नवीन Brake Slide Assist फंक्शन देण्यात आले आहे. ब्रेकिंगदरम्यान बाइक स्लाइड होत असताना रायडरला कंट्रोल राखण्यासाठी याची मदत मिळते. रेसट्रॅकसाठी ABS Pro मधील Slick सेटिंगही देण्यात आली आहे.

इंजिनबाबत बोलायचे झाल्यास, यात 999cc क्षमतेचे 4-सिलिंडर ऑइल-वॉटर कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 14,500 rpm वर 214.6 bhp पॉवर आणि 11,100 rpm वर 113 Nm टॉर्क निर्माण करते. मागच्या मॉडेलच्या तुलनेत पॉवरमध्ये सुमारे 6 bhp वाढ झाली आहे. बाइकचा कमाल वेग 300 kmph पेक्षा जास्त असल्याचा कंपनीचा दावा आहे. 17-इंचाच्या व्हील्ससह पुढे 120/70 आणि मागे 200/55 टायर दिले आहेत.

या बाइकचे वजन 194 किलो असून फ्युल टँक 16.5 लिटरचा आहे. Blackstorm Metallic आणि M Motorsport अशा ड्युअल-टोन रंगसंगतीत ती मिळेल. M Competition Package स्टँडर्ड स्वरूपात दिले असून यात M Carbon Wheels, कार्बन पार्ट्स, हलकी M फुटरेस्ट सिस्टीम, DLC कोटेड M Endurance चेन आणि M GPS Laptrigger यांचा समावेश आहे. बाइकसोबत 3 वर्षांची अनलिमिटेड किलोमीटर वॉरंटी मिळते. ती चौथ्या आणि पाचव्या वर्षासाठी वाढवण्याचा ऑप्शनही आहे.

Axis Bank Fraud : अक्सिस बँकेत 7.12 कोटींचा कथित घोटाळा; मॅनेजरसह पाच जणांवर गुन्हा

पुण्यात म्हाडाच्या घरांची लॉटरी कोणाला लागणार? १ डिसेंबरला निघणार सोडत, एका घरासाठी ६१ जणांची स्पर्धा

दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय मात्र मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी महिनाभर प्रतीक्षा, मिरा-भाईंदर भाजप नेतृत्वाबाबत नाराजीची चर्चा

Diwali Ank Review: यंदा काय वाचाल? ब्रँड्सची यशोगाथा, निसर्गोत्सव अन् शिक्षण धोरण!

म्हसवडच्या सिद्धनाथ यात्रेची जय्यत तयारी; मंत्री जयकुमार गोरेंच्या आदेशानंतर प्रशासन कामाला