अ‍ॅडव्हेंचर रायडिंगसाठी Ducati ची नवी बाईक लाँच 
ऑटोमोबाइल

Ducati New Bike: अ‍ॅडव्हेंचर रायडिंगसाठी Ducati ची नवी बाईक लाँच; किंमत ऐकून व्हाल थक्क

Ducati New Bike: अ‍ॅडव्हेंचर रायडिंगची आवड असणाऱ्या बाईकप्रेमींसाठी Ducati ने आपली नवी बाईक बाजारात दाखल केली आहे. दमदार इंजिन, आकर्षक डिझाइन आणि आधुनिक फीचर्समुळे ही बाईक चर्चेत आहे. मात्र, या प्रीमियम बाईकची किंमत किती आहे आणि तिची खास वैशिष्ट्ये काय आहेत? जाणून घेऊया.

प्राजक्ता प्रधान
  • Ducati ने भारतात नवीन DesertX V2 अ‍ॅडव्हेंचर बाईक लाँच केली आहे.

  • या बाईकची एक्स-शोरूम किंमत १९.९९ लाख रुपये आहे

  • बाईकमध्ये ८९० सीसी क्षमतेचे नवीन V2 ट्विन-सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे

डुकाटीने भारतात आपली दुसऱ्या पिढीची डेझर्टएक्स V2 ॲडव्हेंचर बाईक लॉन्च केली आहे. हिची किंमत १९.९९ लाख आहे. कंपनीच्या सर्व डीलरशिपवर बुकिंग सुरू झाले असून, डिलिव्हरी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. ही बाईक डुकाटीच्या पॅनिगाले V2 आणि मॉन्स्टर V2 सारख्या इतर V2 मॉडेल्सच्या श्रेणीत सामील झाली आहे.

८९० सीसी इंजिन ११० एचपी पावर

नवीन डुकाटी डेझर्टएक्स V2 मध्ये नवीन 890cc V2 ट्विन-सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन 9,000 rpm वर 110 hp आणि 7,000 rpm वर 92 Nm टॉर्क निर्माण करते. कंपनीचा दावा आहे की, ही बाईक तिच्या कमाल टॉर्कपैकी सुमारे 70% टॉर्क 3,000 rpm इतक्या कमी वेगातच निर्माण करते. डुकाटीच्या मते, हे त्यांचे आजपर्यंतचे सर्वात हलके ट्विन-सिलेंडर इंजिन आहे, ज्यामध्ये प्रत्येक सिलेंडरमध्ये चार व्हॉल्व्ह आहेत.

यात IVT (व्हेरिएबल इनटेक व्हॉल्व्ह टाइमिंग) तंत्रज्ञान आहे. कंपनीचा दाव्यानुसार हे तंत्रज्ञान त्याच्या सेगमेंटमध्ये अद्वितीय आहे. गिअरबॉक्सबद्दल बोलायचे झाल्यास, पहिले चार गिअर लहान आहेत, ज्यामुळे खडबडीत ऑफ-रोड भूभागावर गाडी चालवणे सोपे होते. सहावा गिअर मोठा आहे, ज्यामुळे हायवेवर आरामदायी प्रवास करता येतो.

फ्रेम आणि ॲडजस्टेबल सस्पेंशन

डेझर्टएक्स V2 मध्ये ॲल्युमिनियमची मोनोकॉक फ्रेम आहे, जी एअरबॉक्सचेही काम करते. इंजिनदेखील फ्रेममध्येच एकात्मिक केलेले आहे. मागील बाजूस ट्रेलिस सबफ्रेम आणि दुहेरी बाजू असलेला ॲल्युमिनियम स्विंगआर्म आहे.

सस्पेंशनची जबाबदारी KYB ने सांभाळली आहे. पुढच्या बाजूला २३० मिमी ट्रॅव्हल असलेला ४६ मिमीचा पूर्णपणे ॲडजस्टेबल अपसाइड-डाउन फोर्क आहे. मागच्या बाजूला रिमोट प्रीलोड ॲडजस्टमेंटसह २२० मिमी ट्रॅव्हल असलेला मोनोशॉक आहे. या बाईकमध्ये पुढच्या बाजूला २१-इंच आणि मागच्या बाजूला १८-इंच ट्यूबलेस स्पोक व्हील्स असून, त्यावर पिरेली स्कॉर्पियन रॅली STR टायर्स बसवलेले आहेत.

सहा रायडिंग मोड आणि वैशिष्ट्ये

या बाईकमध्ये ६-ॲक्सिस आयएमयू (IMU) आहे, जो कॉर्नरिंग एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल, व्हीली कंट्रोल आणि इंजिन ब्रेक कंट्रोल यांसारख्या वैशिष्ट्यांना सपोर्ट करतो. एंड्युरो आणि रॅली मोडमध्ये एबीएस पूर्णपणे बंदही करता येतो. यात डुकाटी क्विक शिफ्ट २.० सिस्टीमदेखील आहे.

रायडरला स्पोर्ट, टूरिंग, अर्बन, वेट, एंड्युरो आणि रॅलीसह सहा रायडिंग मोड्स मिळतात. याव्यतिरिक्त, EVO मध्ये ५-इंचाचा TFT डिस्प्ले, नवीन जॉयस्टिक कंट्रोल्स, पूर्ण LED हेडलाइट्स, क्रूझ कंट्रोल आणि ब्रेक लाइट ही वैशिष्ट्ये आहेत. तसेच, ही गाडी डुकाटीच्या मल्टीमीडिया सिस्टीम आणि टर्न-बाय-टर्न नॅव्हिगेशनने सुसज्ज आहे.

Vijay Wadettiwar Attacks On Sharad Pawar: पाठित खंजीर खुपसण्याचा इतिहास...; काँग्रेसचा शरद पवारांवर जहरी टिका

Land Ownership Dispute: पंतप्रधान मोदींच्या बालमित्राच्या जमिनीचा १९ वर्षांचा तिढा सुटला; अपर तहसीलदारांचा २७ पानी आदेश, असगरभाईंना दिलासा

IND vs NZ Christchurch Test Day 2: दुसऱ्या दिवशी भारतीय संघ गडगडला, ६ विकेट्स गमावले; न्यूझीलंड आघाडीवर

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीचा मुद्दा तापला; इटलीच्या मेलोनी सरकारने लागू केला 1.1 लाख रुपये दंडाचा नवा कायदा

Tandel Marathi Movie: समुद्राशी नातं, संघर्षाची कहाणी! सयाजी शिंदे आणि ओम भुतकर यांच्या ‘तांडेल’ची घोषणा