Maruti Suzuki Cars Price Hike In India  (फोटो सौजन्य-AI एआय)
ऑटोमोबाइल

Maruti Suzuki Cars Price Hike: मारुती सुझुकीच्या कार पुन्हा महागल्या! 2026 मधील चौथी दरवाढ, जाणून घ्या नव्या किंमती

मारुती सुझुकीने 22 नोव्हेंबरपासून निवडक कारच्या किंमती सरासरी 0.31% ने वाढवल्या आहेत. 2026 मधील ही कंपनीची चौथी दरवाढ आहे. अरेना आणि नेक्सा शोरूममधील कारच्या किंमती 3.49 लाख ते 29.04 लाख रुपयांदरम्यान आहेत.

Atharva Rajopadhye
  • मारुती सुझुकीने 22 नोव्हेंबरपासून निवडक कारच्या किंमती वाढवल्या आहेत.

  • 2026 मध्ये कंपनीने आतापर्यंत चार वेळा दरवाढ केली आहे.

  • निवडक मॉडेल्सच्या किंमती सरासरी 0.31% ने वाढवण्यात आल्या आहेत.

भारतातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी Maruti Suzuki ने आपल्या काही कारच्या किंमतीत पुन्हा वाढ केली आहे. कंपनीने 22 नोव्हेंबर 2026 पासून ही दरवाढ लागू केली आहे. विशेष म्हणजे, 2026 या कॅलेंडर वर्षातील ही कंपनीची चौथी दरवाढ आहे म्हणायला हवं. यापूर्वी जून, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही कंपनीने कारच्या किंमती वाढवल्या होत्या. यावेळी निवडक मॉडेल्सच्या किंमती सरासरी 0.31% ने वाढवण्यात आल्या आहेत. वाहनांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या वाढत्या खर्चामुळे हा निर्णय घेतल्याचे कंपनीने सांगितले आहे.

मारुती सुझुकीच्या अरेना कारच्या किंमती

मारुती सुझुकी अरेना शोरूममध्ये एस-प्रेसो, ऑल्टो K10, सेलेरिओ, वॅगनआर, ईको, स्विफ्ट, डिझायर, ब्रेझा, अर्टिगा आणि व्हिक्टोरिस अशा 10 कार विकल्या जातात. यामध्ये एस-प्रेसोची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 3,49,900 रुपये असून टॉप मॉडेलची किंमत 5,32,400 रुपये आहे. ऑल्टो K10 ची किंमत 3,69,900 ते 5,44,900 रुपये, तर वॅगनआरची किंमत 4,98,900 ते 7,23,900 रुपये आहे.

स्विफ्टची किंमत 5,83,900 ते 8,96,400 रुपये आणि डिझायरची किंमत 6,33,600 ते 9,63,700 रुपये आहे. SUV मध्ये ब्रेझाची किंमत 7,54,900 ते 13,75,500 रुपये, तर व्हिक्टोरिसची किंमत 10,59,900 ते 19,98,900 रुपये आहे.

नेक्सा कारच्या किंमतीही जाणून घ्या

मारुती सुझुकीच्या नेक्सा शोरूममध्ये बलेनो, फ्रॉन्क्स, ग्रँड विटारा, XL6, जिम्नी, ई-व्हिटारा आणि इन्व्हिक्टो या कार विकल्या जातात. बलेनोची किंमत 5,98,900 ते 9,99,000 रुपये आहे. फ्रॉन्क्सची किंमत 6,94,900 ते 12,07,900 रुपये, तर ग्रँड विटाराची किंमत 10,76,500 ते 19,70,600 रुपये आहे.

कंपनीची पहिली इलेक्ट्रिक SUV ई-व्हिटारा 16,19,000 ते 20,21,000 रुपयांमध्ये मिळते. कंपनीची फ्लॅगशिप कार इन्व्हिक्टोची किंमत 25,27,400 ते 29,04,800 रुपये आहे.

कमर्शियल वाहनांचीही मोठी लिस्ट

मारुती सुझुकीच्या कमर्शियल वाहनांमध्ये टूर H1, टूर H3, सुपर कॅरी, टूर V, ईको कार्गो, टूर S आणि टूर M यांचा समावेश आहे. कंपनीच्या संपूर्ण प्रवासी कार पोर्टफोलिओच्या किंमती 3,49,900 ते 29,04,800 रुपयांदरम्यान आहेत. त्यामुळे नवीन कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या कस्टमर्सना आता सुधारित किंमती तपासूनच बुकिंग करावे लागणार आहे.

Cute Viral Video : केस कापायला नकार, डोळ्यात पाणी अन् चेहऱ्यावर राग; चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Dharashiv Dance Competition : पुण्यात धाराशिवच्या कलाकारांचा डंका! 'रस रंग' ग्रुपची गरब्यात बाजी

सामाजिक संस्थांसाठी निधीची सुवर्णसंधी! कोणतेही परतफेडीचे बंधन न ठेवता Wadhwani Foundation देणार अनुदान; पाहा कोण करू शकते अर्ज

Health tips: कोकम वॅक्स म्हणजे काय? त्वचेच्या काळजीसाठी कसा होतो उपयोग? जाणून घ्या सविस्तर माहिती!

Mumbai News : १६० चौ. फुटांच्या चाळीतून थेट ५०० चौ. फुटांच्या घरात! ५५७ कुटुंबांचे स्वप्न साकार; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते घरांच्या चाव्यांचे वाटप