केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात नेमकी वाढ कधी होणार? (Photo Credit- X) 
Business

DA Hike Big Update: होळी सरली, एप्रिलचा आठवडाही उलटला; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात नेमकी वाढ कधी होणार?

होळी उलटली तरी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता का रखडला? जाणून घ्या विलंबाची कारणे आणि महागाई भत्त्यातील संभाव्य वाढीचे संपूर्ण गणित.

नितिन कुऱ्हे
  • होळी सरली
  • एप्रिलचा आठवडाही उलटला
  • केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात नेमकी वाढ कधी होणार?

DA Hike News: देशातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्याच्या (DA) घोषणेची प्रतीक्षा आता अधिकच खडतर होत चालली आहे. दरवर्षी साधारणपणे होळीच्या सुमारास जाहीर होणारी ही दरवाढ, यंदा एप्रिलचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी अद्याप अधांतरीच आहे. सातव्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) अंमलबजावणीनंतरचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विलंब मानला जात असून, कर्मचारी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

महागाई भत्त्याच्या घोषणेला उशीर का?

साधारणपणे जानेवारीपासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याची घोषणा मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत केली जाते. गेल्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये 28 मार्च रोजी ही घोषणा झाली होती. यंदाच्या विलंबामागे तज्ज्ञांनी खालील प्रमुख कारणे सांगितली आहेत. मध्यपूर्वेतील वाढता तणाव आणि युद्धाच्या परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधन दरात अस्थिरता निर्माण झाली आहे. याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि पुरवठा साखळीवर परिणाम होत असल्याने सरकार सावधगिरीने पावले उचलत आहे. केंद्र सरकार सध्या 8 व्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) रचनेवर आणि नवीन आर्थिक वर्षाच्या नियोजनावर काम करत आहे. या तांत्रिक प्रक्रियेमुळे महागाई भत्त्याच्या निर्णयाला विलंब होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तुमच्या पगारात नेमकी किती वाढ होणार?

औद्योगिक कामगारांच्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (AICPI-IW) गेल्या 12 महिन्यांच्या सरासरी आकडेवारीनुसार, यंदा महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ निश्चित मानली जात आहे.

  • सध्याचा दर: 58%

  • वाढीनंतरचा दर: 60%

ही वाढ 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल. म्हणजेच कर्मचाऱ्यांना गेल्या तीन ते चार महिन्यांची थकबाकी देखील पगारामध्ये मिळणार आहे.

पुढच्या आठवड्यात मिळू शकते 'गुड न्यूज'

विविध मीडिया रिपोर्ट्स आणि आर्थिक तज्ज्ञांच्या मते, मोदी सरकार पुढच्या आठवड्यात (एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात) महागाई भत्ता वाढवण्याची अधिकृत घोषणा करू शकते. नवीन आर्थिक वर्षातील संक्रमण आणि वेतन आयोगातील संरचनात्मक बदलांना अंतिम रूप दिल्यानंतर सरकार ही घोषणा करण्याच्या तयारीत आहे.

महागाई भत्त्याशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे:

1. केंद्र सरकार वर्षातून दोनदा (जानेवारी आणि जुलै) महागाई भत्त्यात सुधारणा करते.

2. याची घोषणा सहसा होळी आणि दिवाळीच्या मुहूर्तावर केली जाते.

3. कोरोना काळात (2019-2021) महागाई भत्ता 18 महिन्यांसाठी 17 टक्क्यांवर गोठवण्यात आला होता.

4. 31 डिसेंबर 2025 रोजी सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ तांत्रिकदृष्ट्या संपला असला, तरी पुढील आदेशापर्यंत कर्मचाऱ्यांना याच आयोगाच्या शिफारसींनुसार लाभ मिळत राहतील.

IND vs NZ: गिल भाई थेट नाचायलाच लागला राव! DRS बरोबर आला अन् Video Viral

Handshake Controversy : 'नो हँडशेक' मागे खूप मोठे मुद्दे, ज्यावर आमचा नियंत्रण नाही : MCC हेड ऑफ क्रिकेट

वाढदिवसाचा केक कापताना वाद, तरुणावर घरात घुसून तीक्ष्ण शस्त्राने वार वार; लोणी काळभोर भागातील घटनेनं खळबळ

Rajasthan News: निवडणुकीत पराभव होताच गावातील ५० पथदिवे गायब! राजस्थानमध्ये नेमकं काय घडलं?

Ananya Agarwal's Cafe: वयाच्या २१ व्या वर्षी बनला उद्योजक! नोकरीच्या मागे न लागता सुरू केला कॅफे, अडीच महिन्यांत २२ लाखांची कमाई