डिफेंस शेअर्समध्ये तुफानी तेजी! BEML तब्बल 17% उसळला 
Business

Defence Stocks : डिफेंस शेअर्समध्ये तुफानी तेजी! BEML तब्बल 17% उसळला; BDL आणि HAL मध्येही जोरदार खरेदी, काय आहे कारण?

Defence Stocks Surge BEML : भारतीय शेअर बाजारात संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये लक्षणीय तेजी पाहायला मिळत असून, BEML च्या शेअरमध्ये तब्बल १७ टक्क्यांची उसळी नोंदवली गेली आहे, तर BDL आणि HAL सह इतर डिफेंस शेअर्समध्येही गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी होत आहे.

Ankita Karangutkar
  • डिफेंस शेअर्समध्ये तुफानी तेजी!

  • BEML तब्बल 17% उसळला

  • BDL आणि HAL मध्येही जोरदार खरेदी

Defence Stocks Surge BEML : शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात संरक्षण क्षेत्रात जोरदार तेजी दिसून आली. बाजारातील निवडक शेअर्समध्ये खरेदी होत असताना, संरक्षण कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांच्या नजरेत आले. व्यवहारादरम्यान, अनेक संरक्षण कंपन्यांच्या शेअर्समध्ये ३ ते १७% पर्यंत वाढ नोंदवली गेली. पण अचानक या शेअर्समध्ये होणाऱ्या वाढीमागे नेमकं काय कारण?

या तेजीमध्ये सरकारी कंपनी BEML आघाडीवर होती. तिचे शेअर्स सुमारे १७% नी वाढून २३७८ रुपयांच्या पातळीवर पोहोचले, जो तिचा नवीन ५२-आठवड्यांचा उच्चांक आहे. त्याच वेळी, भारत डायनॅमिक्स (BDL), हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL), पारस डिफेन्स आणि सोलर इंडस्ट्रीज यांसारख्या शेअर्समध्येही चांगली खरेदी दिसून आली.

संरक्षण क्षेत्रातील समभागांमधील या तेजीचा परिणाम क्षेत्रीय निर्देशांकांवरही दिसून आला. Nifty India Defence इंडेक्समध्ये जवळपास ४% वाढ झाली. विशेष म्हणजे, निर्देशांकात समाविष्ट असलेल्या सर्व २२ कंपन्यांच्या समभागांमध्ये तेजी दिसून आली. डिफेन्स इंडेक्स गेल्या सलग तीन ट्रेडिंग सत्रांपासून तेजीच्या ट्रेंडवर असून, या कालावधीत त्यात ५% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.

BEML च्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

शुक्रवारच्या व्यवहारात संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये बीईएमएल सर्वात मोठा वाढलेला शेअर ठरला. कंपनीचे शेअर्स जवळपास १७ टक्क्यांनी वाढून ₹२,३७८ वर पोहोचले. या वाढीने ५२ आठवड्यांचा नवीन उच्चांकही गाठला. सोलर इंडस्ट्रीज इंडियाच्या शेअर्समध्येही ६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. पारस डिफेन्स, भारत डायनॅमिक्स आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या शेअर्समध्येही ३ ते ६ टक्क्यांची वाढ झाली. भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये जवळपास २ टक्क्यांची वाढ दिसून आली.

संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये इतकी वाढ का?

संरक्षण क्षेत्रातील शेअर्समधील या तेजीमागे अनेक प्रमुख कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे संरक्षण मंत्रालयाची संरक्षण भांडवली खर्च वाढवण्याची तयारी. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या म्हणण्यानुसार, मंत्रालय आर्थिक वर्ष २०२७-२८ (एफवाय२८) साठी संरक्षण भांडवली खर्चात २० टक्के वाढ करू इच्छित आहे. यामुळे भविष्यात संरक्षण कंपन्यांना नवीन ऑर्डर्स मिळण्याची शक्यता वाढू शकते.

गुंतवणूकदार ॲडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट AMCA कार्यक्रमावरही लक्ष ठेवून आहेत. संरक्षण सचिवांनी सांगितले की, या कार्यक्रमाच्या विजेत्याची घोषणा सुमारे एका महिन्याच्या आत केली जाऊ शकते. या प्रकल्पासाठी तीन खाजगी क्षेत्रातील समूह स्पर्धा करत आहेत. यामध्ये एल अँड टी-बीईएल-बीडीएल समूह, भारत फोर्ज-बीईएमएल-डेटा पॅटर्न्स समूह आणि टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स यांचा समावेश आहे.

HALवर ब्रोकरेजचा सकारात्मक दृष्टिकोन

एलारा कॅपिटल या ब्रोकरेज फर्मचा अहवाल देखील एचएएलच्या शेअर्समधील वाढीमागे एक कारण होता. ब्रोकरेजने कंपनीच्या शेअर्सवर 'बाय' रेटिंग कायम ठेवले आहे आणि त्याचे लक्ष्य मूल्य ६,००० रुपयांवरून ६,२७० रुपयांपर्यंत वाढवले ​​आहे. ब्रोकरेजचे नवीन लक्ष्य मागील बंद भावाच्या तुलनेत अंदाजे २८% वाढीची शक्यता दर्शवते.

मला व्यसनमुक्ती केंद्रात का पाठवले? म्हणत पतीचा संताप; पत्नीवर स्वयंपाकघरातील चाकूने वार

अकोल्यात मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; उंच इमारतीवर सुरक्षा साधनांविना मजुरांचे काम

'सिलेक्टर्स, प्लीज आता...'; Vaibhav Suryavanshi बाबत श्रीकांत यांचा निवड समितीला 'हा' इशारा?

Mrudgandha Awards 2026 : ‘मृद्गंध पुरस्कार २०२६’ सोहळा दिमाखात संपन्न; पं. सुरेश तळवलकरांसह दिग्गज कलाकारांचा गौरव

Nagpur News : पॅरामेडिकल शिक्षण घेतले, रोजगाराची हमी कधी ? प्रादेशिक पॅरामेडिकल संस्था अनेक वर्षांपासून रखडली