Banks Offer EV Charging Infrastructure Loan Banks Offer EV Charging Infrastructure Loan
Business

Banks Offer : इलेक्ट्रिक वाहनांच्या युगात कमाईची मोठी संधी! Charging स्टेशनसाठी बँकांनी उघडला खजिना! मिळणार 10 कोटींचा निधी

Banks Offer : देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वेगाने वाढत असतानाच चार्जिंग स्टेशनच्या पायाभूत सुविधांसाठी बँकांनी मोठा आर्थिक हात पुढे केला आहे.

Ankita Karangutkar

Banks Offer : देशात इलेक्ट्रिक वाहनांची म्हणजेच EVs कारची मागणी झपाट्याने वाढत आहे. पेट्रोल आणि डिझेलची बचत करण्यासाठी लोक इलेक्ट्रिक कार आणि स्कूटर खरेदी करत आहेत. अगदी सरकारही या वाहनांना प्रोत्साहन देत आहे. पण, ईव्ही खरेदीदारांसमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे चार्जिंग स्टेशनची उपलब्धता. अनेक शहरांमध्ये आणि महामार्गांवर अजूनही पुरेशी चार्जिंग स्टेशन्स नाहीत. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणे ही पैसे कमावण्याची एक चांगली संधी असू शकते. कारण त्यासाठी बँका तुम्हाला त्यांचा खजिना उघडून देणार आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या व्यवसायासाठी तुम्हाला आता तुमची संपूर्ण बचत गुंतवण्याची गरज नाही. देशातील अनेक सरकारी बँका ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी विशेष कर्ज योजना देत आहेत. या योजनांअंतर्गत, व्यवसाय आणि उद्योजकांना ₹५ कोटी ते ₹१० कोटी पर्यंतचे कर्ज मिळू शकते. यामध्ये एसबीआय, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. पण, कर्जाची मर्यादा आणि अटी प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळ्या आहेत.

SBI पासून ते सेंट्रल बँकेपर्यंत कर्ज

वेगवेगळ्या बँकांनी ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी योजना सुरू केल्या आहेत. या योजना नवीन चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी आणि विद्यमान स्टेशनचा विस्तार करण्यासाठी निधी पुरवतात.

१. SBI EV Mitra योजना

एसबीआयने ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी ईव्ही मित्र योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, व्यवसायांना ₹१० लाखांपेक्षा जास्त आणि ₹५ कोटींपर्यंत मुदत कर्ज मिळू शकते. ही योजना सार्वजनिक चार्जिंग स्टेशन, खाजगी चार्जिंग स्टेशन आणि बॅटरी स्वॅपिंग स्टेशन उभारण्यासाठी निधी पुरवते.

कर्ज परतफेडीचा कमाल कालावधी ८ वर्षे असून, ९ महिन्यांपर्यंत स्थगिती (मोरेटोरियम) आहे. तथापि, प्रकल्पाच्या खर्चापैकी २५% रक्कम कर्जदाराला सोसावी लागेल.

२. बँक ऑफ बडोदाची bob Green PLUG योजना

बँक ऑफ बडोदाने ईव्ही चार्जिंग आणि बॅटरी स्वॅपिंग व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी बॉब ग्रीन प्लग योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत १० लाख रुपयांपेक्षा जास्त आणि ५ कोटी रुपयांपर्यंतची कर्जे उपलब्ध आहेत. ही योजना नवीन चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी आणि विद्यमान स्टेशन्सच्या विस्तारासाठी निधी देखील पुरवते.

या कर्जावरील व्याजदर वार्षिक ८.१५% ते ९.६०% पर्यंत आहे. परतफेडीचा कालावधी १० वर्षांचा आहे.

३. इंडियन बँकेची IND Green Charge योजना

इंडियन बँकेने ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधांसाठी इंड ग्रीन चार्ज योजना सुरू केली आहे. सार्वजनिक, खाजगी आणि फ्लीट चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी कर्जे दिली जातात. या योजनेअंतर्गत उपलब्ध असलेली कमाल कर्जाची रक्कम १० कोटी रुपये असून, परतफेडीचा कालावधी ८ वर्षांपर्यंत आहे.

४. सेंट्रल बँक ऑफ इंडियाची Cent EV Connect योजना

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्यांना आर्थिक सहाय्य देखील देत आहे. बँकेच्या सेंट ईव्ही कनेक्ट योजनेअंतर्गत ₹११ लाख ते ₹१० कोटी पर्यंतची मुदत कर्जे उपलब्ध आहेत.

ही योजना सार्वजनिक आणि खाजगी चार्जिंग स्टेशन्स व्यतिरिक्त, बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स उभारण्यासाठी देखील निधी पुरवते. अर्जदारांनी प्रकल्पाच्या खर्चाच्या किमान २५% किंवा मार्जिन मनीचा काही भाग देणे आवश्यक आहे.

कर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक?

ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी कर्जाकरिता अर्ज करण्यापूर्वी, तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक स्टेटमेंट, व्यवसाय नोंदणी आणि प्रकल्प अहवाल असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, चार्जिंग स्टेशन ज्या ठिकाणी स्थापित करायचे आहे, त्या जागेसंबंधीची कागदपत्रे देखील मागितली जाऊ शकतात.

Kalatmak Rajyog: डिसेंबरच्या सुरुवातीला कलात्मक योगाचा प्रभाव; कर्क राशीसह या राशींच्या लोकांना मिळणार करिअरमध्ये मोठे यश

Fashion: महाराष्ट्रीयन साड्यांचे आहेत अनेक प्रकार; पैठणीपासून नऊवारीपर्यंत जाणून घ्या प्रत्येक साडीची खासियत!

Vaibhav Sooryanvanshi: ६ संघाच्या एकत्रित सिक्स वैभवच्या नावे, पाकिस्तानची तंतरली; वैभव सूर्यवंशीची दहशत

Suspicious Death: हृदयविकाराचा झटका असल्याचा बनाव अन् कपाटात लपवलेली ती साडी! सुनेच्या मृत्यू प्रकरणात हत्येचा गंभीर संशय...

Rahul Gandhi on Rajiv Gandhi assassination: बाबांच्या हत्येसाठीच जाणीवपूर्वक सुरक्षा हटवली; राहुल गांधींचा धक्कादायक दावा