भारतीय अर्थव्यवस्थेसाठी 'गुड न्यूज'! (photo-social media) 
Business

Indian Economy: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी 'गुड न्यूज'! येत्या दोन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था झेप घेणार; 2025-26 मध्ये 6.5 टक्के वाढ

भारताची अर्थव्यवस्थेसाठी गुड न्यूज असून 2025-26 मध्ये 6.5 टक्क्याने वाढ झाली आहे. येत्या दोन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था झेप घेणार असून अमेरिका भारतीय उत्पादनांवर लावलेलं टॅरिफ कमी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Priti Hingane
  • भारताची अर्थव्यवस्था 2025-26 मध्ये 6.5 टक्क्याने वाढ
  • येत्या दोन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था झेप घेणार
  • अमेरिका भारतीय उत्पादनांवर लावलेलं टॅरिफ कमी करण्याची शक्यता

Indian Economy: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी 'गुड न्यूज' आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला दिलासा मिळाला आहे. एस अँड पी या  ग्लोबल रेटिंग्जने भारताची अर्थव्यवस्था 2025-26 मध्ये 6.5 टक्क्यांने वाढल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे येत्या दोन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था झेप घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एस अँड पीने कर कपातीमुळं मागणी वाढणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. तसेच, भारतीय आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये सुद्धा 6.7 टक्क्यांनी वाढ होणार असल्याचे भाकीत त्यांनी केले आहे.

भारताने अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी जीएसटीच्या स्लॅबमध्ये कपात तसेच, आरबीआयने पतधोरण जाहीर केल्यानंतर कपातीमुळे मागणी वाढण्याचा अंदाज एस अँड पी सांगितलं आहे. एप्रिल ते जून कालावधीत 7.8 टक्क्यांनी भारताचा सकल देशांतर्गत उत्पादनाचा  जीडीपी वाढू शकतो.

S & P धडाकेबाज Report

28 नोव्हेंबरला जीडीपी वाढीच्या अंदाजाची माहिती अधिकृतपणे जाहीर होणार असून एस अँड पीनं एशिया पॅसिफिक रिपोर्टमध्ये इकोनॉमिक आऊटलूक मार्फत भारताचा जीडीपी 2025-26 मध्ये 6.5 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. तसेच 2026-27 मध्ये 6.7 टक्के जीडीपी वाढीचा दर असू शकतो. भारतावर  अमेरिकेनं अतिरिक्त टॅरिफ लावले असूनही देशांतर्गत मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.

भारताचा जीडीपी वाढीचा दर भारतीय रिझर्व्ह बँकेनं 6.8 टक्के राहू शकतो असे सांगितले. वस्तू आणि सेवा कराचे दर कमी केल्यामुळे मध्यम वर्गाकडून मागणी वाढू लागली. आणि तसेच, या वर्षाच्या सुरुवातीला आयकर सूट आणि आरबीआयनं रेपो रेटमधील केलेली कपात यांच्यामुळे देशातील ग्राहकांनी मागणी वाढवली आहे. ज्यामुळे अर्थव्यवस्ठेला प्रोत्साहन मिळेल.

केंद्र सरकारने जेव्हा 2025-26 चा अर्थसंकल्प सादर केला तेव्हा आयकर सवलत 7 लाख रुपयांवरुन 12 लाखांपर्यंत वाढवली. देशातील मध्यमवर्गाला त्यामुळे 1 लाख कोटी रुपयांची कर सवलत मिळाली. तसेच, 22 सप्टेंबरपासून तब्बल 375 वस्तूंवरील जीएसटीदर कमी केला. ज्यात दैनंदिन वापरातील वस्तू होते. भारतावर मोठ्या प्रमाणात अमेरिकेनं टॅरिफ लावल्याने निर्यातीवर परिणाम झाला मात्र, काही काळानंतर अमेरिका भारतीय वस्तूंवरील टॅरिफ कमी करण्याची शक्यता आहे. भारतातील काही कंपन्यांनी रशियन तेल खरेदी स्थगित केल्याने अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निर्णय बदलतात का ते पाहावं लागणार आहे.

Winter fashion: हिवाळ्यात कपडे खरेदी करताना निवडा हे ७ खास फॅब्रिक्स; लोकरीपासून फ्लिसपर्यंत जाणून घ्या कापडांचे प्रकार!

LinkedIn Study Entrepreneurship : स्टार्टअप आणि बिझनेसचा क्रेझ! 85% व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचाय; लिंक्डइनचा सर्वे काय सांगतो?

भातकापणीत मग्न सासू-सुनेवर काळाचा घाला; त्याच्या हल्ल्यात सासूचा मृत्यू, सून जखमी...

वृषणांची स्वतः तपासणी: पुरुषांना कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखण्यास मदत करणारी एक सोपी सवय

US Tariff : अमेरिकेचा भारताला मोठा झटका! भारतीय वस्तूंवर 25% आयात शुल्क लादण्याचा प्रस्ताव; पण ट्रम्प यांनी 'या' अटीवर दिलासा देण्याची दर्शवली तयारी