अमेरिकेची दुटप्पी भूमिका... ( सौजन्य - सोशल मीडिया )  
Business

US Russia India Oil Trade : अमेरिकेची दुटप्पी भूमिका...भारताला निर्बंधांचा सल्ला देऊन स्वतः करतोय रशियाकडून तेल खरेदी

US Russia India Oil Trade Controversy : जागतिक ऊर्जा बाजारात अमेरिकेचा मोठा दुटप्पीपणा आणि पाखंडीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताला रशियन कच्चे तेल न खरेदी करण्याचा आणि निर्बंध पाळण्याचा सल्ला देणारा अमेरिका स्वतः मात्र गुपचूप रशियाकडून तेलाची आयात करत असल्याचे समोर आले आहे.

Ankita Karangutkar
  • अमेरिकेची दुटप्पी भूमिका...
  • भारताला निर्बंधांचा सल्ला दिला
  • स्वतः करतोय रशियाकडून तेल खरेदी

US Russia India Oil Trade Controversy : जागतिक स्तरावर समीकरणं बदलत चालली आहेत. संघर्षाच्या काळानंतर आता मात्र कोण कोणत्या भूमिकेत आहे हा मोठा प्रश्नच आहे. या आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी करण्याची घोषणा केली आहे. ज्यामुळे आता जगभरात खळबळ उडाली आहे. एकीकडे, अमेरिकेने भारतासह जगातील पहिल्या पाच देशांना धमकी दिली आहे. जर त्यांनी रशियाकडून तेल खरेदी केलं तर अमेरिका त्यांच्याकडून 100 % टॅरिफ लादेल आणि इथे मात्र वेगळ्याच भूमिकेत दिसत आहे. नेमका काय आहे हा प्रकार? ( US Russia India Oil Trade Controversy ) 

अमेरिकेने 'रशिया आणि इराणवरील निर्बंध कायदा SRIA २०२६' देखील मंजूर केला आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की, हा कसला दुटप्पीपणा आहे? एकीकडे ते इतर देशांना रशियाकडून तेल खरेदी करण्यास मनाई करत आहे, तर दुसरीकडे ते स्वतःच तेच करत आहे. नेमकं चाललंय काय जगाच्या राजकारणात?

अमेरिकेने रशियाकडून तब्बल ४.८ दशलक्ष टन डिझेल खरेदी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील करारानुसार, अमेरिका रशियाकडून एकूण ४.८ दशलक्ष टन म्हणजे अंदाजे ३६ दशलक्ष बॅरल डिझेल खरेदी करणार आहे. यापैकी ३००,००० टनांहून अधिक डिझेलचा पुरवठा तात्काळ केला जाईल. आणखी ५००,००० टन नोव्हेंबरमध्ये पाठवले जातील. त्यानंतर आणखी १ दशलक्ष टन डिझेल पाठवले जाईल. ट्रम्प यांच्या मते, सर्व काही सुरळीत पार पडल्यास, रशिया ३ दशलक्ष टन डिझेलचा पुरवठा करू शकेल.

अमेरिकेची दुटप्पी भूमिका का?

नोव्हेंबर २०२६ मध्ये मध्यावधी निवडणुका होणार आहेत आणि डिझेलच्या किमती लक्षणीयरीत्या वाढल्या आहेत. त्यात सध्या त्या प्रति गॅलन ६.२८ डॉलर या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. प्यू रिसर्चनुसार, सध्या ८४% अमेरिकन मतदारांसाठी अर्थव्यवस्था हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. शेतकरी, ट्रक चालक आणि लहान व्यवसायिकांपासून ते अमेरिकेतील प्रत्येकजण महागाईमुळे मोठ्या चिंतेत आहे आणि हे लोक ट्रम्प यांच्या मतपेढीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहेत. अशा परिस्थितीत, कुठेतरी ट्रम्प प्रशासन निवडणुकीतील आपला विजय निश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलत आहे. या भूमिकेचा ट्रम्प यांना नेमका काय फायदा होतो हे पाहावं लागेल. याचा भारतासह इतर देश कसा अर्थ काढतात आणि काय भूमिका मांडतात हे महत्त्वाचं ठरणार आहे.

MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! गट 'क' परीक्षेचा अर्ज भरण्यास 'या' तारखेपर्यंत मुदत

चुलत दीर आणि भावजयी बेपत्ता झाले अन् दुसऱ्याच सकाळी शेतातील स्टोअर रूममध्ये...

बिजवाई सोयाबीनला ८ हजारावर भाव! चार वर्षांनंतर सोयाबीनला सोन्याची झळाळी; शेतकऱ्यांना दिलासा

Iran : इराणची युद्धनीती जगात भारी! अमेरिकेला मात देण्यासाठी वापरले इलॉन मस्कचेच तंत्रज्ञान; स्टारलिंकचा वापर करून उडवले US Air Base

म्युझिक लव्हर्सना गिफ्ट द्यायचंय? हेडफोनपासून स्पीकरपर्यंत... 'हे' गॅझेट्स ठरतील बेस्ट पर्याय