CRPF Specialist Medical Officer Recruitment: वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) कंत्राटी तत्त्वावर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसरच्या १९ पदांवर भरतीसाठी अधिकृत सूचना जारी केली आहे. विशेष म्हणजे या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. तर उमेदवारांची निवड थेट वॉक इन इंटरव्यू, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीच्या आधारे केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेत महिला आणि पुरुष उमेदवरांना सहभागी होण्याची संधी असेल. तसेच निवड झालेल्या डॉक्टरांना ८५,००० रुपये वेतन दिले जाईल. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवार भरतीसंदर्भात मार्गदर्शक सूचना सीआरपीएफच्या rect.crpf.gov.in या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात.
सीआरपीएफच्या वेगवेगळ्या कंपोजिट हॉस्पिटल्समध्ये १४ पदाअंतर्गत एकूण १९ जागांवर नियुक्ती केली जाणार आहे. ज्यामध्ये सर्जन पदासाठी ९ जागा, रेडिओलॉजी पदासाठी ४ जागा, ऑप्थेल्मोलॉजी पदासाठी २ जागा, ॲनेस्थीसिया पदासाठी २ जागा आणि प्रसूती व स्त्री रोग पदासाठी २ जागांचा समावेश होतो.
या पदांसाठी उमेदवाराकडे भारतीय वैद्यकीय परिषद कायदा १९५६ अंतर्गत मान्यताप्राप्त ॲलोपॅथिक वैद्यकीय पदवी आणि अनिवार्य रोटेटिंग इंटर्नशिप पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. याशिवाय संबंधित विषयातील पीजी पदवीसह १.५ वर्षाचा अनुभव किंवा पीजी डिप्लोमासह २.५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच प्रत्यक्ष मुलाखतीच्या दिवसापर्यंत उमेदवाराचे वय ७० वर्षांपेक्षा कमी असावे.
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ८५,०००० रुपये मानधन दिले जाईल. कराराच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता किंवा दैनिक भत्ता दिला जाणार नाही.
मुलाखतीसाठी जाताना उमेदवारांनी संबंधित कपोजिट हॉस्पिटलमध्ये सोबत कोऱ्या कागदावर लिहलेला अर्ज (ज्यावर पदाचे नाव स्पष्टपणे नमूद असावे), पदवी प्रमाणपत्र, वयाचा दाखला आणि अनुभव प्रमाणपत्रासह सर्व मूळ कागदपत्रे त्यांच्या फोटोकॉपीज आणि अलीकडील ३ पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत घेऊन जावेत. अधिक माहितीसाठी उमेदवार rect.crpf.gov.in या वेबसाईटला भट देऊ शकतात किंवा 01124368630 या हेल्पलाइनवर संपर्क साधू शकतात.
CRPF मध्ये कोणत्या पदांसाठी आणि किती जागांवर भरती होत आहे?
केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) कंत्राटी तत्त्वावर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर या पदाच्या एकूण १९ जागांवर भरती होत आहे.
या भरतीसाठी निवड प्रक्रिया कशी असेल?
या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा नसेल; उमेदवारांची निवड थेट वॉक-इन इंटरव्यू, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीद्वारे केली जाईल.
निवड झालेल्या उमेदवारांना किती पगार मिळेल?
या भरतीप्रक्रियेत निवड झालेल्या महिला व पुरुष डॉक्टरांना दरमहा ८५,००० रुपये वेतन दिले जाईल.