फोटो सौजन्य - एआय 
Career

Drought Students Relief: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! ५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

Maharashtra Drought Students Relief: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमीच्या माध्यमातून विद्यापीठस्तरीय कृती समितीच्या सदस्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.

श्रेया देशमुख

Maharashtra Drought Students Relief: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमीच्या (एमएसएफडीए) माध्यमातून विद्यापीठस्तरीय कृती समितीच्या (टास्क फोर्स) सदस्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. शुक्रवार, दि. ४ डिसेंबर २०२६ रोजी एमएसएफडीए, शिवाजीनगर, पुणे येथे होणाऱ्या या प्रशिक्षणाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिली.

३०० हून अधिक तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी विभाग दोन टप्प्यांत काम करत आहे. पहिल्या टप्प्यात पाच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले. आता दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना आणखी कोणत्या सोयी-सुविधा पुरविता येतील, यासाठी हे प्रशिक्षण होणार आहे. अपुऱ्या पावसामुळे शासनाने ३०० हून अधिक तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.

उत्पन्न घटल्याने विद्यार्थ्यांना शुल्क, वसतिगृह व भोजनाचा खर्च भागविणे कठीण होत आहे. या पार्श्वभूमीवर पुढील सहा महिने विद्यार्थ्यांना सातत्याने आधार देण्यासाठी प्रत्येक सार्वजनिक विद्यापीठात कृती समिती नेमण्यात आली आहे.

या प्रशिक्षणात ७५ सदस्य सहभागी होणार

या प्रशिक्षणात १५ विद्यापीठांतील सुमारे ७५ सदस्य सहभागी होणार आहेत. परीक्षा शुल्क माफीचे निकष, शुल्क सवलत, ‘कमवा व शिका’ योजना, वसतिगृह व भोजन सुविधा, कम्युनिटी किचन, सीएसआरमधून निधी उभारणी, मोफत प्रवास सुविधा व समुपदेशन याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांची भूमिका

"शासनाच्या सवलती व कल्याणकारी योजना प्रत्यक्ष विद्यार्थ्यांपर्यंत एकसमान, वेळेत आणि संवेदनशीलतेने पोहोचाव्यात, हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. दुष्काळामुळे एकाही विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी विभाग कटिबद्ध आहे,"

विद्यापीठस्तरीय कृती समिती किती काळ विद्यार्थ्यांना आधार देणार आहे?

दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना पुढील सहा महिने सातत्याने आधार देण्यासाठी प्रत्येक सार्वजनिक विद्यापीठात कृती समिती नेमण्यात आली आहे.

कृती समितीच्या सदस्यांचे प्रशिक्षण कुठे आणि कधी होणार आहे?

हे एकदिवसीय प्रशिक्षण शुक्रवार, ४ डिसेंबर २०२६ रोजी एमएसएफडीए (MSFDA), शिवाजीनगर, पुणे येथे होणार असून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते याचे उद्घाटन होईल.

पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांसाठी कोणता दिलासा देण्यात आला आहे?

पहिल्या टप्प्यात पाच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे.

Tech News: यार की शादी है? लग्नसराईत नवदाम्पत्यांसाठी खास बजेट Tech Gadgets

Nagpur News : पुणेरी बाकरवडीचा नागपुरी फ्लेक्सला ठसका; मजेशीर जुगलबंदी

Delimitation Bill: डिलिमिटेशन म्हणजे नेमकं काय? लोकसभा-विधानसभेच्या जागा कशा वाढणार, कोणत्या राज्याला किती फायदा होणार?

Ayushmann Khurrana: मुलाच्या अभिनयाने आई भारावली! ‘ये प्रेम मोल लिया’ पाहून आयुष्मान खुरानाच्या आईची भावुक प्रतिक्रिया

Amravati News: रब्बी हंगामात मका पिकाला शेतकऱ्यांची पसंती! पाणी, खर्चाच्या गणिताने बदलली पीक निवड