फोटो सौजन्य - सोशल मीडिया  
Career

Pune News: शिक्षण विभागाचा मोठा दणका! पुणे विभागातील 'या' शाळांची होणार फेरपटपडताळणी; दोषी आढळल्यास होणार थेट कारवाई

Pune News: राज्यातील १ ली ते १२ वीच्या शाळांची फेरपटपडताळणी होणार आहे. एप्रिल २०२६ च्या पाहणीत ६३९ शाळांत १००% अनुपस्थिती आढळल्याने शिक्षण विभागाने कारवाईचे आदेश दिले.

श्रेया देशमुख
  • शाळांची पटपडताळणी होणार

  • गैरहजर विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त

  • पुणे विभागातील शाळांची यादी जाहीर, दोषींवर शिस्तभंगाची कारवाई होणार

Pune Education News: राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वीच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाण तपासण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पुन्हा फेर पटपडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या पटपडताळणीत धक्कादायक आकडेवारी समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग यांच्याकडून पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व पुणे, अहिल्यानगर, सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत पत्र पाठविण्यात आले आहे.

राज्यात १,१९८ शाळांमध्ये एकही विद्यार्थी नाही

पुणे विभाग शिक्षण उपसंचालक मछिंद्रनाथ कदम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे माहिती दिली. दि. ११, १५ व २२ एप्रिल २०२६ रोजी राज्यात पटपडताळणीचा उपक्रम राबविण्यात आला होता. त्याच्या विश्लेषणात २५ टक्के ते ५० टक्के अनुपस्थिती असलेल्या २ हजार ९४० शाळा, ५० टक्के ते ९९ टक्के अनुपस्थिती असलेल्या १ हजार १९८ शाळा आणि १०० टक्के अनुपस्थिती असलेल्या ६३९ शाळा आढळून आल्या आहेत.

दोषी शाळांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश

आता या सर्व शाळांची तसेच एप्रिलमध्ये ज्या शाळांची पटपडताळणी झाली नाही, अशा शाळांची फेरपटपडताळणी करण्यात येणार आहे. ज्या शाळांमध्ये मागील वर्षी मोठ्या प्रमाणात अनुपस्थितीचे प्रमाण होते, अशा शाळांमध्ये विद्यार्थी संख्या ही संचमान्यतेकरिता ग्राह्य धरण्यात आली आहे का, याची खातरजमा करावी. विद्यार्थी योग्य नसल्याचे आढळल्यास दोषी शाळांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोणत्या इयत्तांच्या शाळांची फेरपटपडताळणी केली जाणार आहे?

राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वीच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाण तपासण्यासाठी ही फेरपटपडताळणी केली जाणार आहे.

एप्रिल २०२६ च्या पटपडताळणीत कोणती धक्कादायक आकडेवारी समोर आली?

एप्रिल २०२६ च्या विश्लेषणात २५% ते ५०% अनुपस्थिती असलेल्या २,९४० शाळा, ५०% ते ९९% अनुपस्थिती असलेल्या १,१९८ शाळा आणि १००% अनुपस्थिती असलेल्या ६३९ शाळा आढळून आल्या आहेत.

पुणे विभागातील कोणत्या महापालिका व जिल्हा परिषदांना आदेश देण्यात आले आहेत?

पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत पत्र पाठवण्यात आले आहे.

'३ वर्षे दोन्ही राष्ट्रवादीचं भांडणाचं नाटक...', राज ठाकरेंचा डिलिमिटेशन बिलावरून NCPवर घणाघात

Cricket News: निकिता सिंगची 80 रन्सची तुफानी खेळी अन्...; ऑक्सिरीच करंडकच्या फायनलमध्ये 'हे' संघ

Border Talks : LAC वर पुन्हा हालचाली! उणे 45°C थंडीत भारतीय लष्कराची मोठी सज्जता, भारत-चीन सीमा चर्चाही सुरू

Love Marriage Dispute : वैजापूरमध्ये प्रेमविवाहावरून राडा! थेट पोलीस ठाण्यात दोन कुटुंबांत हाणामारी

CJP on Delimitation Bill: काँग्रेस इंडिया आघाडीनेतर सीजेपीचाही डिलीमीटेशन बिलाला विरोध; अभिजीत दिपकेंचे मोठं विधान