फोटो सौजन्य- नवराष्ट्र टीम 
Career

Sports Club Recruitment 2026: खेळाडूंसाठी मोठी बातमी! मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ५४ जागांवर भरती; लगेच करा अर्ज

Mumbai Port Trust Sports Club Recruitment 2026: मुंबई पोर्ट अथॉरिटी स्पोर्ट्स क्लबने ५४ क्रीडा प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑफलाइन अर्ज करा आणि दरमहा २०,००० स्टायपेंड मिळवा.

श्रेया देशमुख

Mumbai Port Trust Sports Club Recruitment 2026: मुंबईत क्रीडा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या आणि सरकारी किंवा निमशासकीय संस्थेमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या होतकरू तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या स्पोर्ट्स क्लबतर्फे कंत्राटी तत्त्वावर 'क्रीडा प्रशिक्षणार्थी' पदांच्या ५४ रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमुळे विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंना मुंबई पोर्ट अथॉरिटीसोबत काम करण्याची आणि आपल्या क्रीडा कौशल्याला अधिक विकसित करण्याची उत्तम संधी मिळणार आहे.

या विशेष भरती मोहिमेत एकूण ५४ जागांसाठी खेळाडूंची निवड केली जाणार असून, यामध्ये विविध ९ खेळांचा समावेश आहे. यामध्ये पुरुषांची भरती केली जाणार आहे. पदानुसार रिक्त जागांचा तपशील पाहिल्यास, ॲथलेटिक्ससाठी २, शटल बॅडमिंटनसाठी २, क्रिकेटसाठी १०, कॅरमसाठी १, फुटबॉलसाठी ११, हॉकीसाठी १२, कबड्डीसाठी १०, व्हॉलीबॉलसाठी ५ आणि टेबल टेनिससाठी १ जागेवर भरती होणार आहे. खेळाडूंच्या क्रीडा प्रकारानुसार या जागांचे योग्य वाटप करण्यात आले आहे.

अर्ज प्रक्रिया

या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. या अर्जासाठी २०० रुपयांचा डिमांड ड्राफ्ट काढावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ३१ ऑगस्ट २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. उमेदवारांनी विहित मुदतीत आपले अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह खालील पत्त्यावर पाठवणे बंधनकारक आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज पाठवण्याचा पत्ता खालीलप्रमाणे नोंदवावा: मुंबई पोर्ट ऑथॉरिटी स्पोर्ट्स क्लबचे कार्यालय, तिसरा मजला, इम्पीरियल चेंबर्स, एस. एस. तालोनी मार्ग, न्यू कस्टम हाऊससमोर, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१ असा हा पत्ता आहे. अर्जासोबत आवश्यक क्रीडा प्रमाणपत्रे आणि डिमांड ड्राफ्ट जोडणे अनिवार्य आहे, जेणेकरून अर्ज रद्द होणार नाही.

नियुक्त उमेदवारांना मिळणार 'या' सुविधा

या भरती प्रक्रियेसाठी वयोमर्यादा १ सप्टेंबर २०२६ रोजी किमान १८ वर्षे आणि ३० जून २०२७ रोजी कमाल २५ वर्षे अशी निश्चित करण्यात आली असून यात कोणतीही सवलत मिळणार नाही. तसेच उमेदवारांनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य किंवा आंतर-विद्यापीठ स्तरावर संबंधित खेळात प्रतिनिधित्व केलेले असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना दरमहा २०,००० रुपयांचे विद्यावेतन, १०,००० रुपयांचे किट आणि गियर, मोफत निवास व्यवस्था आणि मेडिक्लेमसह अपघात विमा असा आकर्षक लाभ मिळणार आहे. सविस्तर माहितीसाठी www.mumbaiport.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Dilip Vengsarkar : 'आपलं ताडोबा' प्रदर्शनाला दिलीप वेंगसरकर यांची भेट; छायाचित्रकार मोहन बने यांच्या मेहनतीचं केलं कौतुक

Vrindavan Viral Video : वृंदावनमध्ये ई-रिक्षाच्या भाड्यावरून राडा; महिलेला क्रूर मारहाण

Satara News: माण तालुक्यात पाणीटंचाईचे संकट गडद! राजेवाडी तलावातून अहोरात्र पाणी उपसा सुरू

World News : POEC संघटनेला अमेरिकेचा मोठा धक्का; व्हेनेझुएला आणि इराकला बाहेर पडण्यासाठी ट्रम्प प्रशासनाचा दबाव

शेतकऱ्यांच्या फळबागांची कराडच्या कृषी प्रदर्शनात चमक; कोणत्या फळाला मिळाला पहिला क्रमांक?