आयटीआय औंध इमारतीचे ऑडिट करण्याची मागणी
आयटीआय सुधारणेसाठी ६० हजार कोटी; विकास कुठे ?
इलेक्ट्रिशियन द्वितीय वर्षाचे विद्यार्थी शुभम राऊत
Aundh ITI Crisis: केंद्र सरकारने देशातील आयटीआय संस्थांच्या आधुनिकीकरणासाठी ६० हजार कोटी रुपयांची तरतूद केली असताना, पुण्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), औंध येथील इमारतीची अत्यंत दयनीय आणि जीवघेणी अवस्था झाली असून त्या इमारतीचे तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट व इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट करून दुरुस्तीचे काम हाती घ्यावे तसेच देखभाल निधीच्या खर्चाची चौकशी करावी, अशी मागणी इलेक्ट्रिशियन द्वितीय वर्षाचे विद्यार्थी शुभम राऊत यांनी केली आहे.
शुभम राऊत यांनी सांगितले की, जीपीएस लोकेशन व तारखेसह १० ठोस पुरावे सादर करत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुख्य इमारतीचे अनेक खांब आणि बीम पूर्णपणे जीर्ण झाले असून सिमेंट निखळून आतील गंजलेल्या लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. त्यामुळे इमारत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
वर्गखोल्या आणि परिसरातील मुख्य एमसीबी डिस्ट्रिब्युशन बॉक्स उघड्या अवस्थेत असून, जिवंत इलेक्ट्रिक वायर्स उघड्यावर लोंबकळत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक शॉक आणि आगीचा धोका आहे. विद्यार्थ्यांच्या शुद्ध पिण्याच्या पाण्याचा आरओ फिल्टर प्लांट बंद अवस्थेत पडून आहे. स्वच्छतागृहांना दरवाजे नसून सर्वत्र शेवाळ व दुर्गंधी पसरली आहे. याची दखल प्रशासनाने दखल घ्यावी असे शुभम राऊत यांनी सांगितले.
औंध आयटीआयच्या इमारतीबाबत नेमकी काय मागणी करण्यात आली आहे?
औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) जीर्ण इमारतीचे तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट आणि इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट करून दुरुस्तीचे काम सुरू करावे, तसेच देखभाल निधीच्या खर्चाची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ही मागणी कोणी आणि कशाच्या आधारे केली आहे?
इलेक्ट्रिशियन द्वितीय वर्षाचे विद्यार्थी शुभम राऊत यांनी जीपीएस लोकेशन आणि तारखेसह १० ठोस पुरावे सादर करत प्रशासनाकडे ही मागणी केली आहे.
केंद्र सरकारकडून आयटीआय सुधारणेसाठी किती निधीची तरतूद करण्यात आली आहे?
केंद्र सरकारने देशातील आयटीआय संस्थांच्या आधुनिकीकरणासाठी ६० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.