फोटो सौजन्य - एआय career
Career

Sanch Manyata Update: शिक्षकांच्या वेतनावर परिणाम होण्याची शक्यता? संच मान्यतेचा डेटा अंतिम करण्यासाठी 'ही' डेडलाईन

Sanch Manyata Update: शाळांची सन २०२६-२७ ची संच मान्यता प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे संच मान्यतेचा डेटा ३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम करण्याचे निर्देश डॉ. महेश पालकर यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

श्रेया देशमुख
  • संच मान्यतेचे प्रलंबित काम ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा

  • शिक्षण संचालक महेश पालकर यांचे निर्देश

  • रखडल्यास शिक्षकांचे वेतन अडणार

Sanch Manyata Update: शाळांची सन २०२६-२७ ची संच मान्यता प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे संच मान्यतेचा डेटा ३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम करण्याचे निर्देश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. संच मान्यता रखडल्याने शिक्षकांचे वेतन थकल्यास त्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात येणार आहे.

संच मान्यतेचे प्रलंबित काम ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश

संच मान्यता प्रणालीवर कार्यान्वित झाल्यानंतर अनेक शाळांचा डिव्हिजन ॲड, स्टुडंट फॉरवर्ड आणि वर्किंग पोस्ट यासंबंधीचा डेटा अद्याप अंतिम केलेला नाही. या तांत्रिक बाबी पूर्ण न झाल्याने संबंधित शाळांची संच मान्यता अंतिम होऊ शकलेली नाही.

संच मान्यता वेळेत पूर्ण न झाल्यास शिक्षकांच्या वेतनावर परिणाम होणार

अंतिम संच मान्यतेच्या आधारेच शिक्षकांचे वेतन आहरित करण्यात येणार आहे. त्यामुळे संच मान्यता वेळेत पूर्ण न झाल्यास शिक्षकांच्या वेतनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त सर्व शाळा तसेच गटस्तरावरील प्रलंबित कामकाजाचा आढावा घेऊन ते मुदतीत पूर्ण करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

२०२६-२७ ची संच मान्यता अंतिम करण्याची अंतिम मुदत कोणती देण्यात आली आहे?

शाळांची सन २०२६-२७ ची संच मान्यता प्रक्रिया ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करून डेटा अंतिम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

संच मान्यतेसंदर्भात हे निर्देश कोणी दिले आहेत?

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना हे निर्देश दिले आहेत.

संच मान्यता रखडल्यास कोणता परिणाम होऊ शकतो आणि त्याची जबाबदारी कोणावर असेल?

संच मान्यता रखडल्यामुळे शिक्षकांचे वेतन थकल्यास त्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात येणार आहे.

Vaibhav Suryavanshi: 'दबदबा है और...'; वैभवने यूएईची पिसं काढली, सोशल मिडियावर Memes चा पाऊस

Sambhajinagar Industrial News : औद्योगिक स्मार्ट सिटींच्या यादीत ऑरिकचा दबदबा; ३४० भूखंडांचे वाटप, हजारो रोजगारांची संधी

India Forex Reserves : रुपयाला मिळाला मोठा आधार! अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक संकेत; परकीय चलन साठ्यात वाढ

Health tips: नेल एक्स्टेंशन करण्यापूर्वी सावधान! नखांचे सौंदर्य वाढवणारी ही फॅशन ठरू शकते नुकसानकारक जाणून घ्या दुष्परिणाम

Typing Exam Update: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना! परीक्षा सुरू होण्यापूर्वी 'हा' तपशील तपासून घेण्याचे आवाहन