विद्यापीठातील गरजू विद्यार्थ्यांना इस्कॉनकडून मोफत रात्रीचे भोजन
पहिल्या टप्प्यात १०० विद्यार्थ्यांना लाभ
दि. ५ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
ISKCON Food For Life: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील गरजू विद्यार्थ्यांसाठी ‘इस्कॉन फूड फॉर लाईफ’ हा मोफत रात्रीचे भोजन उपक्रम विद्यापीठ परिसरात सुरू करण्यात येणार आहे. विद्यापीठाने याबाबत परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना माहिती दिली आहे.
सेवाभावी संस्था व उद्योगांमधील सीएसआरच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना भोजनाची धर्मादाय सोय करण्याबाबत विद्यापीठाने आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत इस्कॉन संस्थेमार्फत १०० विद्यार्थ्यांना दररोज मोफत रात्रीचे पौष्टिक व सकस शाकाहारी भोजन उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. या उपक्रमांतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात १०० विद्यार्थ्यांना भोजन वितरित केले जाणार आहे. विद्यार्थ्यांचे अर्ज मागविणे, छाननी, निवड, भोजनाचा मेनू व प्रत्यक्ष वितरण ही संपूर्ण प्रक्रिया संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.
विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रत्यक्ष पूर्णवेळ शिकत असावा. अनाथ, एकल पालक असलेले व दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य राहील. तसेच विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांच्या मर्यादेत असावे, अशी अट आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी संस्थेने दिलेल्या ऑनलाइन गुगल फॉर्मद्वारे ५ डिसेंबर २०२६ पर्यंत नावनोंदणी करावी. अर्जांची छाननी करून अंतिम पात्र विद्यार्थ्यांची यादी इस्कॉन पुणे बीसीईसी संस्थेमार्फत जाहीर केली जाईल. भोजन हे एफएसएसएआयच्या सर्व नियमांचे पालन करून तयार केले जाईल आणि विद्यापीठ परिसरातील निश्चित केंद्रावर शिस्तबद्ध पद्धतीने वितरित केले जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क - ९३०९४७१८२५, ई-मेल contact@iskconpunebcec.com येथे करावा.
पहिल्या टप्प्यात किती विद्यार्थ्यांना मोफत रात्रीचे भोजन मिळणार आहे?
पहिल्या टप्प्यात १०० गरजू विद्यार्थ्यांना दररोज मोफत, पौष्टिक आणि सकस शाकाहारी रात्रीचे भोजन दिले जाणार आहे.
या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी प्रमुख अटी काय आहेत?
विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पूर्णवेळ शिकत असावा आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांच्या मर्यादेत असावे. अनाथ, एकल पालक असलेले आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य दिले जाईल.
अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
इच्छुक विद्यार्थ्यांनी संस्थेच्या ऑनलाइन गुगल फॉर्मद्वारे ५ डिसेंबर २०२६ पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे.