छत्रपती संभाजीनगरमधील रॅकेटमुळे बिंग फुटले! (Photo Credi t- X) 
क्राईम

छत्रपती संभाजीनगरमधील रॅकेटमुळे बिंग फुटले! कोट्यवधींच्या गुन्ह्यांनंतर राज्याच्या सायबर सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह!

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन मोठे आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेट उघड झाल्यानंतर राज्याच्या सायबर सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. गुन्हेगार प्रगत, पण पोलीस मागे पडत असल्याचे स्पष्ट.

नितिन कुऱ्हे
  • छत्रपती संभाजीनगरमध्ये सायबर सुरक्षेचे बिंग फुटले!
  • अमेरिकेतील नागरिकांना गंडा घालणारे बोगस कॉल सेंटर उघड
  • डिजिटल गुन्हेगार प्रगत, पण पोलीस मागे!

अंकुश थोरात । नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरातील सलग उघड झालेल्या दोन सायबर गुन्ह्यांच्या रकेटने सायबर सुरक्षेतील भेगा अधिक उघड केल्या आहेत. एमआयडीसी चिकलठाणा येथील बोगस कॉल सेंटर आणि साऊधबुक डॉट ईन (Southbook.in) या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन जुगार रकेटच्या कारवाया पाहता, राज्यातील शहरांसह खेडे पाडे ही आज तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक साधनांनी सजा गुन्हेगारांच्या निशाण्यावर असल्याचे स्पष्ट होते. डिजिटल जगाचा वेग वाढत असताना, त्याला रोखणारी व्यवस्था मात्र मागे असल्याची कटू वस्तुस्थितीही समोर आली आहे.

टॅक्स चोरीची भीती दाखवून अमेरिकेतील नागरिकांना गंडा

अमेरिकन नागरिकांना टॅक्स चोरी, कायदेशीर दंड आणि लोन फ्रॉडची भीती दाखवून हजारो डॉलर उकळणाऱ्या या सिंडिकेटने व्हीपीएन, तुटानोटासारख्या एनक्रिप्टेड ईमेल सर्व्हिस, तसेच डार्कनेट सारख्या बाबींचा वापर केला. डॉलरचे बिटकॉइनमध्ये रूपांतर आणि त्यानंतर भारतात त्याचे क्लीन ट्रान्ट्रॅक्शन, ही संपूर्ण मनी सर्किट पद्धत इतकी गुंतागुंतीची होती की तपास यंत्रणांना त्याचा मागोवा घेणेही अवघड झाले. विशेष म्हणजे, या रॅकेटसाठी उत्तर-पूर्व भारतातून तब्बल १०० पेक्षा अधीक तरुणांना गोपनीयपणे शहरात आणून चार इमारतीत बंदिस्त ठेवण्यात आले होते. पोलिसांच्या नजरेआड एक्या मोठा सेटअप उभा राहणे, ही गंभीर त्रुटी दाखवणारी बाब आहे. डिजिटल जगातील गुन्हे आता सीमाविरहीत झाले आहेत. महाराष्ट पोलिसांनी अमेरिकेतील एफबीआयला संपर्क साधण्याची वेळ येणे, हेच दाखवते की स्थानिक पातळीवर गुन्हे आंतरराष्ट्रीय प्रवास करत आहेत.

देशाची सायबर सुरक्षा संकटात?

आज गुन्हेगाराकडे बीपीएन, बॉट सर्व्हर्स, क्रिप्टो चेन, एनक्रयशन, डार्कनेट यासारखी शस्त्रे आहेत: तर पोलिसांकडे अद्याप पुरेशी तंत्रज्ञानसज्जता नाही. डिजिटल इंडिया जसा विस्तारती आहे, तसतशी सायबर संरक्षण भक्कम करणे ही काळाची गरज बनली आहे. अन्यथा अशा रॅकेट्समुळे केवळ आर्थिक नाही तर राष्ट्रीय सुरक्षेलाही गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. सायबर सुरक्षा केवळ तांत्रिक प्रान नाही तर तो देशाच्या भविष्यातील सुरक्षिततेचा पाया आहे.

सायबर गुन्हेगार प्रगत, पण पोलिस मागे

दोन्ही प्रकरणांमधून आपली सायबर सुरक्षा संरचना अजूनही अपुरी आणि कमकुवत असल्याची बाब प्रकरशाने समोर आली आहे.

  • त्यात सायबर पोलिस ठाण्यांत प्रशिक्षित तज्ज्ञांची कमतरता
  • अत्याधुनिक फॉरेन्सिक, क्रिप्टो-ट्रेसिंग, डार्कनेट मॉनिटरिंग साधनांची अभाव
  • वाढत्या ऑनलाईन गुन्ह्यांच्या प्रमाणाच्या तुलनेत प्रशिक्षीत पोलिस आणि पोलिसांची अपुरी संख्या
  • विविध विभागांमधील समन्वयाचा अभाव

ऑनलाइन गेमिंग रॅकेटमध्ये डिजीटल व्यवहारांचे ५२ खाती

दुसऱ्या कारवाईत Southbook .in नावाच्या पेड बेटिंग वेवसाईटवरून क्रिकेटपासून कॅसिनोपर्यंत ४० पेक्षा जास्त गेम्सवर २४ तास ऑनलाइन सट्टा वालत असल्याचे तपासात स्पष्ट झाले. आरोपीनी क्यूआर कोड, तृतीय पक्षाचे एटीएम कार्ड, यीपीआय आवडी, आणि अनेक ऑनलाइन वॉलेटद्वारे पैसा विविध खात्यांत ट्रान्सफर करून कॅशिंग टीम मार्फत रोख स्वरूपात परत घेतला जात असे, या खात्यांपैकी पाच खाती शहरातील नागरिकांची असल्याचा धक्कादायक तपशीलही समोर आला आहे. केवळ टक्केवारीच्या आमिषाने अनेक युवक या चक्रात गुंतल्याचे स्पष्ट होते.

US Tariff : अमेरिकेचा भारताला मोठा झटका! भारतीय वस्तूंवर 25% आयात शुल्क लादण्याचा प्रस्ताव; पण ट्रम्प यांनी 'या' अटीवर दिलासा देण्याची दर्शवली तयारी

Amruta Khanvilkar Launches Amulya: अभिनयासोबत आता व्यवसायातही बाजी! अमृता खानविलकरची 'अमुल्य' साडी बॉलिवूडपर्यंत पोहोचली

Health tips: सतत जंक फूड खाताय? वेळीच व्हा सावध! शरीराला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

उत्तर प्रदेशात जागावाटपावरून काँग्रेस-समाजवादी पक्षात संघर्ष; अखिलेश यादवांचं 'ते' विधान चर्चेत

Mahabharat Katha: शिखंडी कोण होता? अंबाचा पुनर्जन्म आणि भीष्मांच्या पतनाची रंजक कथा जाणून घ्या