crime news 
क्राईम

वाळू माफियांची मुजोरी! महसूल अधिकाऱ्याला रॉड अन् दांडक्याने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

बीड शहराजवळील आहेरचिंचोली येथे शासकीय कर्तव्य बजावत असताना ग्राम महसूल अधिकारी विलास बजरंग तपसे (वय ५२) यांना रॉड आणि दांडक्याने मारहाण करण्यात आली आहे.

Dnyaneshwar more

बीड : बीड शहराजवळील आहेरचिंचोली येथे शासकीय कर्तव्य बजावत असताना ग्राम महसूल अधिकारी विलास बजरंग तपसे (वय ५२) यांना रॉड आणि दांडक्याने मारहाण करण्यात आली आहे. या हल्ल्यात तपसे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी महसूल विभागातील अधिकाऱ्यांसह रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल, असे निर्देश दिले. या घटनेमुळे महसूल विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

आहेरचिंचोली परिसरात शासकीय कर्तव्य बजावत असताना विलास तपसे यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली. वाळूमाफियांनी रॉड आणि दांडक्याने केलेल्या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी रुग्णालयात भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. यावेळी महसूल विभागातील अन्य अधिकारीही उपस्थित होते. जिल्ह्यात अवैध वाळू उपशाविरोधात कारवाईसाठी जाणाऱ्या महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धमकावणे तसेच मारहाण करण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप महसूल कर्मचाऱ्यांनी केला आहे. शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारे हल्ले होत असतील, तर त्यांनी निर्भयपणे कर्तव्य कसे बजावायचे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

या घटनेनंतर महसूल विभागातील कर्मचारी आक्रमक झाले आहेत. हल्लेखोरांविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे. दोषींवर कारवाई केली जाईल, असे निर्देश तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिले आहेत. दरम्यान, आरोपींवर तातडीने कारवाई न झाल्यास संघटनात्मक निर्णय घेऊन काम बंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तलाठी व महसूल संघटनेच्या अध्यक्षांनी दिला आहे. या घटनेमुळे महसूल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

हल्ल्यात जखमी झालेल्या महसूल अधिकाऱ्याचे नाव काय?

विलास बजरंग तपसे (वय ५२) असे जखमी अधिकाऱ्याचे नाव आहे.

ही घटना कुठे आणि कशी घडली?

बीड शहराजवळील आहेरचिंचोली येथे शासकीय कर्तव्य बजावत असताना रॉड आणि दांडक्याने त्यांना मारहाण करण्यात आली.

महसूल कर्मचाऱ्यांनी कोणता इशारा दिला आहे?

हल्लेखोरांवर तातडीने कारवाई न झाल्यास संघटनात्मक निर्णय घेऊन काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पुरंदर विमानतळाचा मुद्दा गाजणार; भूसंपादन अधिकाऱ्यांवर तारांकित प्रश्न

Alice Huang : चीनचा मोठा 'AI' डाव उघड! कथित गुप्तहेर ॲलिस हुआंगच्या नेटवर्कला तब्बल 2491 कोटींचा निधी; अमेरिकेची मोठी कारवाई

Tata Group : Noel Tata विरुद्ध N Chandrasekaran वाद कोर्टात! बॉम्बे हायकोर्टात कायदेशीर लढाईची तयारी; काय निर्णय होणार?

Amravati News: ६९ गावांत १०% पाणीकपात! १ डिसेंबरपासून अंमलबाजावणी; उन्हाळ्यापूर्वीच उद्भवणार जलसंकट

Harshad Atkari: ५० ATKT अन् गावभर नापासाचे होर्डिंग्ज! हर्षद अतकरीने सांगितला भूमिकेमागचा भन्नाट किस्सा!