क्राईम

Himachal Pradesh: पत्नीवर अ‍ॅसिड अटॅक नंतर छतावरून ढकललं आणि..., हिमाचलप्रदेश येथील घटना

हिमाचल प्रदेशातील मंडी येथे पती नंद लालने पत्नी ममता ठाकूरवर अॅसिड फेकून तिला छतावरून ढकललं. चार दिवस उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. आरोपीला अटक करून हत्येचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

वैष्णवी कामडी
  • पतीकडून सततचा जाच, मारहाण आणि वाद सुरू होते
  • अॅसिड अटॅकनंतर छतावरून खाली ढकलल्याने गंभीर जखमी
  • मृत्यूनंतर नंद लालवर हत्येचा गुन्हा; आरोपी न्यायालयीन कोठडीत

हिमाचल प्रदेश: हिमाचल प्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीवर आधी अ‍ॅसिड टाकलं त्यानंतर छतावरून खाली ढकलून हत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. ही घटना १५ नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास घडली. आरोपी पतीचा नाव नंद लाल असे आहे. तर मृतकाचे नाव ममता ठाकूर असे आहे.

नेमकं काय घडलं?

ही घटना हिमाचल प्रदेशातील मंडी येथे घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी नंद लाल सतत ममताला मारहाण करायचा. दोघांमध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरु होता. ममता खूप आजारी पडली. ती तिच्या वागण्याला कंटाळली होती. तिने एक सोशल मीडियावर एक पोस्टसुद्धा केली होती. त्यात तिने पाटीवर गंभीर आरोप केले होते. याच कारणामुळे, नंदलाल पत्नीवर प्रचंड संतापला होता.

१५ नोव्हेंबर रोजी नंद लाल आणि ममता यांच्यात मोठा वाद झाला. भांडण सुरु असतांना नंद लालने रागाच्या भरात पत्नीवर अॅसिड फेकलं. एवढेच नाही तर तिला छतावरून खाली ढकललं. यामुळे पीडिता खाली कोसळली आणि गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर आरोपी फरार झाला. शेजाऱ्यांनी ममताला रक्ताने माखलेल्या अवस्थेत पाहिलं आणि तिला मंडीच्या रुग्णालयात नेण्यात आलं.

तिची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी तिला तातडीने PGI चंदीगड येथे रेफर केलं. तिथे डॉक्टरांनी चार दिवस तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. पण अॅसिडमुळे जळजळ आणि गंभीर जखमांमुळे तिची प्रकृती खालावली आणि बुधवारी रात्री तिचा मृत्यू झाला.

आरोपीला अटक

पीडितेच्या नातेवाईकांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या आधारे पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. मात्र ममताच्या मृत्यूनंतर आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणासंबंधी कायदेशीर कारवाई केली जाणार असून घटनेचा तपास अद्याप सुरू असल्याची माहिती आहे.

💡Frequently Asked Questions

Que: अॅसिड कोणावर फेकले?
Ans: ममता

Que: आरोपीचे नाव काय?
Ans: नंदलाल

Que: घटना कुठे घडली?
Ans: मंडी

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पुरंदर विमानतळाचा मुद्दा गाजणार; भूसंपादन अधिकाऱ्यांवर तारांकित प्रश्न

Alice Huang : चीनचा मोठा 'AI' डाव उघड! कथित गुप्तहेर ॲलिस हुआंगच्या नेटवर्कला तब्बल 2491 कोटींचा निधी; अमेरिकेची मोठी कारवाई

Tata Group : Noel Tata विरुद्ध N Chandrasekaran वाद कोर्टात! बॉम्बे हायकोर्टात कायदेशीर लढाईची तयारी; काय निर्णय होणार?

Amravati News: ६९ गावांत १०% पाणीकपात! १ डिसेंबरपासून अंमलबाजावणी; उन्हाळ्यापूर्वीच उद्भवणार जलसंकट

Harshad Atkari: ५० ATKT अन् गावभर नापासाचे होर्डिंग्ज! हर्षद अतकरीने सांगितला भूमिकेमागचा भन्नाट किस्सा!