महिलांसाठी मुंबई असुरक्षितच! मुलगी प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट पाहत असताना आईवर शौचालयात....; घाटकोपर रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना  
क्राईम

Mumbai Crime: महिलांसाठी मुंबई असुरक्षितच! मुलगी प्लॅटफॉर्मवर उभी असताना आईवर शौचालयात मारहाण अन्....; घाटकोपर रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

Mumbai Crime: खरचं महिलांसाठी मुंबई सुरक्षित आहे का? घाटकोपर रेल्वे स्थानकातील अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 60 वर्षीय महिलेला गर्दुल्यांने मारहाण करत बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर आता एकच सवाल उपस्थित होत आहे,तो म्हणजे खरचं मुंबई मुली, महिलांसाठी सुरक्षित आहे का?

श्वेता झगडे
  • घाटकोपर रेल्वे स्थानकात माणुसकीला काळिमा!

  • ६० वर्षीय महिलेवर शौचालयात बलात्कार

  • २५ वर्षीय आरोपी अटकेत

Mumbai Crime: देशातील सर्वाधिक सुरक्षित शहरांपैकी एक अशी ओळख असलेले मुंबई शहर मुली-महिलांसाठी असुरक्षित बनू लागल्याचे पाहायला मिळत आहे. जसे की मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकावरील सार्वजनिक शौचालयात ६० वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. आरोपीने महिलेच्या कपाळावर वार करून त्यांना जखमीही केले. या प्रकरणी राजकीय रेल्वे पोलिसांनी (GRP) तत्परतेने तपास करत शुक्रवारी २५ वर्षीय आरोपीला अटक केली. तस्लीम नूर मोहम्मद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मुलगी प्लॅटफॉर्मवर, आई शौचालयात गेली अन् घडली घटना

पीडित महिला खडवली येथे राहत असून रोजंदारीवर काम करण्यासाठी त्या घाटकोपर येथे येतात. गुरुवारी (28 नोव्हेंबर) आपल्या १८ वर्षीय मुलीसोबत कामासाठी आल्या होत्या. काम संपल्यानंतर दोघीही खडवलीला जाणारी लोकल पकडण्यासाठी घाटकोपर रेल्वे स्थानकावर पोहोचल्या. रात्री सुमारे ११:१२ वाजता मुलगी प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर ट्रेनची वाट पाहत थांबली असताना आई सार्वजनिक शौचालयात गेली.

मात्र, त्यावेळी शौचालयात कोणताही कर्मचारी किंवा सुरक्षा रक्षक तैनात नव्हता. महिलेच्या मागोमाग एक २५ वर्षीय तरुण शौचालयात शिरला. त्याने आतून दरवाजा बंद करून शौचालयातील अंतर्गत मार्गिकेत महिलेला मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला. यावेळी तिच्या कपाळावरही वार करून तिला जखमी केले.

मुलीला सांगितली आपबिती, जीआरपीकडे धाव

या घटनेनंतर रात्री सुमारे ११:२२ वाजता महिला कशाबशा शौचालयातून बाहेर आल्या. त्यांनी मुलीला आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर दोघींनी मदतीसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरील जीआरपीच्या मदत कक्षाकडे धाव घेतली. या घटनेची माहिती स्टेशन मॅनेजर आणि रेल्वे सुरक्षा दलाला (RPF) देण्यात आली. महिला पोलिस कर्मचाऱ्याने पीडितेची चौकशी केली. त्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आले.

सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपीचा माग काढला

याा घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घाटकोपर रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये आरोपी रात्री ११:१९ वाजता शौचालयातून बाहेर पडताना आणि वेगाने घाटकोपर मेट्रो स्थानकाच्या दिशेने जाताना दिसून आला. पोलिसांनी रेल्वे स्थानकासह आजूबाजूच्या मेट्रो परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले.

भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली. सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढत त्याला घाटकोपरमधील असल्फा परिसरातून अटक केली.

आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपास सुरू

अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख तस्लीम नूर मोहम्मद अशी झाली आहे. त्याचे वय २५ वर्षे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीचा यापूर्वी कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात सहभाग होता का, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, रेल्वे स्थानकातील सार्वजनिक शौचालयात सुरक्षा कर्मचारी किंवा गार्ड तैनात नसल्याचा मुद्दाही या घटनेमुळे चर्चेत आला आहे. प्रवाशांच्या, विशेषतः महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

JSW Combat SUV: पैसे असूनही खरेदी करता येणार नाही ही SUV! फक्त 500 ग्राहकांसाठी खास नियम

Travel: मुंबईतील ५ अनोखी पर्यटनस्थळे, शहरातच घ्या निसर्गचा आणि इतिहासाचा आनंद!

RBI New ATM PoS Rules : फेल ATM व्यवहारांवरही लागणार चार्ज? किती वेळा मोफत काढता येणार पैसे? RBI ची नवी नियमावली

Pakistan Crisis : पाकिस्तानची आरोग्यसेवा धोक्यात! औषध उत्पादनात 21.5% घट; स्टेंट आणि ऑक्सिजनअभावी शस्त्रक्रिया रखडल्या

Pyaade Trailer: जिमी शेरगिल आणि प्रनूतन बहलची दमदार एन्ट्री! ‘प्यादे’चा ट्रेलर प्रदर्शित, चित्रपटाची उत्सुकता वाढली