सौजन्य फोटो - सोशल मिडीया  Nashik Trimbakeshwar Road Accident
क्राईम

अपघात की कंत्राटदाराचा निष्काळजीपणा? नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवर महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू

न भरलेल्या साईड पट्टीत दुचाकीचं चाक अडकलं अन् मागून येणाऱ्या सिमेंट मिक्सरखाली चिरडली १८ वर्षीय तरुणी! नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील पपया नर्सरी परिसरात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात सीसीटीव्हीत कैद; कंत्राटदाराच्या निष्काळजीपणाविरोधात नागरिकांचा संताप.

Sanofar Nayakawadi
  • त्र्यंबकेश्वर रोडवर मिक्सरखाली चिरडून १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू

  • न भरलेल्या साईड पट्टीत दुचाकी घसरल्याने अपघात

  • वारंवार तक्रारी करूनही कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे तीव्र संताप

नाशिक: मागील काही दिवसांपासून नाशिक शहरात अपघाताचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत. यासाठी खोदकाम केलं जात आहे. याच कामांमुळे गेल्या काही काळात अनेक अपघात घडले आहेत. आता सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामातील कंत्राटदाराच्या गलथान कारभाराचा आणखी एक दुर्दैवी बळी गेला आहे.

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर रोडवरील पपया नर्सरी परिसरात झालेल्या भीषण अपघातात एका महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाला आहे. श्रुती संतोष घाटोळ (वय १८) असं या तरुणीचं नाव आहे. तिचा कंत्राटदाराच्या सिमेंट मिक्सरखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक अपघाताचा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, प्रशासनाच्या आणि कंत्राटदाराच्या निष्काळजीपणाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

रस्त्याच्या साईड पट्टीतून दुचाकीचं चाक घसरलं अन्...

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असतानाही हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. पपया नर्सरी परिसरातून श्रुती घाटोळ दुचाकीवरून जात असताना रस्त्याच्या न भरलेल्या साईड पट्टीमध्ये तिच्या दुचाकीचे चाक अडकले. त्यामुळे दुचाकीचा तोल जाऊन ती थेट रस्त्यावर खाली पडली. नेमक्या त्याच क्षणी मागून येणाऱ्या संबंधित कंत्राटदाराच्या भरधाव सिमेंट मिक्सरच्या चाकाखाली श्रुती आली. या भीषण अपघातात गंभीर दुखापत होऊन तिचा जागीच दुर्दैवी अंत झाला.

वारंवार लेखी तक्रारी देऊनही कंत्राटदाराचे दुर्लक्ष; नागरिकांमध्ये तीव्र संताप

नाशिक-त्र्यंबकेश्वर महामार्गावरील रस्त्याच्या बाजूच्या साईड पट्ट्या तात्काळ भरण्यात याव्यात, याबाबत स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी संबंधित ठेकेदाराला वारंवार लेखी निवेदने देऊन कळवले होते. मात्र, कंत्राटदाराने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाच्या नावाखाली सुरू असलेल्या या ढिसाळ नियोजनामुळे एका १८ वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ आणि संतापाची लाट उसळली आहे.

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर रोडवर नेमका कसा अपघात घडला?

पपया नर्सरी परिसरात रस्त्याच्या न भरलेल्या साईड पट्टीमध्ये दुचाकीचे चाक अडकल्याने १८ वर्षीय श्रुती संतोष घाटोळ हिचा तोल जाऊन ती रस्त्यावर पडली आणि मागून येणाऱ्या कंत्राटदाराच्या सिमेंट मिक्सरखाली चिरडून तिचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताबाबत स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींचा काय आरोप आहे?

नाशिक-त्र्यंबकेश्वर महामार्गावरील साईड पट्ट्या तात्काळ भरण्याबाबत संबंधित ठेकेदाराला वारंवार लेखी निवेदने देऊनही कंत्राटदाराने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

अपघाताचा हा प्रकार कशामध्ये कैद झाला आहे?

या हृदयद्रावक अपघाताचा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Kevin Pietersen: ‘पंचायत ५’मध्ये दिसणार इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू? केविन पीटरसनच्या BTS फोटोने चर्चेला उधाण

PoK Unrest: पाकिस्तानला आता घरातूनच मोठा हादरा! बलुचिस्ताननंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये पेटला वणवा; 'जानबाज फोर्स'ने फुंकले युद्धाचे रणशिंग

Lifestyle tips: मूड खराब असेल तर वापरा 'Dopamine Menu' ची ट्रिक! रोजच्या छोट्या अ‍ॅक्टिव्हिटीमुळे राहाल आनंदी

Narendra Modi : 'मन की बात'च्या 140 व्या भागाची देशभर चर्चा; भाजप नेत्यांकडून मोदींच्या उपक्रमाचे कौतुक

Russia Ukraine War : युक्रेनवरील रशियन ड्रोन हल्ल्यात 10 जण ठार; मॉस्कोने 1,246 युक्रेनियन ड्रोन पाडल्याचा दावा